परवाच जितूजींचा बड्डे झाला. मधे त्याची काही गाणी बघत होतो. तीही त्यात जितू आहे म्हणून नाही तर इतरच कारणांनी. (थांबा थांबा. मी हिम्मतवाला, मवाली बद्दल म्हणत नाहीये. 'ये मुलाकात एक बहाना है' सारखी गाणी ऐकायला छान आहेत म्हणून लावली होती). तेव्हा जाणवले की जितेंद्रच्या पिक्चर्स मधे असंख्य पिक्चर्स असे होते की त्याचे जिच्याशी प्रेम जमले तिच्याशी त्याचे क्वचितच लग्न व्हायचे. त्यामुळे एखाद्या आनंदी गाण्यात ती "एक्स" रडताना दिसते.
वास्तविक हे चित्रपट समीक्षण मी खूप आधी लिहिलं होतं... पण प्रकाशित करायचा मुहुर्त आत्ता लागलाय असं म्हणायला हरकत नाही...
खरंतर चित्रपट समीक्षण हा व्यक्तिपरत्वे भिन्न मत दर्शवणारा लेख आहे.. पण तरी एखादा चांगला चित्रपट आणि त्याच समीक्षण करणं आणि मास कम्युनिकेशन साधून एखादा जनुईन चित्रपट पाहण्यासाठी प्रोत्साहित करणं... दॅट्स दि अल्टिमेट एम्...
तर मग....
नमस्कार मंडळी
माझ्या मुलाच्या सुचवणीमुळे त्याच्याच बरोबर बसून मी हा चित्रपट एच बी ओ की अँड फ्लिक्स वर बघितला आणि हैराण झालो. त्याची ही ओळख.
'रक्त'
संजूबाबा, डिनो मारिया, सुनील शेट्टी, अभिषेक बच्चन.
शिवाय बिपाशा, नेहा धुपिया, अमृता अरोरा, पायल रहतोगी...! चार हिरो, चार हिरॉईनी..! प्रेमाचे बहुविध आणि कॉंप्लीकेटेड अष्टकोन..! शिवाय थ्रिलर, हॉरर, मर्डर- मिस्ट्री, बालसंगोपन आणि सायकोथेरपी..! असं साधारण पॅकेजचं स्वरूप.
मला विविध कालखंडातील आणि सगळ्या देशातील इतिहासाची आवड आहे. मी त्याबद्दल विविध भाषेतील पुस्तके, लेख, मालिका आणि चित्रपट बघत असतो. मी इतिहास तज्ञ नाही तर इतिहास जाणून घेण्याची आवड असलेला सामान्य माणूस आहे. डॉ. अमोल कोल्हे यांचा "शिवप्रताप गरुडझेप" हा चित्रपट थिएटरमध्ये लागला होता तेव्हा खूप इच्छा असूनही जायला जमले नाही म्हणून आज रविवारी TFS play या app वर rent देऊन मोबाइल मध्ये बघितला, कारण हे ॲप अमेझॉन फायर टीव्ही वर compatible नाही. असो.
या धाग्यात आपण तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड, हिंदी डब्ड/वीथ सबटायटल्स पाहिलेले सिनेमा, कसा वाटला,कुठे पाहिला याची चर्चा करू शकतो.
आज मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने, मराठी मनावर गेली पन्नास वर्षे तरी आपल्या आगळ्या वेगळ्या विनोदाची मोहोर ठसवून हसवत ठेवणाऱ्या अशोक सराफ या नटवराला नमन करावेसे वाटले. यंदा पंच्याहत्तरी गाठलेल्या त्यांना खरंतर आदराने, मानाने नटवर्य म्हणावे लागेल पण त्यांच्या खट्याळ विनोदी भूमिकांचा विचार करता 'नटवर' च जास्त जवळचे वाटेल. त्यांचा जन्म कधी कुठे झाला , मग शिक्षण नोकरी आणि रुपेरी पडद्यापर्यंतचा प्रवास ही अभ्यासपूर्ण माहिती आपल्याला इंटरनेटवर मिळूच शकते त्यामुळे त्या तपशीलात न जाता या लेखात मी फक्त मला भावलेला अशोक सराफ शब्दात मांडण्याचा प्रयत्न करणार आहे.
उंबरठा म्हटलं की ती आठवते, तिच्यासाठी नसलेलं तिचं घर आठवतं! जवळपास ३८ वर्षांआधी पडद्यावर साकारलेली तिची जेमतेम दोन तासांची गोष्ट आठवते!
सुरुवातीच्या एका मिनिटभरात भरलेल्या घरात ती आतून रिकामी आहे हे तिच्या १/२ अस्फुट वाक्यांवरुन खोलवर जाणवतं. तिचा वावर घरभर आहे पण तिची स्वत:ची अशी जागा ती शोधते आहे. कधी बाहेरच्या बागेतल्या पाळण्यावर, तर पोर्चच्या बाजूच्या बाकावर.
‘घो मला असला हवा’ हा सुमित्रा भावे आणि सुनिल सुकथनकर या द्वयींचा२००९ चा चित्रपट. फारसा जुना नाही आणि त्यांच्या नेहेमीच्या जॅानरपेक्षा जरा वेगळ्या प्रकारात मोडणारा. मी भावे-सुकथनकरांचे चित्रपट चुकवत नाही. हा सुद्धा चुकवु नये या कॅटेगरीतलाच पिक्चर आहे.
भारतातील आद्य चित्रपटसृष्टी असूनही जुने विनोदी चित्रपट वगळता मराठी चित्रपटसृष्टी ही आंतरजालावर काहीशी दुर्लक्षितच राहिली आहे. वेस्ट इंडिज क्रिकेट आणि मराठी चित्रपट यामध्ये हे विलक्षण साम्य आहे - काय ते ७०-८० च्या दशकातले वेगवान गोलंदाज होते/काय ते ७०-८० च्या दशकातले खळखळून हसवणारे विनोदी चित्रपट होते! अस्मादिकांच्या मते याचे एक कारण आपले अनेक पटकथाकार अमूर्त अभिव्यक्तीवादी (abstract expressionist) आहेत.