कभी खुशी कभी गम या अजरामर चित्रपटाबद्दल आपली मते येथे लिहा. हा "माझा" धागा नाही. सर्वांनी लिहा. "तुम्ही जर या काळात हे विकत घेतले असेल तर या क्लास अॅक्शन सूट मधे तुम्हाला सामील होता येईल" अशी आवाहने असलेली मेल येते तसे समजा. ज्यांनी हा पिक्चर कधी पाहिलेला आहे त्यांना त्यांचा वैताग चॅनेल करायला चांगली संधी आहे. गेल्या २-३ दिवसांत चित्रपट बाफ वर अनेकांनी तुकड्या तुकड्यांत या चित्रपटातील सीन्स बद्दल लिहीले आहे. त्यांनी ते इथे परत लिहा, आणि इतरांनाही त्यात भर घालता यावे म्हणून असा बाफ उघडत आहे.
इतर चित्रपटांबद्दल स्वतंत्र बाफ आहेत तेव्हा त्याबद्दल इथे लिहून हे डायल्यूट करू नका
अचाट सीन आणि अतर्क्य लॉजिक च्या मागच्या धाग्यावर १९०० पेक्षा जास्त प्रतिसाद झाल्याने हा नवीन धागा.
मागच्या धाग्यावरचे अचाट सीन्स पाहण्यासाठी खालील दुव्यावर जा.
https://www.maayboli.com/node/2242
भारतातील आद्य चित्रपटसृष्टी असूनही जुने विनोदी चित्रपट वगळता मराठी चित्रपटसृष्टी ही आंतरजालावर काहीशी दुर्लक्षितच राहिली आहे. वेस्ट इंडिज क्रिकेट आणि मराठी चित्रपट यामध्ये हे विलक्षण साम्य आहे - काय ते ७०-८० च्या दशकातले वेगवान गोलंदाज होते/काय ते ७०-८० च्या दशकातले खळखळून हसवणारे विनोदी चित्रपट होते! अस्मादिकांच्या मते याचे एक कारण आपले अनेक पटकथाकार अमूर्त अभिव्यक्तीवादी (abstract expressionist) आहेत.
'द अदर कोहली' उर्फ राज कोहलीचे हिंदी चित्रपटसृष्टीतील योगदान मोजमापापलीकडचे आहे. त्याच्या शिखर वर्षातील राज तिलकचा रसास्वाद घेतल्यानंतर साहजिकच त्या वर्षातील दुसर्या कोहलीपटाचा, जीने नही दूंगाचाही आढावा घेणे भाग आहे. योडाने हा चित्रपट बघितल्यानंतर घोषणा केली की 'द फोर्स इज स्ट्राँग विथ धिस वन'. समीक्षकांनी नावाजलेले अळणी, नीरस, कंटाळवाणे चित्रपट बघून झालेल्या अजीर्णावर हा चित्रपट उतारा आहे. या चित्रपटाची थोडक्यात पूर्वपीठिका सांगायची तर १९७९ च्या सुप्रसिद्ध पाकिस्तानी चित्रपट मौला जटचा हा रिमेक आहे.
कोहली कुलोत्पन्न दोघेच फेमस. एक विराट, दुसरा राजकुमार. राजकुमार उर्फ राज कोहली आज आपल्याला नागीन आणि दोन जानी दुश्मन्स मुळे माहित असला तरी त्याचे शिखर वर्ष १९८४ आहे. या वर्षी त्याने एक नव्हे तर दोन डोक्याला ताप चित्रपट बनवले. पहिला जीने नहीं दूंगा, ज्यात रोशनी स्कूल ऑफ अॅक्टिंगशी आपली ओळख करून दिली आहे. आणि दुसरा राज तिलक ज्यातून कमल हसनला सारिका आणि प्रेक्षकांना आ वासण्याची शक्ती मिळाली.
मध्ये नागराजचं समग्र कॉमिक कलेक्शन पुनःपारायणाचा योग आला. त्यात विषकन्या म्हणून मस्त कॉमिक आहे. नागतांत्रिक विषंधर नागराजला मारण्यासाठी यक्षराक्षस गरलगंटची आराधना करून एक विषकन्या यज्ञातून उत्पन्न करतो आणि मग नागराज विरुद्ध ते दोघे असा सामना आहे. ते वाचताना इतर विषकन्या रेसिपी डोक्यात घोळू लागल्या. अशा वेळी सिंघासन मधली रेसिपी आठवणे आणि तो सिनेमा बघणे हे ओघाने आलेच. तरी दोन जितेंद्र एक प्राण,
दोन राज्ये कारस्थाने बेसुमार,
एक राजकन्या एक विषकन्या,
शक्ती कपूर अमजद खान आपले चन्या मन्या
बॉलिवूडच्या चित्रपटांचा रसास्वाद घेतल्यानंतर हॉलिवूडची मुलुखगिरी करण्याचा मोह होणे स्वाभाविक आहे. अगदी ऐश्वर्या, प्रियांका या मोहात अडकल्या तर आमची कथाच ती काय! तरी सेफ जॉनर म्हणून रसग्रहणाकरिता हॉरर बघण्याचे ठरवले. हॉरिबल आयडिया! त्यानुसार लेप्रेकॉन रिटर्न्स नामे हा महान चित्रपट बघण्यात आला आणि यात महान काय आहे हे तुमच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी हा प्रपंच!
०) पूर्वपीठिका
हातिम ताई हा एक चमत्कारिक चित्रपट आहे. त्यात चमत्कृतिपूर्ण गोष्टी घडतात म्हणून नव्हे तर त्याच्या शैलीस प्रतिकूल अशा वर्षी प्रदर्शित होऊनसुद्धा त्याने बर्यापैकी गल्ला जमवला म्हणून (वेगवेगळे सोर्सेस वेगवेगळे आकडे सांगत असले तरी १९९० साली याने किमान १ कोटींचा गल्ला जमवला यावर त्यांचे एकमत दिसते). असा हा विशेष सिनेमा अभ्यासायचा म्हणजे काही पूर्वाभ्यास गरजेचा आहे. तरी यावेळेस सेक्शन्सना सेक्शन ० पूर्वाभ्यास पासून सुरुवात होईल.
०) पूर्वाभ्यास
०.०) हातिम ताई : ओरिजिनल स्लमडॉग मिलिएनेअर
१९८१ साली इंडियाना जोन्स अॅन्ड रेडर्स ऑफ द लॉस्ट आर्क आला आणि अचानक खजिना-शोध या जॉनरला नवचैतन्य प्राप्त जाहले. त्याला फॉलो अप म्हणून स्पीलबर्गने १९८४ साली टेंपल ऑफ डूम रिलीज केला. एवढे होत असताना बॉलिवूडने मागे राहणे हे बॉलिवूडच्या शान के खिलाफ असल्याने कोणीतरी हे फेकलेले गाँटलेट उचलणे गरजेचे होते. त्यात प्रश्न आंतरराष्ट्रीय दर्जाचा असल्याने आंतरराष्ट्रीय प्रेक्षकाला रुचेल असा सिनेमा बनवण्याचा अनुभव असणेही गरजेचे होते. म्हणून "लव्ह इन टोकियो" मधून जपानी लोकांना आशा पारेख जपानी आहे हे पटवून देण्याचे महान कार्य करणार्या प्रमोद चक्रवर्तीने त्याच वर्षी जागीर नामे चित्रकलाकृती निर्मिली.