अचाट

गैर कानूनी धावता संयुक्त रिव्यू : अचाट आणि अतर्क्य कथा कशी लिहावी?

Submitted by पायस on 8 November, 2017 - 15:56

गैर कानूनी अचाट आणि अतर्क्य सिनेमांच्या वाटेतला महत्त्वाचा टप्पा आहे. प्रत्येक दशकाची अचाटपणाची आपली वेगळी स्टाईल आहे आणि क्वचितच एखाद्या चित्रपटात एकापेक्षा जास्त स्टाईल्स बघायला मिळतात. गैर कानूनी तो चित्रपट आहे. या विशेषतेमुळे ही अचाट आणि अतर्क्य लेखकांची कार्यशाळा आहे असे म्हणणे योग्य ठरेल. ऐलान-ए-जंगप्रमाणेच हा रिव्यू क्राऊडसोर्स करत आहे. यात तुम्हाला हवी तशी भर घाला.

विषय: 

ऐलान-ए-जंगः एक धावता संयुक्त रिव्यू

Submitted by फारएण्ड on 4 August, 2017 - 10:51

ऐलान-ए-जंग या अजरामर चित्रपटाबद्दल आपली मते येथे लिहा. हा रिव्यू क्राउडसोर्सिंग सारखा लिहू. म्हणजे सर्वांना त्यात लिहीता येइल. गेल्या २-३ दिवसांत इतर बाफ वर अनेकांनी तुकड्या तुकड्यांत या चित्रपटातील सीन्स बद्दल लिहीले आहे. त्यांनी ते इथे परत लिहा, आणि इतरांनाही त्यात भर घालता यावे म्हणून असा बाफ उघडत आहे.

इतर चित्रपटांबद्दल स्वतंत्र बाफ आहेत तेव्हा त्याबद्दल इथे लिहून हे डायल्यूट करू नका Happy

विषय: 

तहलका - डाँगच्या सेल्फ-रायचसनेसची कहाणी

Submitted by श्रद्धा on 5 March, 2016 - 05:36

हिमालयाच्या दुर्गम पर्वतरांगामध्ये पाकिस्तान, भारत आणि चीन यांच्या मधोमध वसलेला आहे डाँगरिला आणि त्याचा हुकुमशहा आहे जनरल डाँग, जो 'कभी राँग नही होता'.. (म्हणून असे शीर्षक!) अमरीश पुरीला असले विचित्र दिसणारे व्हिलन साकारायची जबरी हौस असावी. मोगॅम्बो असताना तो सोनेरी विग घातला होता, इथे बाकी बरंचसं टक्कल ठेवून मागे शेंडीची लांबलचक वेणी घातली आहे. गायीम्हशी चरताना जशा माशा वारायला शेपटी उडवत असतात अगदी तशाच पद्धतीने डाँग आपली वेणी हाताने उडवताना दाखवलाय. आपण कधीच चुकीचं वागत नाही, हे माणसाने स्वतःच ठरवून टाकलं की तो जसा वागेल तसाच वागणारा हा डाँगआहे.

विषय: 

एक और अत्याचार

Submitted by पायस on 10 January, 2015 - 06:04

महाभारतातली अभिमन्युची गोष्ट आठवते? अभिमन्युला फक्त चक्रव्युह फोडून आत कसे घुसायचे हे माहित होते पण परत बाहेर कसे यायचे हे माहित नव्हते. असे सांगितले जाते कि जेव्हा अभिमन्यु सुभद्रेच्या पोटात होता तेव्हा अर्जुनाने सुभद्रेला चक्रव्युह भेदाविषयी सांगितले होते जे याने पोटातून ऐकले आणि शिकून घेतले. पण सर्वज्ञ कृष्णाने चक्रव्युहातून बाहेर यायचा भाग येताच हस्तक्षेप करुन विधिलिखितामध्ये बदल टाळला. सांगायचा मुद्दा असा कि व्यासांनी गर्भ एखादी गोष्ट शिकु/लक्षात ठेवू शकतो हा झक्कास प्लॉट डिवाईस तेव्हाच देऊन ठेवलेला आहे.

विषय: 

विश्वात्मा - दोन व्याख्यांमधला संघर्ष

Submitted by श्रद्धा on 16 June, 2014 - 08:30

'विश्वात्मा'मधल्या एका दृश्यात अमरीश पुरी ओरडतो, "मुझे वो डाई चाहिये डाई.." दॅट्स व्हाय, इन द एंड, ही डाईज! पण तो मुख्य मुद्दा नाही.
***
पहाडासारखा माणूस सनी देओल (हिमालयासारखा लिहिणार होते पण हिमालय दासानीशी आपली तुलना होणे धर्मेंद्रपुत्रास रुचले नाही तर??? अडीच किलोचा एकेक हात! असो.) हा पहाडांमध्ये राहायला गेल्याने इकडे शहरात वेताळटेकड्या माजतात आणि धुडगूस घालू लागतात. इकडे सनी 'मनोहर देव' नावाच्या अतिमवाळ नाव असलेल्या अतिजहाल डाकूला पिटण्यात मग्न! पण तोही मुख्य मुद्दा नाही.
***

विषय: 

शार्कनेडो - प्यार करे आरी चलवाये...

Submitted by फारएण्ड on 5 April, 2014 - 01:57

लॉस एंजेलिस च्या जवळ समुद्रात वादळ होते व टोर्नेडोज तयार होतात. पाण्यातील मासे त्याबरोबर उचलले जातात व एलए वर शार्क्सचा पाऊस पडतो. शब्दशः खुदा जब देता है स्टाईल ने छप्पर फाडके मासे पडतात. मग आपले हीरो, त्याचे जवळचे लोक व इतर मिळून ते टोर्नेडोज व मासे यांना कसे हरवतात ही स्टोरी. आता हे मासे म्युटेटेड वगैरे नाहीत. माशांसारखे मासे, फक्त वादळामुळे आकाशात उडून परत खाली पडतात. या ब्याकग्राउंड वर हा चित्रपट पाहावा. म्हणजे प्रत्येक महान स्टोरीटेलिंग मधे सामान्य लोकांची असामान्य कामे असतात तसे सामान्य माशांनी केलेल्या असामान्य गोष्टी तुम्हाला कळतील.

झटपट उत्क्रांती -

विषय: 

मोहब्बतें - गुरू नॉट कूल

Submitted by फारएण्ड on 16 June, 2013 - 22:02

ज्याचे खरे नाव 'गुरू नॉट कूल' असायला हवे, अशा गुरूकूल नावाच्या कडक स्कूल बद्दल हा चित्रपट आहे. कडक म्हणजे अभ्यास किती कडक करावा लागतो ते माहीत नाही. आख्ख्या चित्रपटभर एकही वर्ग दाखवलेला नाही, कोणी अभ्यास करतानाही दाखवलेले नाही. पण येथील संचालक अधूनमधून सगळ्यांना हॉल मधे राउंड अप करून रागीट चेहर्‍याने ‘परंपरा और अनुशासन’ शिकवतो. भाषा अशी की तुलनेत उत्तर प्रदेश भाजप चे अध्यक्ष हाय फाय इंग्रजी बोलत असतील असे वाटावे. कडकपणा एवढाच.

विषय: 

तिरंगा

Submitted by फारएण्ड on 19 April, 2013 - 03:25

कलाकारांची ओळखः हीरो लोकः
हीरो-१: नाना- सतत वैतागलेला. उसूल "पहले लात (लाथ), फिर मुलाकात, फिर बात"
हीरो-२: राजकुमार - चेहरा व मिशी यांच्या अलाइनमेंटमधे पृथ्वीच्या अक्षासारखा फरक. मेकअप टीमने डोळ्यावर पट्टी बांधून त्याच्या चेहर्‍यावर मिशी लावण्याचा खेळ खेळलेला केलेला आहे (चित्रातील गाढवाला शेपटी लावतात तसे) असे सतत वाटणारा. उसूल "पहले मुलाकात, फिर बात, फिर जरूरत पडे तो लात"
हीरॉइन्स - हरीश, ममता,कुलकर्णी आणि वर्षा उसगावकर ("इसे समझो ना रेशम का तार भैय्या")
चरित्र ई. अभिनेते - आलोक नाथ व सुरेश ओबेरॉय तर
व्हिलन्सः

विषय: 

इमान धरम

Submitted by श्रद्धा on 22 February, 2012 - 01:25

हा चित्रपट अमिताबच्चन आणि शशीकपूर यांच्या बालपणापासून सुरू होत नाही. पहिल्याच सीनमध्ये ते थेट मोठेच्यामोठे आणि कामाला लागलेले दिसतात. खरंतर चित्रपटातली सगळी परिस्थिती 'निरुपा इन व्हाईट सारी'ला इतकी अनुकूल आहे की, तिची उणीव फार जाणवली. तर ते असो.

विषय: 

फरिश्ते

Submitted by फारएण्ड on 27 November, 2011 - 11:30

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर खालसा करायचे राहून गेलेल्या एका संस्थानातील ही कथा आहे. सदाशिव अमरापूरकर तेथील राजा असतो. त्याचा रथ, ड्रेस आणि हेअरस्टाईल पाहून जे कोण त्याच्याशी वाटाघाटीला आले असतील ते बहुधा "नॉट वर्थ इट" शेरा मारून तेथून निघून गेले असतील. हा राजा जनतेवर कसलेही मोटिव्ह नसलेले अन्याय करत असतो. त्यात तो तेथे भारताचा झेंडा लावू देत नसतो. एका अन्यायानंतर तेथील जनता - म्हणजे ए के हनगल- खुदाकडे कोणीतरी पाठवण्याची विनंती करते.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - अचाट