जितूजींचे फिल्मी कारनामे
Submitted by फारएण्ड on 11 April, 2023 - 13:44
परवाच जितूजींचा बड्डे झाला. मधे त्याची काही गाणी बघत होतो. तीही त्यात जितू आहे म्हणून नाही तर इतरच कारणांनी. (थांबा थांबा. मी हिम्मतवाला, मवाली बद्दल म्हणत नाहीये. 'ये मुलाकात एक बहाना है' सारखी गाणी ऐकायला छान आहेत म्हणून लावली होती). तेव्हा जाणवले की जितेंद्रच्या पिक्चर्स मधे असंख्य पिक्चर्स असे होते की त्याचे जिच्याशी प्रेम जमले तिच्याशी त्याचे क्वचितच लग्न व्हायचे. त्यामुळे एखाद्या आनंदी गाण्यात ती "एक्स" रडताना दिसते.
विषय: