चित्रपट

दाक्षिणात्य सिनेमा कसा वाटला.

Submitted by mrunali.samad on 9 March, 2023 - 06:23

या धाग्यात आपण तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड, हिंदी डब्ड/वीथ सबटायटल्स पाहिलेले सिनेमा, कसा वाटला,कुठे पाहिला याची चर्चा करू शकतो.

अ-शोक सम्राट

Submitted by आशूडी on 28 February, 2023 - 02:56

आज मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने, मराठी मनावर गेली पन्नास वर्षे तरी आपल्या आगळ्या वेगळ्या विनोदाची मोहोर ठसवून हसवत ठेवणाऱ्या अशोक सराफ या नटवराला नमन करावेसे वाटले. यंदा पंच्याहत्तरी गाठलेल्या त्यांना खरंतर आदराने, मानाने नटवर्य म्हणावे लागेल पण त्यांच्या खट्याळ विनोदी भूमिकांचा विचार करता 'नटवर' च जास्त जवळचे वाटेल. त्यांचा जन्म कधी कुठे झाला , मग शिक्षण नोकरी आणि रुपेरी पडद्यापर्यंतचा प्रवास ही अभ्यासपूर्ण माहिती आपल्याला इंटरनेटवर मिळूच शकते त्यामुळे त्या तपशीलात न जाता या लेखात मी फक्त मला भावलेला अशोक सराफ शब्दात मांडण्याचा प्रयत्न करणार आहे.

मराठी भाषा गौरव दिन - लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया - anudon - उंबरठा

Submitted by anudon on 28 February, 2023 - 01:22

उंबरठा म्हटलं की ती आठवते, तिच्यासाठी नसलेलं तिचं घर आठवतं! जवळपास ३८ वर्षांआधी पडद्यावर साकारलेली तिची जेमतेम दोन तासांची गोष्ट आठवते!

सुरुवातीच्या एका मिनिटभरात भरलेल्या घरात ती आतून रिकामी आहे हे तिच्या १/२ अस्फुट वाक्यांवरुन खोलवर जाणवतं. तिचा वावर घरभर आहे पण तिची स्वत:ची अशी जागा ती शोधते आहे. कधी बाहेरच्या बागेतल्या पाळण्यावर, तर पोर्चच्या बाजूच्या बाकावर.

विषय: 

मराठी भाषा गौरव दिन- लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया -एमरल्ड -घो मला असला हवा

Submitted by -शर्वरी- on 27 February, 2023 - 04:17

‘घो मला असला हवा’ हा सुमित्रा भावे आणि सुनिल सुकथनकर या द्वयींचा२००९ चा चित्रपट. फारसा जुना नाही आणि त्यांच्या नेहेमीच्या जॅानरपेक्षा जरा वेगळ्या प्रकारात मोडणारा. मी भावे-सुकथनकरांचे चित्रपट चुकवत नाही. हा सुद्धा चुकवु नये या कॅटेगरीतलाच पिक्चर आहे.

विषय: 

मराठी भाषा गौरव दिन- लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया - पायस - हिरवं कुंकू

Submitted by पायस on 25 February, 2023 - 18:52

भारतातील आद्य चित्रपटसृष्टी असूनही जुने विनोदी चित्रपट वगळता मराठी चित्रपटसृष्टी ही आंतरजालावर काहीशी दुर्लक्षितच राहिली आहे. वेस्ट इंडिज क्रिकेट आणि मराठी चित्रपट यामध्ये हे विलक्षण साम्य आहे - काय ते ७०-८० च्या दशकातले वेगवान गोलंदाज होते/काय ते ७०-८० च्या दशकातले खळखळून हसवणारे विनोदी चित्रपट होते! अस्मादिकांच्या मते याचे एक कारण आपले अनेक पटकथाकार अमूर्त अभिव्यक्तीवादी (abstract expressionist) आहेत.

मराठी भाषा गौरव दिन- लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया- वावे- चित्रपट वास्तुपुरुष

Submitted by वावे on 25 February, 2023 - 13:26

सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर या द्वयीने जे अनेक उत्तमोत्तम चित्रपट निर्माण केले, त्यांपैकी एक अतिशय उत्कृष्ट चित्रपट म्हणजे ’वास्तुपुरुष’. यातले प्रमुख कलाकार आहेत उत्तरा बावकर, सदाशिव अमरापूरकर, अतुल कुलकर्णी, रविंद्र मंकणी, रेणुका दफ्तरदार आणि सिद्धार्थ दफ्तरदार.

डॉ. भास्कर नारायण देशपांडे (महेश एलकुंचवार) यांना ’प्रिव्हेन्टिव्ह मेडिसिन’ या क्षेत्रात त्यांनी मुंबईच्या झोपडपट्टीत केलेल्या कामासाठी मॅगसेसे पुरस्कार जाहीर होतो, या बिंदूवर हा चित्रपट सुरू होतो आणि मग डॉ. भास्कर देशपांड्यांच्या स्मृतींमधून या चित्रपटाची कथा उलगडत जाते.

मराठी भाषा गौरव दिन - लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया - सामो - अपराध

Submitted by सामो on 25 February, 2023 - 09:33

कमालीचे सकस कथाबीज/ पटकथा, सशक्त अभिनय, अतिशय कर्णमधुर गाणी, आणि बावनकशी दिग्दर्शन अशा एका मराठी चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर मला मागे जावे लागेल. याची कारणे दोन. मी तितकेसे चित्रपट पाहात नाही आणि आजकालचे बरेचसे सिनेमे मला विशेष आवडत नाहीत. लहानपणीची मराठी व हिंदी चित्रपटांची रेशनिंगचे मजा औरच होती. रविवारी साप्तहिकी पाहून त्या त्या आठवड्याचे कार्यक्रम कळत असता आणि मग शनिवार-रविवारची वाट पाहण्याची उत्सुकता लागे.

विषय: 

चित्रपट परीचय-- फ्री गाय

Submitted by मी रावसाहेब on 21 February, 2023 - 06:01

नमस्कार् मंडळी!!
काल स्टार मुव्हीज वर एक मस्त चित्रपट बघितला आणि वाटले की त्याची ओळख करुन द्यावी. तर हा चित्रपट म्हणजे "फ्री गाय" चित्रपटाची गोष्ट साधारण्पणे अशी----

विषय: 
शब्दखुणा: 

कलाकाराचा ब्रॅण्ड म्हणजे काय ? एका माणसाच्या नावावर चित्रपट चालतो का ?

Submitted by ढंपस टंपू on 1 February, 2023 - 05:46

कोणत्याही एका कलाकाराचा ब्रॅण्ड बनवतात हे खरं आहे का ? चित्रपट व्यवसायाची असे काही शास्त्र असते का ?
तसे असेल तर ग्रॅव्हिटी, ज्युरासिक पार्क, इंडीयाना जोन्स, इंटरस्टेलार, अवतार, दा विन्ची कोड, पाकिजा, जंजीर इत्यादी अनेक चित्रपट कसे काय चालले असतील ?
ज्यांचा ब्रॅण्ड आहे त्यांचे झिरो, फॅन, लालसिंग चढ्ढा, रनवे ३४ , शमशेरा , रा वन , गुड्डू, जमाना दिवाना, ओ डार्लिंग ये है इंडीआस, स्वदेश असे चित्रपट डिझास्टर का झाले असतील ?

विषय: 
शब्दखुणा: 

मिशन मजनू सिनेमाच्या निमित्ताने

Submitted by ती पुन्हा गाईल on 21 January, 2023 - 23:48

मिशन मजनू हा सिनेमा नेफिवर प्रदर्शित झाला आहे. चिकवा धाग्यावर लिहीताना या निमित्ताने काही संदर्भ दिले. ते चिकवावर असावेत कि नाहीत या शंकेमुळे स्वतंत्र धाग्याचे प्रयोजन.

अलिकडे रॉ च्या आंतरराष्ट्रीय ऑपरेशन्स बद्दल डझनावारी सिनेमे आले. यात मुख्य भूमिकेत अक्षयकुमार होता तर सपोर्टिंग भूमिकात कुमुद मिश्रासहीत कधी अनुपम खेर तर अन्य काही ठराविक कलाकार दिसत. अगदी बॉण्डपटात एमशी संबंधित चेहरे दिसावेत तसे कलाकार फिक्स असत.

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - चित्रपट