पोन्नियिन सेल्वन पाहण्याआधी हे वाचा - पी एस फॉर डमीज
Submitted by हरचंद पालव on 6 May, 2023 - 11:33
पोन्नियिन सेल्वन या चित्रपटावर गेल्या काही दिवसांत झालेली चर्चा पाहता अतिपरिचयात् अवज्ञा होण्याचा धोका आहे, किंबहुना ती झालीच आहे. विशेषतः चित्रपटाच्या पहिल्या भागात नवीन लोकांसाठी त्यांनी पात्रांची ओळख परेड व्यवस्थित पार न पाडल्यामुळे पंचाईत होते हे मान्य आहे. पण तरीही या चित्रपटाची पार्श्वभूमी माहीत असल्यामुळे जी मजा आली, ती पाहता हा आनंद इतरांनाही घेता यावा या उद्देशाने अगदी थोडक्यात पार्श्वभूमी लिहायची ठरवली आहे. सविस्तर चर्चा खाली करता येईलच, पण लेखात ही ओळख शक्य तितकी संक्षिप्त आणि सुटसुटीत लिहायचा आम्ही प्रयत्न करू. अगदी फार कुठे जाऊन अभ्यास करायची गरज नाही.
शब्दखुणा: