एसी गाडीच्या काचा बंद करून
दुतर्फा दिव्यांनी लखलखलेल्या
शहरी रस्त्यांवरून जाताना
कडेला उभी दिसतात
झाडे
मुकी अबोल, काही न सांगणारी
मनातलं मनातच ठेवणारी
इथल्या माणसांसारखीच
पण रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या
प्रत्येक झाडाच्या आत
वसतंय एक अख्खं जंगल
बेबंद बहरलेलं आतल्या आत
कधी जवळ जाऊ नये
गाडीतून उतरून पाहू नये
सांभाळावं, कारण
जर झालाच स्पर्श
ह्या जंगलाचा
त्या जंगलाला
उधळून जाईल क्षणार्धात
हा पट बेगडी नागरतेचा
आणि उरेल फक्त आदिम सत्य
पप्पऽमगरिसा
“माझ्या संग चांदणं ही”
हे माझं नवं गाणं रिलीज झालं आहे. एकदा नक्की बघा आणि गाणं कसं वाटलं सांगा.
https://youtu.be/wFyTCuCXdPs?si=u2k7pzivz-u5yW9i
सपनानं तुझ्या मन रातभर व्यापलं
माझ्यासंग चांदणं ही रातभर जागलं
कंकण आवाज
पैजणाचं नाद
रातभर घुमे
सखे तुझी साद
असं कसं राती मला आगळच वाटलं.
माझ्यासंग चांदणं ही रातभर जागलं.
"भारतीय सिनेमातील स्टार सिस्टीम"
.
धुंडिराज गोविंद फाळके ऊर्फ दादासाहेब फाळके यांनी (हिंदुस्थान फिल्म कंपनी च्या माध्यमातून) निर्मिलेला हा मराठी व भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील आद्य चित्रपट, पहिला भारतीय मूक चित्रपट , राजा हरिश्र्चंद्र हा ०३ मे १९१३ रोजी मुंबई येथील कॉरोनेशन चित्रपटगृहात प्रदर्शित झाला, आणि भारतीय चित्रपट सृष्टीचा पाया घातला गेला.
भारतीय इतिहासातील ही एक महत्वाची घटना, म्हणावी लागेल.
मुळात चित्रपट कला , तिची विविध अंगे ही भारतीयांना नवीन होती.
(या धाग्याचं शीर्षक मी आधी 'विथ अ लिट्ल बिट ऑफ लक' असं ठरवलं होतं. पण माय फेअर लेडी या कलाकृतीविषयी इथे सर्वांनाच चर्चा करता यावी याकरिता मी धाग्याचं शीर्षक बदललं. पण लेखाचं मूळ शीर्षक खाली लिहीत आहे.)
----------------------------------------
विथ अ लिट्ल बिट ऑफ लक
गोल्डी: अरे शैलेंद्रजी, नमस्ते, कधी आलात तुम्ही?
शैलेंद्र: नमस्ते गोल्डी सहाब, अर्धा पाऊण तास झाला असेल. बर्मनदा येतायत ना?
गोल्डी: हां हां, आते ही होंगे, त्यांच्या कलकत्ता मीठा पानाचा डबा आणून ठेवलाय भाई… ये लो…आ गये दादा..
बर्मनदा: शुभो प्रभात भद्रलोक. सॉरी लेट झाला.
गोल्डी: कोई बात नहीं दादा, सुरुवात करू या?
शैलेंद्र: बिलकुल.
आधीचा धागा भरला म्हणून हा नवीन धागा.
नवीन प्रदर्शित होणार्या चित्रपटांच्या ट्रेलरवर चर्चा करायला हा धागा.
मराठी, हिंदी, ईंग्लिश तिन्ही भाषेतील चित्रपट याच धाग्यात चालतील.
चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आणि बघितल्यावर मात्र चित्रपट कसा वाटला हा धागा वापरा 
जुना धागा ईथे - https://www.maayboli.com/node/61689
"12th FAIL" हा ऑक्टोबर 2023 मध्ये रिलीज झालेला आणि परवा "डिस्ने + हॉटस्टार" वर रिलीज झालेला चित्रपट, मनोज कुमार शर्मा, IPS आणि श्रद्धा जोशी- शर्मा, IRS यांच्या जीवनावर आधारित "अनुराग पाठक" यांच्या 2019 च्या त्याच नावाच्या पुस्तकावर आधारित आहे. थोडेफार या चित्रपटाबद्दल मी ऐकून होतो आणि IMDB वर त्याला 10 पैकी 9 रेटिंग आहे हे बघितले आणि इंटरनेटवर वाचण्यात आले की मर्यादित चित्रपटगृहात रिलीज होऊनही माऊथ पब्लिसिटी मिळाल्याने याचे शो वाढवण्यात आले होते आणि डायरेक्टर "विधू विनोद चोप्रा" असल्याने चित्रपट बघण्याची उत्सुकता वाढत गेली.
खरतर मला चित्रपट पाहायचा तसा फार मोह नाही. पण कधी कधी एखाद दृश्य बघताना जर त्यातील काहीतरी नवीन वाटलं तर निश्चितच मी चित्रपट बघतो. ठरवून असं मुद्दामच नाही. परवा असाच एका दाक्षिणात्य चित्रपटाचा एक सिन पाहिला. थोडं काहीतरी वेगळं वाटलं म्हणून चित्रपट पण पाहिला. अप्रतिम ..! त्याची कथा तर अप्रतिम होतीच , अभिनय हि अप्रतिम होता. अर्थात मी तो हिंदीमध्ये भाषांतरित केलेला पाहिला होता. आणि नावही माहित नव्हतं. त्यातील अभिनेते ओळखीचेवाटले पण त्यांची नावे माहित नव्हती. मला कथानक खूप आवडलं. त्यातील सुरुवात आणि शेवट मला नाही पाहता आला , पण आता तो शोधावा कसा हा मोठा प्रश्न होता.
कविता लिहायच्या, आपणच खर्च करून कवितासंग्रह काढायचा आणि पुस्तकाच्या दुकानात पुस्तक विकायला ठेवा म्हणून विचारायला गेलं तर “कवितेची पुस्तक कुणी घेत नाहीत म्हणून,” उत्तर मिळणार, मग आपली पुस्तकं आपणच लोकपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करायचा. काही जण विकत घेतातही काही अशीच ज्यांना आपण पुस्तक देतो ते तरी वाचतात की नाही हा प्रश्न? जर लोकं आपल्या कविता वाचणार नसतील तर का लिहायच्या कविता? हा प्रश्न बरेच दिवस डोक्यात घोळत होता, त्यापेक्षा आपण गद्य लेखन केलेलं बरं. गद्य लेखन जरा बऱ्यापैकी जमायला लागलं, लोकांना आवडत ही होतं.
मैलाचे दगड कसे असतात तुम्हाला माहिती आहेच. ते नसले तर तुमचा प्रवास काही थांबत नाही. पण असलेच तर तुम्हाला गंतव्यस्थानी पोहोचायला थोडी मदत होते. रफीची गाणी उत्तम ठरण्यासाठी त्यावर कुणी चांगला अभिनय केलाच पाहिजे अशी काही गरज नव्हती. पण काही दगडांनी आपल्या न-अभिनयाने रफीच्या जीव ओतून गाण्याकडे आपले लक्ष वेधून घेतले. म्हणजे मॉडेल्सनी चेहरे कोरे ठेवले कि त्यांच्या अंगावरच्या कपडे किंवा दागिन्यांकडे आपले लक्ष जास्त जाते तसेच काहीसं…..
पहिला मानाचा दगड आहे 'प्रदीप कुमार'. गाणं - 'हम इंतज़ार करेंगे'.