गोल्डी: अरे शैलेंद्रजी, नमस्ते, कधी आलात तुम्ही?
शैलेंद्र: नमस्ते गोल्डी सहाब, अर्धा पाऊण तास झाला असेल. बर्मनदा येतायत ना?
गोल्डी: हां हां, आते ही होंगे, त्यांच्या कलकत्ता मीठा पानाचा डबा आणून ठेवलाय भाई… ये लो…आ गये दादा..
बर्मनदा: शुभो प्रभात भद्रलोक. सॉरी लेट झाला.
गोल्डी: कोई बात नहीं दादा, सुरुवात करू या?
शैलेंद्र: बिलकुल.
बंगाली भाषेतले लेखक ' ताराशंकर बंदोपाध्याय ' यांची कादंबरी 'आरोग्य निकेतन ' मधील नायक जिबोन मोशाय नाडी वैद्य आहे. तो रुग्णांची नाडी पाहून आजार सांगत असतो. त्याला नाडीमध्ये मृत्यूचा आवाज ऐकू येतो. आपल्या स्वत:च्या मृत्यूच्या आवाजाबद्दल बोलतांना तो म्हणतो, " मृत्यूने पायात पैंजणं घातली आहेत, सध्या ती शेताच्या
बांधावरुन हळू-हळू चालत येत आहे, हळू-हळू पैंजणांचा
आवाज मोठा होत चालला आहे..... आता अचानक पैं जणांचा आवाज कमी झालाय, ती (मृत्यु) माझ्या उशाजवळ येऊन थांबली तर नाही...? मृत्यु निशब्द आहे, कदाचित ती मला आपल्या मिठीत सामावून घेणार आहे असं वाटतंय...."