चिनाब पार करायला तिने उडी टाकलीय कारण तो वाट बघतोय तिची, नेहमीप्रमाणे. कालमेघांनी दाटलेला अवकाश, नदी रोरावते आहे पण तिला चैन कुठली? आयुष्यभरासाठी साथ तर गमावलीच आहे, हे जे चार क्षण मिळतात प्रेमाचे, त्यावरच तर जगतेय ना ती.
ती हातातल्या घड्याला विनंती करते आहे “घेऊन चल मला.”
पण कच्चं मडकं करणार तरी काय? हा रौद्र प्रवाह त्याचं अस्तित्व विरघळवून टाकायला कितीसा वेळ लावणार आहे? स्वतःच्या जीवाची पर्वाच नाही त्याला. ज्याला स्वतःची खात्री उरली नाही, त्याचा काय भरवसा, हे तिला कुठं समजतंय?
मनोज मोहिते
व्हर्जन वन
जावेद अख्तरांची एक कविता आहे, ‘गली बॉय’ या सिनेमात. शीर्षक, ‘दूरी’. रणवीर सिंग याने ती गायली आहे. संथ... सावकाश. मनाला धीर देत. मनाला सांभाळत. ‘म्हणायला जवळ आहोत, पण किती दूर आहोत. किती ही घालमेल आहे. तुझ्याशी दु:खही वाटून घेऊ शकत नाही. माझ्या क्षमतेच्या परेच ते. वाहते अश्रू पुसण्याचेही बळ ते नाही. ‘मै भी यही हूं, तुम भी यही हो, पर सच ये है, मै हूं कही, तुम कही हो...’
कहने को हम पास है पर
कितनी दूरी है
ये भी कैसी मजबूरी है
म्हणायला जवळ आहोत, पण किती दूर आहोत. अशी कशी ही घालमेल...
गाण्यांत आलेल्या बोटॅनिकल उल्लेखांची यादी आपण पूर्वी केली.
मायबोलीकर ऋतुराज यांनी 'झाडंफुलं झाली, आता प्राणी/पक्षी/कीटक वगैरेही हवेत' असं सुचवलं. त्यावरून हा धागा काढत आहे, त्यामुळे या धाग्याचं श्रेय ऋतुराज यांचं. 
पडद्यावरचा अभिनेता / त्री आणि गायक - गायिका यांची भट्टी जमल्याची कैक उदाहरणे आहेत. मुकेश गेले तेव्हां राज कपूरने माझा आवाज गेला असं म्हटलं होतं. (मुकेश आणि राज कपूर यांची गायकी सुद्धा मिळती जुळती आहे). अनेक गाणी (विशेषत: मोहम्मद रफी) ऐकताना सुद्धा अभिनेता डोळ्यासमोर उभा राहतो. गायक त्या आभिनेत्याचा आवाज कॉपी करत नसत, तर त्याचं व्यक्तीमत्व जसं आहे त्याला अनुसरून आवाज देत.
उन्हाळ्यातल्या एका शांत निवांत दुपारी तुम्ही सुस्तावलेले असता.
तुम्हाला काहीतरी संथ, निर्मल आणि सुंदर, माफक विनोदी काहीतरी पाहण्याची हुक्की येते.
बीबीसी ची detectorists तुम्ही ऑलरेडी दहा वेळा पाहिलेली असते. मग तुम्ही त्याच जातीची त्याच लोकांची दुसरी एखादी सिरीज शोधून काढता.
Do not forget the driver.
तुम्ही गुंतत जाता आणि हळू हळू शेवटाकडे येता.
नेहमीचा अख्या स्मूथ चवीचा जास्त कडसर नसलेला एखादा लागर भरून घेता. थोडे खारे शेंगदाणे.
सीरीज संपताना शेवटी इथिओपियन जॅझचे सूर हळू हळू तुम्हाला घेरून टाकतात. नावच त्या गाण्याचे Nostaligia असते.
हिंदी चित्रपटांमधील काही गाणी अजरामर आहेत. ती कितीही जुनी झाली तरी ताजीतवानीच राहतात आणि रसिकांना कायमच भुरळ घालतात. किशोरकुमार हे चित्रसृष्टीमधील एक आघाडीचे गायक. अनेक प्रकारांमधली गाणी गाण्यात त्यांचा हातखंडा होता. अनेक गायकांबाबत रसिकांच्या विशिष्ट आवडीनिवडी असतात. तरी पण किशोरकुमारने गायलेली कुठली ना कुठली गीते प्रत्येक गानरसिकाला आवडतातच. असेच एक गाजलेले गाणे म्हणजे सगिना चित्रपटातील,
साला मैं तो साहब बन गया. . .
यंदा त्या गाण्याने आपली पन्नाशी पूर्ण केलेली असल्यामुळे त्याची ही आठवण आणि त्यानिमित्ताने संबंधित मूळ चित्रपटाचा हा अल्प परिचय.
दरबार हे युट्युब वरील शास्त्रीय संगीताच्या जाणकार चाहत्यांसाठी एक महत्वाचे चॅनेल आहे. ह्यांचे अॅप पण आहे. काल परवात एक लिंक अचानक समोर आली व तिने झपाटून टाकले. दोन तीन दा व्हिडिओ बघितला मग हेड फोन लावुन पंधरा वेळा तरी ऐकले पण मन तृप्त होईना. वन ऑफ माय फेवरिट्स झाले आहे.
सध्या वारीचा माहौल आहे म्हणून दर्दी माबोकरांसाठी लिंक देत आहे.
सध्या ऐकत असलेला एखाद्या गाण्याचा, मैफिलीचा, रागाचा दृक्श्राव्य दुवा, त्यातलं तुम्हाला आवडलेलं सौन्दर्यस्थळ, नवे गायक/गायिका यांचे दुवे. त्यातलं तुम्हाला काय आवडलं किंवा आवडलं नाही, याची देवाणघेवाण/ चर्चा करायला धागा.
दुवे नसतील तर तुम्हाला प्रत्यक्ष बघितलेल्या कार्यक्रमांचे शब्दचित्र काढायला ही हरकत नाही.
धागा हिंदुस्थानी शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीतापुरता मर्यादित ठेवू, आणि फक्त दुव्यांची देवाण घेवाण करण्याऐवजी थोडे तुमचं विचार ही लिहिता आले तर आपल्याला न जाणवलेल्या/ समजलेल्या गोष्टी नव्याने समजुन ते गाणं परत ऐकताना आणखी वेगळे आयाम मिळत रहातात.
आमची ओळख नक्की कधी कशी झाली हे नीट सांगता येणार नाही, पण ओळख होईल असं वातावरण मात्र