चित्रपटसंगीतातील खाद्यपदार्थ

Submitted by स्वाती_आंबोळे on 18 February, 2025 - 19:51

तुम्हाला आठवत असेल तर दोनतीन वर्षांमागे आपण या प्रकारचे हे खेळ खेळलो होतो:

१. चित्रपटसंगीत आणि बॉटनी
२. चित्रपटसंगीत आणि व्यवसाय
३. चित्रपटसंगीत आणि भूगोल
४. चित्रपटसंगीत आणि कालगणना

आज सहज या कॅटेगरीतला हा नवीन विषय सुचला. हिंदी/मराठी चित्रपटसंगीतात आलेले खाद्यपदार्थांचे उल्लेख.
फक्त पथ्य एकच - पदार्थात काहीतरी प्रक्रिया केलेली हवी, म्हणजे नुसतीच फळांची नावं किंवा विड्याबिड्याची पानं ऑलरेडी बॉटनीच्या धाग्यात येऊन गेली आहेत तर ती नकोत, नुसताच दुधाचा उल्लेख नको.

सुरुवात करून द्यायला ही मला आठवलेली गाणी:

मराठी
१. यमुनाजळासी जासी मुकुंदा, दध्योदन भक्षी... घनश्याम सुंदरा
२. डोइवर पाटी, पाटीत भाकरी, भाकरीवर तांब्या, तांब्यात दुध हाये गायीचं, घेता का दाजीबा वाइच... काय गं सखू
३. आधी हाताला चटके, तेव्हा मिळते भाकर... अरे संसार संसार
४. सण वर्षाचा आहे दिवाळी, आज राहू जाऊ उद्या सकाळी, जेवण करते पुरणाची पोळी, भात मी घातलाय रांधायला हो येऊ कशी तशी मी नांदायला
५. मिष्टान्ने कोठुन?! आणला कणीकोंडा रांधुन, सांगे आवर्जुन भाबडी विदुराची सुगरण... वानी रुचकरपणा, श्रीहरी विदुराघरी पाहुणा
६. अस्सावा सुंदर चॉकलेटचा बंगला

हिंदी
१. चंदामामा दूर के पुए पकाए बूर के
२. क्यों न रोटियों का पेड हम लगा लें, आम तोडे, रोटी तोडे, रोटी आम खा लें, रोज रोज करती है क्यूँ ये झमेला... मुन्ना बडा प्यारा
३. आहें ना भर ठंडी ठंडी, खतरे की है ये ठंडी के गरम गरम चाय पी ले
४. दफ्तर को देर हो गयी, मुझे जल्दी से कॉफी पिलाना (यात तर रेसिपी पण आहे! Lol )
५. टॉफी, चूरण, खेलखिलौने, कुलचे, नान, पराठा, कर गये टाटा जब से बापू तूने डाँटा... बापू सेहत के लिये
६. जलेबीबाई!

तुम्हाला कुठली आठवतायत? Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१. जब तक रहेगा समोसे में आलू, चिपकी रहेगी तुझसे ये शालू
२. मैं तो रस्तेसे जा रहा था, मैं तो भेलपूरी खा रहा था
३. चॉकलेट लाईमज्यूस आईस्क्रीम टॉफियां *
४. लौंगा इलाची का बीड़ा लगाया, अरे चाबे गोरी का यार बलम तरसे रंग बरसे
५. चली आना तू पान की दुकानपे साडेतीन बजे
६. मठरी वठरी लेके चले, चकली चिवडा ले के चले*
७. दही बड़े लो, मूड नहीं है, कुल्फी खालो,बहुत खा चुके,पान खालो, बहुत खा चुके, बहुत खा चुके, बहुत खा चुके, अजी रसमलाई, आपके लिए, इतनी मिठाई आपके लिए

८. घरमां जो ऐबे तो हमें क्या खिलबै
गरम गरम हलवा और पुरी पकवै
नरम नरम हातोंसे खाजा बालमां -टुरुंक - हे म्युझिक सहित.. Wink
९. अफगान जलेबी, माशूक फरेबी
१०. जलेबी बाई
११. एक गरम चाय की प्याली हो, कोई पिलाने वाली हो.
१२. बिकानेरी छोकरी संतरे के टोकरी, घर तो छुडवाया अब क्या छुडायेगी नौकरी.- परमसुंदरी -भेडिया

**बरजात्या खादाड आहेत एकंदरीत.

-अभिरुचीचा 'यो- यो' रसातळाला गेला आहे. Happy

ले लो भाई चिवडा ले लो
कळीदार कपोरी पान कोवळ छान केशरी चुना
चॉकलेट लाइम ज्यूस इस क्रीम toffiya....

हम आपके है कोण मधील दोन गाणी

चॉकलेट, लाइम ज्यूस, आइस्क्रीम,टौफ़ियाँ
पहले जैसे अब मेरे शौक़ हैं कहाँ..

जूते दे दो पैसे ले लो मधील एक कडवे....
कुछ ठंडा पी लो (मूड नहीं है)
दही बड़े लो (मूड नहीं है)
कुल्फी खा लो (बहुत खा चुके)
पान खा लो (बहुत खा चुके)
अजी रसमलाई (आपके लिए)
इतनी मिठाई (आपके लिए)
पहले जूते (खायेंगे क्या)
आपकी मर्जी (ना जी तौबा)...

मस्त धागा

अस्मिता, काय हा चौफेर व्यासंग! Lol
व्हनिला स्काय ते व्हनिला आइस्क्रीम! Proud

>>> प्रेमाला उपमा नाही
वाटच बघत होते हे कोण लिहितंय त्याची! Lol

ऋतुराज, बरेच पदार्थ आले की एकाच गाण्यात! Happy

एक ‘बटाटावडा’ असं पण गाणं आहे ना?

बटाटा वडा हे बटाटा वड़ा
दिल नहीं देना था देना पड़ा
बटाटा वडा हे बटाटा वड़ा
प्यार नहीं करना था करना पड़ा

हम आपके है कोण मधील अजून एक
दीदी तेरा देवर दिवाणा....

मैं बोली के लाना, तू इमली का दाना
मगर वो छुहारे ले आया दिवाना
मैं बोली की मचले, है दिल मेरा हाय
वो खरबुजा लाया जो नीम्बू मँगाये
पगला है कोई उसको बताना
हाय राम कुड़ियों को...

मैं बोली की लाना, तू मिट्टी पहाड़ी
मगर वो बताशे ले आया अनाड़ी
मैं बोली के ला दे, मुझे तू खटाई
वो बाज़ार से ले के आया मिठाई

रच्याकने, छुहारे म्हणजे नक्की काय?

खारीक

अरे, समझ ना मुझको ऐसा-वैसा
मेरे बटुए में है पैसा
तुझे खिलाऊँगा जी-भर के
गरम समोसा, इडली या डोसा
चल हट, तू मेरा है Pepsi-Cola
मैं तेरी हूँ Coca-Cola
टन-टना-टन-टन-टन-टारा
अरे, चलता है क्या नौ से १२?

व्हनिला स्काय ते व्हनिला आइस्क्रीम! >>> Lol तुझ्या दुकानाची बोहनी करत होते.

प्रेमाला उपमा नाही आणि बटाटावडा धमाल. ते इडली सांबार माहिती नव्हते. Happy

पुए पकाए बूर के.. म्हणजे काय?
Happy
हे मला चुकीची ऐकू येणारी गाणी मध्ये टाकायला पाहिजे होतं..
मी हुए पराए दूर से..असे काहीतरी म्हणायचे...

अभिरुचीचा 'यो- यो' रसातळाला गेला आहे >>> Lol

- गदिमांच्या "अंबिका माया जगदीश्वरी" या गाण्यात "चुका चाकवत केली भाजी, भावभक्तीची भाकर ताजी, लेक दरिद्री तुझी विनविते, आई भोजन करी" आहे.
- उठा उठा हो सकळीक मधे "...हाती मोदकांची वाटी"
- दशरथा, घे हे पायसदान मधे "करात घे ही सुवर्णस्थाली, दे राण्यांना क्षीर आतली"
- रघुपती राघव गजरी गजरी, तोडित बोरे शबरी
- ऐरणीच्या देवा तुला मधे "लेऊ लेणं गरिबीचं, चणं खाऊ लोखंडाचं" - इथे चणे हे उपमेच्या अर्थाने असले तरी Happy
- छबीदार छबी मधे " हितं वरणभाताची गोडी रं..... सार वरपती, रस्सा भुरकती, घरात पोळी अन् बाहेर नळी...." वगैरे बरेच पदार्थ आलेत Happy

शक्यतो नवीन पदार्थ शोधलेत Happy

वा वा, फा!
फक्त बोरं आणि चण्यांचे गुण कापावे लागतील. Proud

Happy ते प्रक्रियावाले वाक्य आत्ता वाचले. बाय द वे शबरीची बोरे उष्टी होती म्हणजे थोडी का होईना प्रक्रिया होती (अर्थात ती या गाण्यात फक्त तोडत आहे बोरे) Happy आणि चणे जर लोखंडाचे असतील तर त्यातही Happy

आती क्या खंडाला ...
लोनावला में चिक्की खायेंगे, वॉटरफॉल पे जायेंगे
खंडाला के घाट के ऊपर, फ़ोटू खींच के आयेंगे

मामाची बायको सुगरण
रोज रोज पोळी शिकरण
गुलाबजामुन खाऊया
मामाच्या गावाला जाऊया… (हे चित्रपट संगीत नसावे)

शायद मेरी शादी का ख्याल दिल में आया है
इसीलिए मम्मी ने मेरी, तुम्हें चाय पे बुलाया है
(चाय ची खूप गाणी असणार)

पिंजरा:
अवं हे गाव लई न्यारं, हितं थंडगार वारं
याला गरम शिणगार सोसंना

ह्याचा आदर्शाचा तोरा, ह्याचा कागद हाय कोरा
हितं शाहिरी लेखणी पोचंना

हितं वरण भाताची गोडी रं, नको फुकट छेडाछेदी रं
अरं सोंगा ढोंगाचा बाजार हिथला, साळसूद घालतोय अळीमिळी
अन्‌ सार वरपती, रसा भुरकती, घरात पोळी अन्‌ भायेर नळी

1. तेरे संग एक सिंपल सी कॉफी भी किक देती है
2. पण खाई सैया हमार
3. एक बगल मी चांद होगा एक बगल में रोटिया

मामाची बायको सुगरण
रोज रोज पोळी शिकरण
गुलाबजामून खाऊया..... मामाच्या गावाला जाऊया

*********************

सण वर्षाचा आज दिवाळी
आज राहू जाऊ उद्या सकाळी
जेवण करते पुरणाची पोळी
भात मी टाकलाय रांधायला हो येऊ अशी कशी मी नांदायला

बर्फि के सब रस ले लिया रे - चलत मुसफिर मोह लिया रे
तू रंग शरबतोंका मै मिठे गांठ का पानी

आणि मजेच्या परमावधीचं गाणं हवच -
रोजरोज पोळी शिक्रण - झुकुझुकु झुकुझुकु अगीन गाडी

पहिल्या धारेच्या प्रेमाने साला काळीज केलंय बाद
ही पोळी साजुक तुपातली तिला म्हावर्‍याचा लागलाय नाद

बाई गं केळेवाली मी सांगा तुम्हाला शोभंल का

जोराजोरी चने के खेत में

मज्जेची परमावधी>>> Lol मला सार्कास्टिक वाटायचे.

Happy फा ची यादी पवित्र आहे, पण मी धाग्याचे लेव्हल वर जाऊ देणार नाही बहुतेक.

लाल लाल लाल तापलाय तवा
सांग पोरी चपाती भाजलं कवा

फा ची यादी पवित्र आहे, पण मी धाग्याचे लेव्हल वर जाऊ देणार नाही बहुतेक.>>>>> Lol

>>> टनटन वाजलं मटन शिजलं
चालेल ना! Lol

>>> फा ची यादी पवित्र आहे
तो गाणी कभी ‘उस नजर से’ बघत नाही वाटतं. Proud

>>> बाई गं केळेवाली मी
बाद! प्रोसेस्ड /कुक्ड पदार्थ असं लिहिलंय ना ठळक?! Proud

Pages