संगीत
मोगरा फुलला!
काल काही कारणामुळे मन अस्थत्व झाले होते. youtube वर लताबाईंचे 'मोगरा फुलला' ऐकले अन फार बरे वाटले, जणु काही
फुलांचा सडा! साज, आवाज आणी भाव - अप्रतिम!
या गाण्या बद्दल तुमचे मत काय आहे? मूड ठीक करायला तुमची काही खास गाणी आहेत का?
बिथोवन(आणि मोझार्ट)-२
बिथोवन(आणि मोझार्ट)-२
"मोझार्टचं घर कुठे आहे?" एका वाटसरूला मी विचारलं.
" सरळ गेलास की सेंट कॅथेड्रल चर्च लागेल. त्याच्या बाजूला मोझार्टस् व्हिएन्ना नावाची इमारत आहे, ते त्याचं घर".
"डांके" मी म्हणालो आणि चालू लागलो. सेंट कॅथेड्रलची उंचच उंच इमारत दिसू लागली आणि तीस चाळीस घोड्या गाड्या एका इमारतीसमोर दिसल्या. इथेच असणार तो.
मी बिचकतच आत पाऊल टाकले. प्रचंड मोठा हॉल. दोन तीनशे माणसं असावीत. सगळ्यांचा मोठा आवाज हॉल मध्ये भरून राहिला होता आणि त्यांची लगबग चालली होती.
अहद-ए-वफ़ा… अहिस्ता...
हरीहरन हे नाव गाण्याची थोडी देखील आवड असणाऱ्याला माहित नाही असे होऊ शकत नाही. पार्श्वगायन हा जरी त्यांचा प्रांत असला तरी त्याव्यतिरिक्त त्यांनी अनेक उत्तम गझल गायल्या आहेत. अर्थात हिंदी-उर्दू गझल चे नाव निघाले की ‘गुलाम अली, जगजीत सिंग किंवा नाही म्हणता पंकज उधास’ हेच ठळक गझल गायक म्हणून आपल्या समोर येतात. खऱ्या गझल प्रेमींमध्ये मग ‘अहमद आणि महमंद हुसेन’, सारखे किंवा ‘तलत अझीज, भूपेंद्र सिंग, आणि चंदन दास’ सारखे गझल गायक आपले स्वतंत्र स्थान मिळवून आहेत. अगदीच कट्टर गझल पंथी ‘बेगम अख्तर, फरीदा खानुम, मेहदी हसन, आबिदा परवीन’ यांना हिमालया सारखे थोर समजतात.
आख्यायिकांच्या गदारोळात तानसेन
लहानपणी माझी अशी समजूत होती की 'केतकी गुलाब जुहि' हे गाणं तानसेन आणि बैजू बावरा यांच्यामधील जुगलबंदी आहे. त्यात जो गायक "जिंकतो" असं दाखवलं आहे, त्याला मन्ना डेचा आवाज आहे आणि हरणारा आवाज भीमसेन जोशींचा, तेही शास्त्रीय मैफिलीत! व्हिडिओमध्ये ज्या क्षणाला तो नट खजील होऊन हार मान्य असल्याचा आविर्भाव आणतो, तिथे खरं तर भीमसेन जोशी वरचढ वाटत होते, आणि ह्याला अचानक खजील व्हायला काय झालं कळत नाही. अनेक वर्षांनंतर ते गाणं बसंत-बहार चित्रपटामधील असून त्यात तानसेन नाहीच हे कळल्यावर मी खजील झालो होतो.
गाऊलीच्या पावलांत सांज भरा आली..
बी. रघुनाथ यांची आणखी एक काव्यरचना मला खुप आवडते.. ज्याला सुप्रसिद्ध भावगीत गायक कै. श्री गजानन राव वाटवे यांनी गायले व चालरचना दिली होती. व माझे भाग्य असे की त्यावेळी त्यांच्या सोबत रहात होतो . त्या वेळी वाटवेआण्णा बरोबर पुणे येथील नवी पेठ फाटक बागेतील "त्रिदल" सोसायटीत राहत होते
चारचौघात शालजोडीतले मारणारी गाणी
५०-६०-७० चे दशक हिन्दी चित्रपटसन्गिताचा सुवर्णकाळ होता. प्रतिभावान सन्गितकार, गायक, कवी या सर्वांनी मिळुन प्रेम, विरह, भक्ती, समर्पण अशा विवीध प्रकारच्या गाण्यांचा नजराणा आपल्याला पेश केला. पण सर्वात प्रसिद्ध होती ती एकमेकांचे चारचौघात वाभाडे काढणारी गाणी.
विश्वास नाही ना बसत? बघा तर मग...
चित्रपट कसा वाटला - 4
आधीच्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर
पूर्वीचा धागा - https://www.maayboli.com/node/62306
मिन्दी गाणी - खेळ
हा एक टाईमपास खेळ आहे.
ह्यात हिंदी गाणी मराठीत भाषांतर करून लिहायची / गायची आहेत, जमेल तशी.
फा वे टा धाग्यावर उल्लेख केल्याप्रमाणे ही अशी गाणी (बे,) सुरात गायला मजा येते मला.
बघुया किती जमतय आपल्याला.
१. डोळ्यात तुझ्या विचित्र विचित्र अदा आहेत
हृदयाला बनवील पतंग श्वास तुझी ही हवा आहे
(आखो मे तेरी अजब सी अजब सी अदाए है - ओम शान्ती ओम)
२. माझ्या रंगात रंगणारी परी आहेस की पऱ्यांची राणी
की आहेस माझी प्रेमकहाणी
माझ्या प्रश्नांचं उत्तर दे गं बाई
दे ना
(मेरे सवालो का जवाब दो - मैने प्यार किया)
आनंदछंद ऐसा - पशुपत
महाविद्यालयाच्या पहिल्याच वर्षी पुरुषोत्तम स्पर्धेसाठीच्या एकांकिकेत संगीतिकेचे संगीत करण्याची संधी मिळाली. त्यातल्या एका गझलच्या चालीचे विशेष कौतूक झाले.
आणि हेच आमचे बलस्थान असल्याचे लेखक दिग्दर्शकाना समजून आले .. आणि पुढील तीन वर्षे एकापेक्षा एक सुंदर एकांकिका करण्याचा उपक्रम केला आम्ही.
आणि इथेच कवीताना चाली लावण्याचा छंद , अंगात भिनला तो आजवर पंचवीस तीस वर्षे टिकून आहे.
Pages
