मराठी भाषा दिवस २०२०

मराठी भाषा दिवस २०२०- घोषणा

Submitted by मभा दिन संयोजक on 17 February, 2020 - 13:34

शतकानुशतकांची समृद्ध वाटचाल पाठीशी राखत, वर्तमानातील विस्तारलेल्या क्षितिजांचे भान बाळगून, भविष्यातल्या नवनवीन आव्हानांना सामोरं जाण्याची तयारी ठेवत आपली मायबोली मराठी एकविसाव्या शतकाच्या नवीन दशकात पाऊल ठेवत आहे.
सहर्ष सादर करत आहोत, मायबोली.कॉमचा नवीन दशकातला पहिला मराठी भाषा दिवस!

logo 1ab.jpg

काय काय आहे बरं यावर्षीच्या उत्सवात? नावीन्यपूर्ण उपक्रम, खेळ, चित्रं आणि कोडीसुद्धा!

आनंदछंद ऐसा

विषय: 

आनंदछंद ऐसा- जुई

Submitted by jui.k on 29 February, 2020 - 03:06

छंद!
लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला काही न काही जिव्हाळ्याचा छंद असतोच. मला वाचन आणि विविध हस्तकला जोपासण्याचे छंद आहेत पण इथे मी फक्त माझ्या हस्तकलांबद्दलच लिहिते..
लहानपणापासूनच अगदी काहीही शिक्षण न घेता माझी चित्रकला खूप चांगली होती. शाळेत विविध उपक्रम करताना हस्तकलेच्या वस्तू बनवताना मजा यायला लागली. मग स्वतःच्या प्रोजेक्ट सोबत लहान भावाचे प्रोजेक्ट सजवायचे काम ही माझ्याकडेच आले. इथून माझ्या छंदाची सुरुवात झाली. मोठेपणी अभ्यासामुळे या सर्वांना पुरेसा वेळ नाही देत आला पण शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मात्र संपूर्ण वेळ मी यासाठीच देऊ लागले.

विषय: 

आनंद छंद ऐसा- अवल

Submitted by अवल on 28 February, 2020 - 23:40

हे छंद जिवाला लावी पिसे

छंदांविषयी लिहायचे म्हटले अन मनात सगळ्यांनी धक्काबुक्की सुरू केली. "ए मी आधी, नाहीरे तू नाही आधी मी..." अरे बापरे, या सर्वांना एका माळेत ओवू तरी कशी ? शेवटी ठरवले. लहानपणापासून लिहायला लागू. प्रत्येकाची अगदी साद्यंत नाही तरी निदान दखल तरी घेऊ. अन बसले लिहायला. कधी नुसतीच यादी झाली, कधी त्या छंदात हरवून जाऊ लागले. पण पुन्हा पुन्हा मनाला ओढून एका माळेत कोंबायचा प्रयत्न केला. तो तसाच मांडते तुमच्या समोर.

विषय: 

आनंदछंद ऐसा - पशुपत

Submitted by पशुपत on 28 February, 2020 - 01:56

महाविद्यालयाच्या पहिल्याच वर्षी पुरुषोत्तम स्पर्धेसाठीच्या एकांकिकेत संगीतिकेचे संगीत करण्याची संधी मिळाली. त्यातल्या एका गझलच्या चालीचे विशेष कौतूक झाले.
आणि हेच आमचे बलस्थान असल्याचे लेखक दिग्दर्शकाना समजून आले .. आणि पुढील तीन वर्षे एकापेक्षा एक सुंदर एकांकिका करण्याचा उपक्रम केला आम्ही.
आणि इथेच कवीताना चाली लावण्याचा छंद , अंगात भिनला तो आजवर पंचवीस तीस वर्षे टिकून आहे.

विषय: 

"मनावर परिणाम करणारा लेखक - डॉ. अनिल अवचट" - (डॉ. अतुल ठाकुर)

Submitted by मभा दिन संयोजक on 27 February, 2020 - 10:01

"मनावर परिणाम करणारा लेखक - डॉ. अनिल अवचट" - (डॉ. अतुल ठाकुर)

दिवस मुंबई गिरण्यांच्या संपाचे होते. टेक्सटाईलचा कोर्स करीत होतो. आणि बाहेर नोकरी मिळण्याची फारशी आशा नव्हती. निवडलेले क्षेत्र तसेही फारसे आवडलेले नव्हते. पण आयुष्यात सर्व निर्णय चुकण्याचा एक काळ असतो त्या काळातून बहुधा मी जात होतो. त्याच काळात एका मित्राने मला अनिल अवचटांचे पुस्तक वाचण्याचा सल्ला दिला आणि मला वाटतं मी पहिले पुस्तक निवडले "धागे आडवे उभे"

विषय: 

डॉ. अनिल अवचटांचं मला आवडलेलं पुस्तक - मोर

Submitted by वावे on 25 February, 2020 - 04:49

एखादं सुंदर चित्र पहावं, ते आवडावं, पण थोडं जवळ जाऊन, निरखून पाहताना अवचित त्यातलं वेगळंच काहीतरी सामोरं यावं आणि मग त्यामुळे त्या संपूर्ण चित्राचा अर्थच आपल्यापुरता बदलून जावा असं होतं आयुष्यात कधीकधी.

’ मोर’ या पुस्तकातले जवळजवळ सगळेच ललितलेख या सूत्रात बांधलेले आहेत असं मला वाटतं. अनिल अवचटांची ख्याती आहे ती विषयाच्या खोलात जाऊन, तो समजून घेऊन मग त्याबद्दल लिहिण्याची. पण या लेखनाचं स्वरूप तसं नाही. यात व्यक्तींच्या, नात्यांच्या, स्थळकाळांच्या, अवचित, निर्हेतुकपणे समोर आलेल्या बाजू आहेत.

विषय: 

आनंदछंद ऐसा- कविन

Submitted by कविन on 24 February, 2020 - 00:59

चंचल आहे हो पोर. एकात धड मन रमेल तर शप्पथ. तशी हुशार आहे पण सगळी हुशारी अशी एकाच कामात लावेल तर ना चीज होईल. हे एक टोक आणि आमच्या ठकीला ना सगळ्यात इंटरेस्ट आहे. सगळ करुन पहायच असतं हे कौतुक भरलं दुसरं टोक यामधे आमचा पेंडूलम झुलत रहाण्यातच लहानपण गेलं. मोठं होताना यालाच Jack of All & Master of none म्हणतात हे समजलं पण या वाक्यात कौतुक भरलय कि उपहास हे आजतागायत कळलं नाहीये. कदाचित दोन्ही असावं असा अंदाज आहे. तर ते असो यावरुन हे कळलं असेलच कि आस्मादिकांना एकापेक्षा जास्त छंद आहेत.

आनंदछंद ऐसा़ - जाई.

Submitted by जाई. on 23 February, 2020 - 06:15

खरंतर या छंदाची ओळख लोकल प्रवासातून झालेली . लोकलने प्रवास करत असताना अनेक विक्रेते १० रुपये मैं कलरिंग बुक्स म्हणून ओरडत विकायला येत , आजही येतात.त्यात टॉम जेरी सारख्या कार्टूनची , बॅटमन ,आर्यनमॅन सारख्या सुपर हिरोजची , फळा ,फुलांचा चित्रांचा समावेश असतो . ह्या रंगकामाच्या पुस्तकाचा मुख्य उद्देश लहान मुलाना रंगकाम , चित्रकामची ओळख करून देणे इतका असतो . त्यामुळे त्यात कुठच्या चित्राला कुठला रंग द्यायचा हे सगळं व्यवस्थित सांगितलेलं असतं.

मराठी भाषा दिवस २०२० - स्वयंपाकघरातील प्रयोगशाळा

Submitted by मभा दिन संयोजक on 17 February, 2020 - 13:17

स्वयंपाकघर म्हणजे आपल्या घराचा केंद्रबिंदूच जणू! घरात प्रत्येकाच्या स्वतंत्र खोल्या असल्या तरी सर्व कुटुंबाला एकत्र ठेवणारे हे स्वयंपाकघर, अनेक शास्त्रीय प्रयोग घडवणारी प्रयोगशाळा असते हे सांगितले तर कदाचित आश्चर्य वाटेल. पण इथे आपल्या सुगरणी आणि बल्लवाचार्य रोज वेगवेगळे शास्त्रीय प्रयोग हसतखेळत सहजतेने करत असतात. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर स्वयंपाक करताना ज्या प्रक्रिया घडतात त्या प्रत्येकामागे एक ठोस शास्त्रीय आधार असतो. हे नक्की कसे? त्याबद्दल आज आपण येथे तुम्हा सर्वांच्या प्रतिसादांमधून जाणून घेऊ.

मराठी भाषा दिवस २०२० - अक्षरचित्रे

Submitted by मभा दिन संयोजक on 17 February, 2020 - 13:11

अ? ...अननसाचा!
आ?... आईचा!
इ? .. इमारतीचा!
अर्रर्र...चुकलं चुकलं चुकलं.
अ माशाचा
आ सिंहाचा
आणि इ कोंबडीचा!
आँ ? आता हे काय नवीनच?
हीच तर मजा आहे अक्षरचित्रांची!
अक्षरचित्रं म्हणजे अक्षरांपासून बनलेली चित्रं. अ या अक्षरापासून मासा तयार करता येतो आणि 'आ'.पासून चक्क सिंह!

collage.jpg

आहे की नाही गंमत?

आता खाली दिलेली चित्रंच पहा. मा, य, बो या प्रत्येक अक्षरापासून तयार केलेलं एकेक चित्र आहे त्यात.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - मराठी भाषा दिवस २०२०