शतकानुशतकांची समृद्ध वाटचाल पाठीशी राखत, वर्तमानातील विस्तारलेल्या क्षितिजांचे भान बाळगून, भविष्यातल्या नवनवीन आव्हानांना सामोरं जाण्याची तयारी ठेवत आपली मायबोली मराठी एकविसाव्या शतकाच्या नवीन दशकात पाऊल ठेवत आहे.
सहर्ष सादर करत आहोत, मायबोली.कॉमचा नवीन दशकातला पहिला मराठी भाषा दिवस!
काय काय आहे बरं यावर्षीच्या उत्सवात? नावीन्यपूर्ण उपक्रम, खेळ, चित्रं आणि कोडीसुद्धा!
डॉ. अनिल अवचटांचे मला आवडलेले पुस्तक
मग तयार आहात ना भरघोस प्रतिसाद देऊन मराठी भाषा दिवस २०२० यशस्वी करायला?
वरचा प्रश्न खरं तर अनावश्यक होता कारण उत्साही, रसिक मायबोलीकर कुठलाही उपक्रम पूर्ण मनापासून साजरा करतात, संयोजकांना साथ देतात हा मागील अनुभव आहेच!
आत्तापर्यंत आलेल्या प्रवेशिका खास तुमच्यासाठी इथे देत आहे.....
** आनंदछंद ऐसा
** डॉ. अनिल अवचटांचे मला आवडलेले पुस्तक
१) डॉ. अनिल अवचटांचं मला आवडलेलं पुस्तक - ' स्वतःविषयी'
२) डॉ. अनिल अवचटांचं मला आवडलेलं पुस्तक- 'मोर'
३) डाॅ.अनिल अवचटांचे मला आवडलेले पुस्तक: माझी चित्तरकथा
**अक्षरचित्रे
१) अक्षरचित्रे- चि. राजस (वय ९ वर्षं )
२) अक्षरचित्रे - चि. सतेज ( वय ७ वर्षं)
मायबोली मराठी भाषा दिवस २०२० - विशेष लेख
"मनावर परिणाम करणारा लेखक - डॉ. अनिल अवचट" - (डॉ. अतुल ठाकुर)
मायबोली मराठी भाषा दिवस २०२० - शब्दखेळ
मस्तच उपक्रम आहेत. मायबोली
मस्तच उपक्रम आहेत. मायबोली अॅडमिन व मराठी दिन संयोजकांचे अभिनंदन व शुभेच्छा. नक्की भाग घेणार.
संयोजकांचे अभिनंदन व शुभेच्छा
संयोजकांचे अभिनंदन व शुभेच्छा. नक्की भाग घेणार.
अगदी झोकात झाली घोषणा, त्या
अगदी झोकात झाली घोषणा, त्या तुतारीच्या आवाजासारखी दमदार!
उपक्रम पण उत्साहात पार पडू दे! संयोजक मंडळाला शुभेच्छा!
मस्त सुरवात. खूप उत्सुकता
मस्त सुरवात. खूप उत्सुकता आहे यंदाच्या कार्यक्रमाबद्दल
अरे वा ! छान आहेत उपक्रम !!
अरे वा ! छान आहेत उपक्रम !! शुभेच्छा ! भाग घ्यायचा प्रयत्न नक्की करेन
संयोजक मंडळाला शुभेच्छा!
संयोजक मंडळाला शुभेच्छा!
छान उपक्रम.
छान उपक्रम.
संयोजक ,काही काम असेल तर द्याल का ? मदत करायला आवडेल. ( काम केल तर मग नंतर मग हक्काने भांडता पण येईल. दिवा घ्या प्लिज)
शुभेच्छांंसाठी आणि उपक्रम
शुभेच्छांंसाठी आणि उपक्रम आवडल्याचे कळवण्यासाठी सगळ्यांचे आभार! या उपक्रमांंमध्ये अधिकाधिक सहभाग घेऊन उपक्रम यशस्वी करालच याची खात्री आहे
सीमा, मदतीची तयारी दाखवल्याबद्दल मनापासून आभार. काही मदत लागली तर हक्काने सांगू.
माबोच्या मूलनिवासींसाठी खास
माबोच्या मूलनिवासींसाठी खास उपक्रम हवा होता.
मुल परदेशात जन्मले वाढले असेल तर त्याला तुम्ही मराठी शिकवता का? त्यात कितपत यश येते?
∆ याबद्दलचे अनुभव.
@अॅमी,
@अॅमी,
चांगला विचार आहे, संयोजन मंडळ यावर नक्कीच विचार करेल
ह्या विषयावर पूर्वीच्या मभादी
ह्या विषयावर पूर्वीच्या मभादी उपक्रमात चर्चा झालेली आहे.
https://www.maayboli.com/node/32828
संयोजक,
संयोजक,
एक सुचवणी करायची आहे. डॉ अवचट यांच्या पुस्तकांखेरीज इतरही काही लेखकांची नावं किंवा टॉपिक देऊ शकाल का? सगळ्यांनी अवचटांची पुस्तकं वाचली असतील असं नाही.
सनव, डॉ. अनिल अवचटांच्या
सनव, डॉ. अनिल अवचटांच्या मराठी साहित्यातल्या योगदानाबद्दल त्यांना छोटीशी मानवंदना म्हणूनच हा उपक्रम आपण यावर्षी मराठी भाषा दिवसानिमित्त ठेवलेला आहे. त्यांनी गेल्या वर्षी पंच्याहत्तरी पार केली हेही एक औचित्य त्यामागे आहे. तसा उल्लेखही संबंधित धाग्यावर केलेला आहे. इतर कुठल्या लेखकांची/ विषयांची नावं देण्याचा आमचा विचार नाही.
डॉ. अवचटांनी विविध विषयांवर पुस्तकं लिहिलेली आहेत. जे त्यांच्या पुस्तकांवर लिहू शकतात आणि इच्छितात, त्यांनी आवर्जून लिहावं आणि ज्यांनी वाचलेली नसतील त्यांनाही त्या पुस्तकांबद्दल कळावं, असा यामागे हेतू आहे.
सध्या लोकसत्ता, चतुरंगमध्ये
सध्या लोकसत्ता, चतुरंगमध्ये एक सुरेख लेखमाला चालू आहे. १०वी पर्यंत पूर्ण मराठीत शिकून पुढे आयुष्यात देशविदेशांत खूप यशस्वी झालेल्यांच्या मुलाखती त्यात असतात.
सदराचे नाव :
गर्जा मराठीचा जयजयकार
एक दुवा:
https://www.loksatta.com/chaturang-news/interview-with-manohar-shete-fou...
मराठी भाषा दिनाच्या हार्दीक
मराठी भाषा दिनाच्या हार्दीक शुभेच्छा.
केव्हापर्यंत मुदत आहे लेख
केव्हापर्यंत मुदत आहे लेख लिहीण्याकरता?
@फारएन्ड
@फारएन्ड
२९ फेब्रुवारी २०२० च्या रात्रौ १२ वाजेपर्यंत (अमेरिकेची पश्चिम किनार्यावरची प्रमाणवेळ) प्रवेशिका स्विकारल्या जातील.
धन्यवाद संयोजक! खरंतर अनिल
धन्यवाद संयोजक! खरंतर अनिल अवचटांचे कार्यरत हे पुस्तक माझ्या निवडक दहात पहिल्या क्रमांकावर आहे. त्याच्याविषयी लिहायची खूप इच्छा आहे. बघूया या विकांताला वेळ मिळाला तर नक्कीच लिहीन.
सर्व उपक्रम मस्त आहेत संयोजक!
सर्व उपक्रम मस्त आहेत संयोजक!
नावीन्यपूर्ण उपक्रम, खेळ,
नावीन्यपूर्ण उपक्रम, खेळ, चित्रं आणि कोडीसुद्धा! >>> सर्वच सुरेख, रंगतदार. कौतुक सर्व टीमचं आणि भाग घेणाऱ्या सर्वांचंही.
उत्तम संयोजन.
उत्तम संयोजन.
सभासदांचा उत्तम सहभाग .
धाग्यांच्या चर्चाही छान.
अशा प्रकारे हा मभादि सुफळ संपूर्ण झाला आहे.
धन्यवाद !
छान होते उपक्रम सगळे. भाग
छान होते उपक्रम सगळे. भाग घ्यायला आणि वाचायलाही आवडले.
आनंदछंद ऐसा ह्यातले सगळेच लेख
आनंदछंद ऐसा ह्यातले सगळेच लेख वाचनीय होते.
अवचटांवरचे लेखही छान होते.
छान झाला मराठी भाषा दिवस.
छान उपक्रम होते. संयोजन
छान उपक्रम होते. संयोजन समितीचे अभिनंदन.
मभादिनिमित्ताने योजलेले सगळे
मभादिनिमित्ताने योजलेले सगळे उपक्रम - लेख, खेळ छान होते. संयोजकांनीही ते उत्तम प्रकारे राबवले. संयोजकांचे आभार आणि विविध उपक्रमात भाग घेणाऱ्यांचे कौतुक!
मभादिनिमित्ताने योजलेले सगळे
मभादिनिमित्ताने योजलेले सगळे उपक्रम - लेख, खेळ छान होते. संयोजकांनीही ते उत्तम प्रकारे राबवले. संयोजकांचे आभार आणि विविध उपक्रमात भाग घेणाऱ्यांचे कौतुक! >>>>>>>+११११
संयोजकांचे आभार अन कौतुक.
संयोजकांचे आभार अन कौतुक.