मराठी भाषा दिवस २०२० - डॉ. अनिल अवचटांचे मला आवडलेले पुस्तक
मराठी साहित्यात डॉ. अनिल अवचट यांच्या लेखनाला एक वेगळं आणि महत्त्वाचं स्थान आहे. सुरुवातीपासूनच त्यांनी स्वत:ला विविध सामाजिक कार्यांमध्ये झोकून दिलं आणि हे कार्य करत असताना आलेले अनुभव ते सातत्याने शब्दबद्ध करत राहिले. प्रांजळपणा, तळमळ, सतत नवनवीन लेखनविषयांचा शोध घेण्याचा आणि त्या विषयांच्या मुळाशी जाण्याचा त्यांचा उत्साह, क्लिष्ट विषयावर लिहितानाही त्यात आणलेली रोचकता अशी त्यांच्या लेखनाची अनेक वैशिष्ट्ये सांगता येतील. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांच्या नावांच्या यादीकडे नजर टाकली तरी त्यातलं वैविध्य डोळ्यात भरेल.