खरंतर या छंदाची ओळख लोकल प्रवासातून झालेली . लोकलने प्रवास करत असताना अनेक विक्रेते १० रुपये मैं कलरिंग बुक्स म्हणून ओरडत विकायला येत , आजही येतात.त्यात टॉम जेरी सारख्या कार्टूनची , बॅटमन ,आर्यनमॅन सारख्या सुपर हिरोजची , फळा ,फुलांचा चित्रांचा समावेश असतो . ह्या रंगकामाच्या पुस्तकाचा मुख्य उद्देश लहान मुलाना रंगकाम , चित्रकामची ओळख करून देणे इतका असतो . त्यामुळे त्यात कुठच्या चित्राला कुठला रंग द्यायचा हे सगळं व्यवस्थित सांगितलेलं असतं. लहान मुलं चित्र रंगवत शांत बसावीत हा ही एक उद्देश असावा
तर नेटवर बागडत असताना coloring activity या प्रकरणाचा शोध लागला .थोडं डोकावून पाहिलं असता अरे हे तर लोकलमध्ये विकतात त्याच छापाच आहे की असा प्रथमदर्शनी ग्रह झाला .त्यामुळे थोडं हसायलाच आलं . त्यात ही ऍक्टिव्हिटी स्ट्रेसबस्टर म्हणून केली जाते असंही लिहिलेलं . 'काय बाई , एकेक प्रकरण ' म्हणून सोडून दिलं .
अशातच प्राजक्ता पाटवेशी ओळख झाली . तिच्या पोस्टसमधून , चित्रातून ती अतिशय गुणी कलाकार असल्याचंही समजलं . त्यावेळी ती आणि अजून एक मायबोलीकर अल्पना या दोघी मिळून त्यांचं कलेशी संबंधित फेसबुक पान सुरू करत होत्या . असच एकदा प्राजक्ताशी गप्पा मारत असताना तिने तिच रंगकामाची पुस्तकं दाखवली . तेव्हा "अरे ! हे तर नेटवर बघितलेलं तेच की " ट्यूब पेटली . तेव्हा तिच्याकडून हे नक्की काय प्रकरण असतं हे समजून घेतलं . तिच्याशी बोलून बरच काही समजलं . त्यांनंतर दोस्तीखात्यात तिने तिची नुकतीच प्रसिद्ध झालेली ही कलरिंग पुस्तकं भेट म्हणून दिली.
तर coloring activity for adults हा छंद पाश्चिमात्य जगात बराच लोकप्रिय आहे. प्राजक्ताने बोलता बोलता तिने 2/3 फेसबुक ग्रुपची लिंकही दिली. हे ग्रुप पूर्णपणे ह्या छंदप्रकाराला वाहिलेले आहेत . तिकडचे रंगकाम बघून थक्क व्हायला होतं . वेगवेगळ्या देशातील लोकं ज्या उत्कृष्टपणे वेगवेगळ्या प्रकारचेरंगकाम करतात ते बघून परफेक्ट एवढंच मनात येतं. ह्या ग्रुपमुळेच ह्या छंदाला मी गांभीर्याने घेतलं .
प्राजक्ताने पुस्तक तर दिली पण माझी सुरुवात ग भ म न पासून होती . त्यामुळे तिला निरनिराळ्या शंका विचारून जेरीस आणलं . त्यात कोणते रंग वापरू , माध्यम कोणतं , कुठून सुरुवात करू , चुकलं तर काय करायचं असे वेगवेगळे प्रश्न विचारून पिडलं . ( तिला मला या छंदाची माहिती देण्याचा निश्चितच पश्चताप झालेला असणार )
शेवटी camelin कंपनीच्या रंगीत पेन्सिल विकत आणल्या . आणि श्रीगणेशा केला . पहिलच चित्र रंगवलं आणि हे आपल्याला बऱ्यापैकी जमतंय याचा अंदाज आला .वर उल्लेख केलेल्या फेसबुक ग्रुपात ते चित्र टाकलं . तर तिथल्या लोकांना आवडलं . थोडा हुरूप आला आणि पुढचं चित्र रंगवायला घेतलं . ते ही जमलं .
हे पहिले चित्र रंगवलेल !!!
हळूहळू मला ही रंगकामाची ऍक्टिव्हिटी आवडायला लागली . मजा येऊ लागली . लहान मुलांच काम म्हणून अडगळीत टाकलेल्या ह्या छंदाने एक प्रकारचं रिलॅक्स फिलिंग दिलं . सातवीनंतर चित्रकला सोडूनच दिलेली . ती ह्या प्रकारात सापडली .रंगाचा सेन्स माझा चांगला आहे असे अनेक मित्र मैत्रिणी आवर्जून सांगतात . तो इथे रंगवताना कामी आला . प्राजक्ताच्या पुस्तकातली चित्र सुंदर आहेत त्यामुळे ती तितक्या सुंदरपणे रंगवली गेली पाहिजेत असंही मनाशी ठरवून घेतलं . त्यामुळे अजून मजा यायला लागली .
चित्र रंगवताना सध्या मी रंगीत पेन्सिलचा मुख्यतः उपयोग करते . पण अजूनही अनेक माध्यम वापरता येतात . जस की जेल पेन्स, स्केच पेन्स , रंगीत खडू . . कोणतं माध्यम वापरायचे ते आपल्यावर . शेवटी आनंद मिळणं महत्वाचं.
Coloring Activities मध्ये मंडल हा प्रकार लोकप्रिय आहे . मंडल हे गोलाकार आकारात असलेला वेगवेगळ्या फॉर्ममधला एक प्रकारचा चित्र प्रकार आहे. हिंदू , बौद्ध, जपनीज संस्कृतीत ह्याच मूळ सापडत . अधिक माहिती या लिंकवर मिळेल
https://en.m.wikipedia.org/wiki/Mandala
ही मी रंगवलेली दोन मंडल !!!
१)
२) भाचीचे रंगीत खडू ढापून नुकतंच एक चित्र रंगवलं आहे . हे ते चित्र मंडल
हे अजून काही रंगकामचे नमुने ...
Coloring app म्हणून प्ले स्टोर वर सर्च केल्यास अनेक app दिसतात . त्यावरूनही हा छंद जोपासता येऊ शकतो. पण त्याला कागदावर रंगवलेल्या रंगकामाची सर नाही हे अनुभवातून सांगू शकते
हे रंगकाम करताना मजा येते हे खरं . चित्रावर फोकस करून रंगकाम करण्यात धमाल आहे.. पेशन्स या घटकाची कमतरता असलेल्या प्रत्येकाला ही ऍक्टिव्हिटी उपयुक्त आहे. नेटवर अतिरिक्त बागडून डोळे , मेंदू शिणवण्यापेक्षा तोच वेळ एक चित्र किंवा चित्रांचा तुकडा रंगवून पाहिलं तर छान वाटतं . मी माझी काही चित्र अशीच टप्याटप्यात पूर्ण केलीत .दुसरं एक म्हणजे हा छंद फार काही खर्चिक नाही . अमेझॉन , फ्लिपकार्टवर, क्रॉसवर्डमध्ये , प्राजक्ताच्या फेसबुकपेजवर रास्त किंमतीत विविध प्रकारची कलरिंग बुक्स, रंगीत पेन्सिल , खडू उपलब्ध आहेत . कुठेही लांबच्या प्रवासात ही रंगकाम ऍक्टिव्हिटी वेळ घालवायचा उत्तम मार्ग आहे . काही
तर सर्वांना Happy Coloring !!!
मस्त माहिती आणि ओळख. You
मस्त माहिती आणि ओळख. You definitely made me interested:)
आहाहा , सुंदरच !
आहाहा , सुंदरच !
अभिनंदन.
चालू ठेवा.
किती सुंदर आणि प्रमाणबद्ध!!
किती सुंदर आणि प्रमाणबद्ध!! रंगसंगती देखील खूप मनोहर आहे.
ही पुस्तके मला मिळाली आहेत
ही पुस्तके मला मिळाली आहेत ऑफिसच्या कुठल्यातरी कार्यक्रमात. तुमच्या लेखामुळे ती रंगवायचा उत्साह आला आहे
छानच चित्रं आहेत. तुमचा छंद
छानच चित्रं आहेत. तुमचा छंद आवडला.
अरे वाह, छान छंद. मस्तं
अरे वाह, छान छंद. मस्तं रंगवली आहेत चित्र
खूपच छान! मस्त रंगवलीयेत
खूपच छान! मस्त रंगवलीयेत चित्रं. मीही अशी दोन पुस्तकं आणली होती. दोन तीन चित्रं रंगवून मग सोडून दिली. आता परत घ्यायला हवी हातात.
जाई, छान आहे रंगसंगती.https:
जाई, छान आहे रंगसंगती.
https://www.maayboli.com/node/55148
पूर्वी या धाग्यावर चर्चा झाली होती या छंदाची
क्या बात है. सुपर्ब.
क्या बात है. सुपर्ब.
मस्त आहेत सगळी चित्रं!!
मस्त आहेत सगळी चित्रं!!
खूप छान चित्रे
खूप छान चित्रे
खूप मस्त!!! धन्यवाद जाई या
खूप मस्त!!! धन्यवाद जाई या छंदाची ओळख करून दिल्याबद्दल.
मस्तच ग जाई . आवडला तुझा छंद
मस्तच ग जाई . आवडला तुझा छंद
तू कॅलिग्राफी पण करतेस ना
किती छान लेख लिहिला आहेस जाई
किती छान लेख लिहिला आहेस जाई ! तुला माझी पुस्त्क दिल्याचा पश्चाताप अजिबात नाहि उलट आनन्दच आहे !
माझी चित्र इतकी सुन्दर रन्गवल्याबद्दल खुप खुप धन्यवाद ! <3 <3
अरे वा!
अरे वा!
धन्यवाद लोकहो .
धन्यवाद लोकहो .
टवणे सर , वावे करा सुरुवात आणि टाका इथेही चित्रे
कविन , हो , कॅलिग्राफी आस्ते कदम चालू आहे
मस्त मस्त! मलाही कलर पेन्सिल
मस्त मस्त! मलाही कलर पेन्सिल वापरुन कलरिंग करायला आवडतं. चांगला टीपी आहे.
छानच जाई
छानच जाई
छान.
छान.
छान आहे छंद.. ते चाय से
छान आहे छंद.. ते चाय से ज्यादा किटली गरम मस्त दिसतेय.. मला स्वत:ला आवड नाही कलरींगची.. पण ज्याला जमते त्याला चांगला आहे सोपा सुटसुटीत छंद
जाई खूपच छान रंगवली आहेस
जाई खूपच छान रंगवली आहेस चित्रं.
अशी पुस्तके बघितली आहेत. तुझा लेख वाचून विकत घ्यावीशी वाटत आहेत.
छान. मी पण करते हे. पण नेहमी
छान. मी पण करते हे. पण नेहमी नाही जमत. एखाद्या रविवारी सगळं आटपुन वेळ असेल तर.

अजुन फोटो आहेत पण इथे अपलोड होत नाहीयेत.
एखादा रिकामा कागद, ताज टीबॅग्जच्या बॉक्समधे सेपरेटर्स वेगेर हाताशी लागले की मंडला डीजाइन्स काढते.
व्वा !! कसलं भारी आहे हे !!
व्वा !! कसलं भारी आहे हे !!
मस्तच रंगवली आहेत ..आवडला हा छंद
असं मोठयांसाठी पण मिळतं हे नव्हतं माहित
सस्मित , छान आहे चित्र
सस्मित , छान आहे चित्र
सर्वांना धन्यवाद
हॅपी कलरिंग !!!
छान लिहिलं आहेस जाई!
छान लिहिलं आहेस जाई!
छान चित्र आहेत तुझी जाई! या
छान चित्र आहेत तुझी जाई!
या छंदा नंतर स्ट्रेस बर्स्ट झाला की वाढला आता?
छान !
छान !
छानच लिहीलयस जाई. सेमपिंच
छानच लिहीलयस जाई. सेमपिंच सस्मित, टाटा टि बॅग मधले सेपरेटर माझ्या कडे पण साठवलेले आहेत. काहीतरी काढत असते त्यावर
थँक्स लोकहो .
थँक्स लोकहो .
चिमण , स्ट्रेस कमी होण्यास मदत होते हे नक्की
सेमपिंच सस्मित, टाटा टि बॅग
सेमपिंच सस्मित, टाटा टि बॅग मधले सेपरेटर माझ्या कडे पण साठवलेले आहेत. काहीतरी काढत असते त्यावर>>>> ऑ? मला वाटलेलं की जगात मला एकटीलाच हे सुचलेलं आहे
Pages