नमस्कार मायबोलीकरांनो,
दरवर्षी गणेशोत्सवात सगळ्यात जास्त आतुरता असते ती पाककृती स्पर्धांची. कितीही अवघड स्पर्धा ठेवली व कितीही अनोखे नियम केले तरी मायबोलीकर कायमच त्यांच्या सृजनशीलतेने एकापेक्षा एक रुचकर पाककृती तयार करून दाखवतात. दरवर्षी संयोजकांपुढे सर्वात गहन प्रश्न असतो तो म्हणजे, 'यावेळेस पाककृती स्पर्धा कोणत्या ठेवायच्या?' हाच !
गणेशोत्सवात गणपती आगमनाची तयारी, त्यानंतर गौरी आवाहन, पूजन, विसर्जन या सर्व धामधूमीत तुम्हाला पाककृती स्पर्धांची तयारी करायला वेळ मिळावा म्हणून यावर्षी पाककृती स्पर्धांची घोषणा श्रीगणेश चतुर्थीच्या आधी करत आहोत.
मायबोलीच्या पाककृती ग्रूपचे आयओएस अॅप प्रकाशीत झाले.
हे अॅप फक्त पाककृती विभागापुरते मर्यादित आहे. पण त्याचे फायदे
१. पाककृती बघण्यासाठी लॉगीन करण्याची गरज नाही.
२. पाककृतींशी संबंधित लिंक टिचकेसरशी एकत्र आहेत.
३. जेवायला रोज काय करायचे हे सुचवण्यासाठी सोपी सुविधा आहे. सध्या तिथे, याच ग्रूपमधलेच एक पान आहे. पण ही सुविधा अजून उपयोगी करण्याचे काम सुरु आहे.
मायबोलीच्या पाककृती ग्रूपचे अँड्रॉईड अॅप आजच प्रकाशीत झाले.
हे अॅप फक्त पाककृती विभागापुरते मर्यादित आहे. पण त्याचे फायदे
१. पाककृती बघण्यासाठी लॉगीन करण्याची गरज नाही.
२. पाककृतींशी संबंधित लिंक टिचकेसरशी एकत्र आहेत.
३. जेवायला रोज काय करायचे हे सुचवण्यासाठी सोपी सुविधा आहे. सध्या तिथे, याच ग्रूपमधलेच एक पान आहे. पण ही सुविधा अजून उपयोगी करण्याचे काम सुरु आहे.
माझ्या शाहरुख, आमिर, सलमान, अजय आणि अक्षय या पाच दिग्गज अभिनेत्यांवर लिहिलेल्या लेखाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. परंतु त्याचबरोबर लोकांनी एकजूट आवाज उठवला की “मिथुन चक्रवर्ती यांच्यावरही लिहा!” तुमच्या या आग्रहाला मान देत आज हा लेख लिहित आहे.
मिथुन चक्रवर्ती हे केवळ एक अभिनेता नाहीत, तर ते हिंदी सिनेमाच्या इतिहासात एक अशी प्रतिकात्मक व्यक्ति आहेत ज्यांनी “कॉमन मॅन”ला हिरो बनवलं. सत्तरच्या दशकात, जिथे अमिताभ बच्चन यांचं “अँग्री यंग मॅन” प्रतिक प्रस्थापित झालं होतं, तिथे मिथुन यांनी स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं.
मी एक खादाड प्राणी भाग – 7
अतीपूर्वेकडील अंडा पराठा.
कणिक ७५ टक्के आणि मैदा २५ टक्के या प्रमाणात घ्या. आवश्यक वाटल्यास थोडे तेल घालून चांगले मळून घ्या. त्यानंतर दोन मोठ्या आकाराच्या पोळ्या लाटा.
मी एक खादाड प्राणी भाग – 5
ऑम्लेट! एक उत्कृष्ट नाश्ता डिश आहे जो असंख्य प्रकारे बनविला जाऊ शकते. येथे जगभरातील काही लोकप्रिय ऑम्लेट प्रकार आहेत:
*मी एक खादाड प्राणी भाग – ६*
*मी एक खादाड प्राणी भाग – ४*
अंडी पौष्टिक आणि संतुलित आहार आहे. कोंबडी व्यतिरिक्त खाल्लेली जाणारी इतर अंडी ही बदक, कासव, तितर, मगर, इमू अशी आहेत. सर्वात महाग अंडी, माशांची अंडी ज्याला कॅविअर म्हणतात, बेलुगा कॅविअरची किंमत सुमारे 5 लाख रुपये प्रति किलो आहे. ऑस्ट्रेलियामध्ये मगरींचे फार्म भरपूर आहेत आणि तुम्ही मगरीची अंडी वापरून मगरीचे आईस्क्रीम मिळवू शकता.
अंड्यांचा उपयोग केक, आईस्क्रीम आणि अनेक पाककृतींमध्ये थिंकिंग एजंट म्हणून केला जातो. आपण आपली चर्चा कोंबडीची अंडी आणि अंड्याच्या पाककृतींपुरती मर्यादित करूया.
पुण्यात कुणाकडे कधीतरी दही-बुत्ती हा दहीभाताचा प्रकार ताटात पडला. दही-बुत्ती हे मूळचे दाक्षिणात्य अपत्य असले तरी पुण्यातल्या घरी वास्तव्यास आल्यामुळे साहजिकच "गोssड" झाले होते. पण “यजमान-दाक्षिण्य” दाखवून मी तो भात गोड (न) मानून कसातरी गिळला. एरवी पित्तशामक असणारा दहीभात, पित्त खवळायलाही कारणीभूत ठरू शकतो हे तो साखर पेरलेला दहीभात खाऊन त्या दिवशी नव्याने उमगले.
माबोवरील दिवाळीच्या धाग्यावरील जुन्या प्रतिसादात भर घालून नवा स्वतंत्र लेख लिहून मैत्रीण या संकेतस्थळावर दिला होता. आज अचानक आठवण आली व विरंगुळा व्हावा म्हणून येथेही आणला. हा प्रतिसाद काही जणांनी वाचला असेल.
एखाद्या धक्कादायक घटनेनंतर मनात त्या अनुभवाची एक भीती बसते, त्याला PTSD (post traumatic stress disorder) म्हणतात.