मायबोलीच्या पाककृती ग्रूपचे आयओएस अॅप प्रकाशीत झाले.
हे अॅप फक्त पाककृती विभागापुरते मर्यादित आहे. पण त्याचे फायदे
१. पाककृती बघण्यासाठी लॉगीन करण्याची गरज नाही.
२. पाककृतींशी संबंधित लिंक टिचकेसरशी एकत्र आहेत.
३. जेवायला रोज काय करायचे हे सुचवण्यासाठी सोपी सुविधा आहे. सध्या तिथे, याच ग्रूपमधलेच एक पान आहे. पण ही सुविधा अजून उपयोगी करण्याचे काम सुरु आहे.
मायबोली वर प्रत्यक्ष लिहिणार्यांपेक्षा , वाचनमात्र रहाणार्यांची संख्या दहापट आहे. अशा वाचकांना हि सुविधा उपयोगी पडेल अशी अपेक्षा आहे.
या विभागात पाककृती लिहिणार्यां लेखकांच्या पाककृती आणखी जास्त वाचकांपर्यंत पोहोचतील.
मायबोलीचे आयओएस अॅप अॅपल प्ले स्टोअर मधून डाऊनलोड करता येईल.
हे अॅप या अगोदरच अँड्रॉईड - गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे
हे अॅप तयार करताना मायबोलीकर मेधा आणि योकु यांची चाचण्या करण्यासाठी मदत झाली. त्यांचे आभार. त्यांनी सुचवलेले काही बदल केले. पण काही वेळेअभावी करू शकलो नाही पण त्यावर काम सुरु आहे.
तुमच्या सूचनांचे स्वागत आहे आणि अॅप मधे सुधारणा सुरूच राहतील.
तुम्हाला काही सूचना / अडचणी असतील तर इथेच कळवा म्हणजे वेळोवेळी योग्य ते बदल करता येतील.
अँड्रॉईड वर येणार आहे का ?
अँड्रॉईड वर येणार आहे का ?
अँड्रॉईड वर आधीच आहे.
अँड्रॉईड वर आधीच आहे. वरच्या लेखातली लिंक दोन्ही कडे घेऊन जाईल.
अच्छा. धन्यवाद.
अच्छा. धन्यवाद.
अरे वा. छान आमच्यासारखे "रोज
अरे वा. छान आमच्यासारखे "रोज जेवायला काय करू?" मेंबर्स नक्की वापरतील. आय पॅडवर इन्स्टॉल करून ठेवते. शुभेच्छा आणि धन्यवाद.
वेबमास्तर, प्रत्येक युझर
वेबमास्तर, प्रत्येक युझर सुमार एक आकडा दिसतो आहे तो काय आहे ? आणि समजा एखादी रेसीपी नावाप्रमाणे सापडत नाहीये पण युझर लक्षात आहे तर कसं शोधता येईल. उदा. आंब्याचा शिरा रेसीपीचे एक्क्झॅट नाव मला लक्षात नाही. पण दिपांजलीने ती लिहिली आहे हे मला माहित आहे. तर तिच्या नावाप्रमाणे मला रेसीपी शोधता येईल का ?
आणखी एक , अॅप इन्स्टॉल केले आणि मध्येच एक गेमची अॅड आली. आणि ती क्लोज करता आली नाही. शेवटी मग अॅप क्लोज केले.
फार सुंदर उपक्रम आहे हा. आणि किती कष्ट घेतले असतील यासाठी. अभिनंदन वेबमास्तर. नातेवाईकांना फॉर्वर्ड केलेच पण मैत्रिणींच्यातही सांगितले.
वेबमास्तर आपल्या app मध्ये
वेबमास्तर आपल्या app मध्ये बेत काय करावा ? ह्यासारख्या मेन्यू सुचविणारा विभाग add करता येईल का ? माझ्यासारख्या बऱ्याच लोकांना मदत होईल. https://www.maayboli.com/node/2602?page=5
वा! मस्त!
वा! मस्त!
आणि मध्येच एक गेमची अॅड आली.
आणि मध्येच एक गेमची अॅड आली. आणि ती क्लोज करता आली नाही. >> मलापण कालच हा प्रॉब्लेम आला. काही गेम्समधे ती जाहिरात बंद करायची फुली एकदम लहान आणि एकदम कोपर्यात आहे. कितीही लक्षपूर्वक तिथेच क्लिक करायला गेलं तरी अॅप दुकान उघडलं जातंय.
सीमा तो आकडा प्रतिक्रियांचा आहे .
बेत काय करावा, अंदाज किती घ्यावा, माकाचु, पाककृती हवी आहे, भांडी-कुंडी उपकरणे हे भाग पण घालता आले तर अॅपचा वापर वाढेल.
शोध सुविधा देता आली तर छानच
@सीमा. इथे प्रतिसाद
@सीमा. इथे प्रतिसाद दिल्याबद्दल आणि आवर्जून इतरांना सांगितल्याबद्द्ल धन्यवाद. सगळ्या मायबोली करांनी गेलेल्या २५ वर्षात केलेल्या योगदानामुळे हे शक्य झाले आहे. तुम्ही ५-१० पाककृती इथे दिल्या असतील तरी आपण सगळ्यांचा मिळून इतका मोठा डाटाबेस तयार झाला आहे.
मेधा यांनी लिहल्याप्रमाणे काही जाहिरातदार, बंद करायची फुली एकदम लहान ठेवतात पण त्यावर आमचा काहीच कंट्रोल नाही.
नावावरून रेसिपी अॅपमधे शोधण्यासाठी काही तांत्रिक अडचणी आहेत आणि ते सोपे नाही. पण जे मायबोली कर आहेत ते लॅपटॉपवरून किंवा मायबोलीच्या मुख्य अॅपमधे लॉगईन करून , कुठल्याही लेखकाचे सगळे लेखन पाहू शकतात त्यावरून तुम्हाला रेसिपी मिळेल. हे अॅप मुख्यतः जे मायबोलीकर नाहीत किंवा ज्याना लॉगीन न करता पटकन पाककृती हवी असेल त्यांच्या साठी आहे.
@डॅफोडिल्स
मस्त कल्पना. इथे सुचवल्याबद्दल धन्यवाद. तिथे वर्गिकरण नाही, सगळे विस्कळीत आहे ते आधी थोडे व्यवस्थीत करतो. एक मोठी अडचण अशी आहे की हि सुविधा द्यायची तर लॉगिन ची सोय द्यावी लागेल. त्या आधी काही तयार मेनूंचे संकलन केले तर ८०% लोकांची सोय होईल असे वाटते. हे मेनू संकलन कसे जास्त सोयीचे होईल?
@मेधा ,
चांगल्या कल्पना . हे काही करता येते का ते पाहतो. शोध सुविधेचा एक मोठा तांत्रिक प्रश्न म्हणजे सगळ्यांकडे मराठी टायपींग ची सोय नाही . आणि ती अजून आपोआप मायबोलीसारखी अॅप मधे देणे थोडे कठीण आहे. पण सध्या शब्दखुणा दिल्या आहेत. त्यामुळे टाईप न करता टिचकी मारून नेहमीचे शब्द असणार्या पाककृती पाहता येतील.
खूप मस्त आहे.
खूप मस्त आहे.
एखाद्या पाककृती प्रकारात गेल्यावर (जसे की चटण्या, लोणाची) एकच पाककृती अनेक पानांवर रिपीट होतेय. ते टाळता येईल का?
हा प्रश्न इथे योग्य आहे की
हा प्रश्न इथे योग्य आहे की नाही माहिती नाही. पण पाककृती मध्ये फक्त एकच फोटो देता येतो(मुख्यचित्र) नंतर प्रतिसादातच द्यावे लागतात. कधीही स्टेप बाय स्टेप फोटो देताच येत नाहीत. साध्या लेखनाच्या धाग्यावर हा प्रॉब्लेम येत नाही.
अरे वा! डाउनलोड करून बघते.
अरे वा! डाउनलोड करून बघते.
काही विशिष्ठ शब्दखुणा नसल्याने काही पाकृ सापडत नाहीत. पण पाकृ देणार्यांना सांगून उपयोग नाही कारण आता संपादित करता येत नाहीत.
@माधव
@माधव
हे माहिती आहे पण कसे टाळावे ते अजून जमले नाही .
@अस्मिता.
फक्त मुख्य फोटो (जो सगळ्यात वर आहे) हा एकच देता येतो. तीच मर्यादा लेखनाच्या धाग्यालाही आहे.
पण "क्रमवार पाककृती" विभागात फोटो देता येत नाही हे लक्षातच आले नव्हते. धन्यवाद. सोपा बदल आणि लगेच करून टाकला. धाग्यात जसे मजकुरात हवे तसे फोटो देता येतात तसे "क्रमवार पाककृती " मधेही देता येतील (आता पासून) . इतर विभागात मुद्दामच ती सोय दिली नाही. कारण ते विभाग नंतर भविष्यात वर खाली होऊ शकतील.
@सिंडरेला
आम्ही साफसफाई सुरु केली आहे. तुम्हाला कुठल्या शब्दखुणा हव्या आहेत याबद्दल काही सांगितले तर त्या कडेही बघू.
धन्यवाद वेमा .
धन्यवाद वेमा .