मायबोलीच्या पाककृती ग्रूपचे अँड्रॉईड अॅप प्रकाशीत झाले
मायबोलीच्या पाककृती ग्रूपचे अँड्रॉईड अॅप आजच प्रकाशीत झाले.
हे अॅप फक्त पाककृती विभागापुरते मर्यादित आहे. पण त्याचे फायदे
१. पाककृती बघण्यासाठी लॉगीन करण्याची गरज नाही.
२. पाककृतींशी संबंधित लिंक टिचकेसरशी एकत्र आहेत.
३. जेवायला रोज काय करायचे हे सुचवण्यासाठी सोपी सुविधा आहे. सध्या तिथे, याच ग्रूपमधलेच एक पान आहे. पण ही सुविधा अजून उपयोगी करण्याचे काम सुरु आहे.