मायबोली गणेशोत्सव २०२४ - पाककृती स्पर्धा

Submitted by संयोजक on 3 September, 2024 - 11:04

नमस्कार मायबोलीकरांनो,
दरवर्षी गणेशोत्सवात सगळ्यात जास्त आतुरता असते ती पाककृती स्पर्धांची. कितीही अवघड स्पर्धा ठेवली व कितीही अनोखे नियम केले तरी मायबोलीकर कायमच त्यांच्या सृजनशीलतेने एकापेक्षा एक रुचकर पाककृती तयार करून दाखवतात. दरवर्षी संयोजकांपुढे सर्वात गहन प्रश्न असतो तो म्हणजे, 'यावेळेस पाककृती स्पर्धा कोणत्या ठेवायच्या?' हाच !

गणेशोत्सवात गणपती आगमनाची तयारी, त्यानंतर गौरी आवाहन, पूजन, विसर्जन या सर्व धामधूमीत तुम्हाला पाककृती स्पर्धांची तयारी करायला वेळ मिळावा म्हणून यावर्षी पाककृती स्पर्धांची घोषणा श्रीगणेश चतुर्थीच्या आधी करत आहोत.

यावर्षीच्या पाककृती स्पर्धेसाठी विषय खालीलप्रमाणे आहेत

१. One Dish Meal - https://www.maayboli.com/node/85583
२. आरोग्यवर्धक पेय - https://www.maayboli.com/node/85584
३. चटण्या - https://www.maayboli.com/node/85585

या धाग्यांवर त्या पाककृतीविषयीचे नियम आणि स्पर्धेचे नियम याबद्दल माहिती दिली आहे.

तुमच्या काहीही शंका, प्रश्न, सूचना असल्यास येथे जरूर विचारा.

तर मग वाट कसली बघताय.... लागा तयारीला

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चटण्या स्पर्धा चांगला प्रतिसाद मिळाला तर खूप फायदेशीर ठरू शकते सर्वानाच.. One Dish Meal सुद्धा तशीच आहे म्हणा..

मस्त आहेत सगळ्या स्पर्धा...
आत्ता पर्यंत कोणी ही एक ही शंका विचारली नाहिये . चला मीच करते शुभारंभ... One dish मिल मध्ये काकडी टोमॅटो चे काप, ताक, चटणी असे पटकन होणारे पूरक पदार्थ allow आहेत का ?

मनीमोहोर,

वन डिश मील हेच पूर्ण जेवण अपेक्षित आहे. त्याची चव वाढवण्यासाठी त्यात कुठली चटणी, त्याचा पोत बदलण्यासाठी काकडीचे काप त्यात घालायला काहीच हरकत नाही. पण ते पूरक म्हणून बाजूला नको.

@ मेधा
वल्लभाचार्यांना शुभेच्छा. >> आं ! बल्लवाचार्य म्हणायचं होतं का ?
की ही व्हॅलेंटाइन डे ची स्पर्धा आहे

टंकायचा घोळ. बल्लवाचार्यच म्हणायचं होतं.

>>> की ही व्हॅलेंटाइन डे ची स्पर्धा आहे
व्हॅलेंटाईन डेच्या उपक्रमाबद्दल संयोजक योग्यवेळी कळवतील.
तो पर्यंत आपल्या आठवणी साठवून ठेवाव्यात. Wink

-दिलीप बिरुटे

गणपती बाप्पा मोरया !

सर्वांना खूप शुभेच्छा !

या डिश खाण्यासाठी काय सोय आहे ? तेही सांगा ना राव .

स्वतःच्या जबाबदारीवर करायच्या आणि खायच्या, हाकानाका.. पाकृ गंडल्यास स्वतःचा दोष समजावा आणि एकदम झकास झाल्यास पाकृ टाकणाऱ्याला क्रेडिट देऊन त्यांचे वोट वाढण्यासाठी मदत करा..