सत्तुचे पीठ आणी मखाणे स्मुदी
साहीत्य: चार टेबलस्पून सत्तुचे पीठ.
हे मी तयार पीठ आणले आहे.
मखाणे एक वाटीभर,
एक पेअर,
बदाम,
सीडमिक्स
कृती : एकदम सोपी.
सीडमिक्स सोडून सगळे साहीत्य एकत्र करून थोडे पाणी मिसळून मिक्सर केले.
नंतर आवडीप्रमाणे पाणी घालून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची.
वरून सीडमिक्स घालून निवांत प्यायचे.
साहित्य - गव्हाच्या पोळ्या ,
भाजीसाठी - कोबी , गाजर , कांदा , ढोबळी मिरची ( माझ्या घरी हे उपलब्ध होते) , मटार , कॉर्न
किचन किंग मसाला , अमुल बटर , ( हेल्दी हवे असल्यास साजूक तूप ) , मीठ
कृती - १. घरातील उपलब्ध भाज्या स्वच्छ धुवून , बारीक चिरून / फुडप्रो मध्ये बारीक करून घेणे .
२. कढईत तेल घेणे . तेल तापले की त्यात चिरलेल्या भाज्या घालून एक वाफ काढणे . नंतर त्यात मीठ आणि किचन किंग मसाला घालून भाजी करून घेणे .
'खाओ सुये' हे एक बर्मिज पद्धतीचे नूडल सूप आहे. वन डिश मील/ 'एकपात्री प्रयोग' म्हणून त्यातली करी जास्त घातल्यास हलकेफुलके आणि नूडल्स जास्त घातल्यास पोटभरीचे होऊ शकते. संज्योत कीरची पाककृती अचानक फीडमधे आली आणि साक्षात्कार वाटून मीही करायला घेतली. त्यासाठी बर्माला तरफडत जावे एवढीही खास नाही. थाई रेड करी किंवा ग्रीन करी प्रमाणे नारळाचे दूध घालूनच केली जाते पण त्यामानाने अतिशय सोपी वाटली. त्यात संज्योतने दाखवलेले हे व्हर्जन भारतीय पद्धतीचे आहे. त्याने टोफु घाला असे म्हटले नाही पण 'वन डिश मील' मलाच प्रथिनांशिवाय अपूर्ण वाटत होती म्हणून मीच घातला आहे.
कॅरट टॉमॅटो ज्यूस
कोणी जेवायला यायचे असेल तर त्यांना आल्या आल्या नुसत पाणी न देता आपण सरबत, पन्हं , अमृत कोकम किंवा रिअल चा ज्यूस असं काहीतरी पेय देतो. पण ह्या सगळ्यात साखर असल्याने बरेच जण ते घेत नाहीत. तर अश्या लोकांकरता गाजर टोमॅटो ज्यूस हे अगदी चवदार आणि आरोग्य दायी पेय आहे. नक्की करुन बघा.
साहित्य
अर्ध गाजर, एक लाल टोमॅटो, अगदी किंचित आलं आणि हिरवी मिरची, मीठ, सजावटी साठी कोथिंबीर
या नावातला ‘नाच’ हा नाचणीचे लघुरूप आहे, जरा फॅन्सी नाव आकर्षक वाटते म्हणून! (चव घेतली की नाच कराल अशी एक फाको सुचली आहे ती चालवून घ्या.)
साहित्य – एक छोटा चमचा नाचणी पीठ. सत्व वापरण्याची गरज नाही, पण वापरले तरी चालेल. एक कप दूध, अर्धा कप पाणी. दीड चमचा किंवा चवीप्रमाणे साखर, एक छोटा चमचा कोको पावडर (गोड नसलेली) व्हॅनिला किंवा बटरस्कॉच इसेन्स, पौष्टिक पावडर* [खालची टीप बघा.] यातले इसेन्स आणि पौष्टिक पावडर पूर्णतः ऑप्शनल आहे, पण इसेन्समुळे स्वाद खुलतो आणि पौष्टिक पावडरमुळे गुणवत्ता, त्यामुळे वापरा असा आग्रह करेन.
साहित्य -
सलाड साठी -अर्धी वाटी राजमा ( नुसत्या राजमा ऐवजी राजमा+ चवळी पण घेता येईल), अर्धी वाटी वाफवलेले स्वीट कॉर्न, बारीक चिरून लाल, पिवळी आणि हिरवी सिमला मिरची ( सगळ्या मिळून एक -दिड वाटी), एक कांदा बारीक चिरून, एक टोमॅटो बारीक चिरून, हवे असल्यास ऑलिव्हज
खाकरा नाचोज साठी -दोन तिन शिळे फुलके, थोडं तेल, मीठ, गरम मसाला /तिखट / पिरी पिरी सिझनिंग
यावर्षी गणेशोत्सवात पाककृती स्पर्धेत भाग घ्यायचा हे मी आधीच ठरवलं होते. वन डिश मिल ची स्पर्धा जाहिर झाल्यावर तर ५-७ वेगवेगळे पदार्थ आठवले. त्यातले बरेचसे पदार्थ पूर्वी केले होते. गणेशोत्सव सुरू असताना त्यातला कोणताही ताजा पदार्थ करायला नाही जमला तरी किमान जुने फोटो शोधून प्रवेशिका द्यायचीच हे ठरलं होते. आज त्याप्रमाणे पूर्वी केलेल्याच एखाद्या पदार्थाची प्रवेशिका देणार होते.
माबो गणेशोत्सवाची वाट पाहत होतोच तर संयोजकांनी यावेळेस थोडे लवकरच स्पर्धा जाहीर करून टाकल्या. विषय सुद्धा सोपे होते. पण म्हणतात ना सोपे असले की मग जास्ती डोके चालवले जाते. असेच डोके चालवता चालवता काय करावे सुचत नव्हते. सगळ्या गोष्टी - हे सोपे आहे, यात काही नवीन नाही पर्यंत येऊन थांबत होत्या. त्यात बरेच भाताचे प्रकारच सुचत होते. अशाच वेळेस नेहमीप्रमाणे रमड मदतीस आली आणि म्हणाली की तुला खरे म्हणजे कणकेचे पदार्थ जास्ती चांगले जमतात मग काय आमचे विचार धावू लागले आणि या कृतीचा जन्म झाला.
साहित्य :
१. दलिया रवा एक वाटी
२. मुग , मसूर ,तुर डाळी मिळून एक वाटी
३. जीरे
४. अर्धा छोटा चमचा जीरे पावडर
५. २ हिरव्या मिरच्या
६. घरात उपलब्ध भाज्या मटार,गाजर,बीन्स
७. छोटा कांदा (ऑप्शनल)
८. अर्धा टोमॅटो (ऑप्शनल)
९. तुप,तेल
१०. मीठ
११.पाणी