आरोग्यवर्धक पेय- [सत्तुचे पीठ आणी मखाणे स्मुदी]- [निल्स_23]

Submitted by निल्स_23 on 14 September, 2024 - 02:10

सत्तुचे पीठ आणी मखाणे स्मुदी

साहीत्य: चार टेबलस्पून सत्तुचे पीठ.
हे मी तयार पीठ आणले आहे.
मखाणे एक वाटीभर,
एक पेअर,
बदाम,
सीडमिक्स

Screenshot_20240914_113705_Gallery.jpg

कृती : एकदम सोपी.
सीडमिक्स सोडून सगळे साहीत्य एकत्र करून थोडे पाणी मिसळून मिक्सर केले.
नंतर आवडीप्रमाणे पाणी घालून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची.
वरून सीडमिक्स घालून निवांत प्यायचे.

सत्तुचे पीठ म्हणजे फुटाण्याचेच पीठ असते. प्रोटीन रिच. वर्क आऊट करून झाल्यावर, चालून आल्यानंतर हे झट की पट पौष्टिक पोटभरीचे होते.
पेअर ऐवजी सफरचंद ही चालेल. मला पेअरच आवडते पण.
दोन खजुर सुद्धा घालता येतील. भिजवलेले बदाम सुद्धा चालतील पण कच्च्या बदामाचा मध्येच एखादा तुकडा दाताखाली आलेला छान लागतो.

अगदी कमी साहीत्यात झट की पट होणारी चविष्ट अशी सत्तु मखाणा स्मुदी.
जरूर बनवून बघा.

Screenshot_20240914_113845_Gallery.jpgScreenshot_20240914_113925_Gallery.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमच्या २०२० मधील पाकृ एन्ट्री फार क्रिएटिव्ह आणि लक्षवेधक होत्या.. ही सुद्धा त्याच रांगेत आहे Happy

मस्त
हे करुन बघेन

मी दोनवेळेलाच सत्तू ड्रिंकच्या वाटेला गेलेय. एकदा सत्तूत बदाम, अक्रोड, दूध आणि केळे मिक्स करुन केले होते. ते बरे लागले
एकदा दही मिक्स करुन पुदिना मीठ जीरे कोथिंबीर घालून केले ते फार आवडले नाही.

त्यानंतर नाचणी पीठाबरोबर थोडे सत्तू मिक्स करुन करते ते आवडलेय (बहूतेक मला चण्याची चव ओव्हरपॉवर झाली की आवडत नाही)

तुमच्या पद्धतीने करुन बघेन

मस्त प्रकार आहे.एकदम पौष्टिक.फक्त मखाने थेट खायचे असतील तर 1 तास भिजवून,किंवा भिजवायचे नसतील तर अगदी थोड्या तुपात भाजून मग स्मूदित घालावे असं वाटतंय.
हे नाश्ता म्हणून चांगला पर्याय आहे.ऑफिसात न्यायला पण.

मस्त आहे ही स्मूदी!! करायला पण सोप्पी.

दोन खजुर सुद्धा घालता येतील >>> मला गोड आवडतं त्यामुळे खजूर घालून जास्त आवडेल बहुतेक Happy