किल्लीच्या धाग्यावर संदर्भ आला कि खाऊगल्ली सारखा धावूगल्ली धागा असायला हवा.. जीथे रोज कुणी काय व्यायाम केला याचा अपडेट देता येईल...
व्यायाम प्रत्येकाला नियमित केला पाहिजे हे कळतं पण वळत नाही अशी परिस्थिती होते काहीवेळा..इथे इतरांचे अपडेट वाचून कुणी मोटिवेट होत असेल तर तेवढंच पुण्य अपडेट लिहिणार्याला..
तर व्हा सुरू लोकहो.. जे पूर्वीपासून व्यायाम करताएत ते,ज्यांनी नुकताच सुरू केलाय ते आणि ज्यांना सुरू करायचाय असे, सगळ्यांचं स्वागत आहे या धाग्यावर....
नमस्कार.
सकाळी किंवा संध्याकाळी (कधीही सध्या वेळ महत्वाची नाहीये )
घरातून जागेवरून उठून केलेल्या निश्चयास अनुसरून जिम, running किंवा तत्सम ठिकाणी जेथे व्यायाम केला जातो तिथे कसे जावे?
स्थिरपणे निवांत बसलेले असताना, किंवा साखरझोपेतून जागी होऊन, जागेवरून उठून योगासन कशी करावीत?
.
व्यायाम विस्थापन व्यवस्थापन हा अत्यंत दुर्लक्षित विषय आहे. हयाविषयी कुणीही बोलत नाही म्हणून तुमच्या निदर्शनास हा प्रश्न आणत आहे.
कृपया मार्गदर्शन करावे.
सत्तुचे पीठ आणी मखाणे स्मुदी
साहीत्य: चार टेबलस्पून सत्तुचे पीठ.
हे मी तयार पीठ आणले आहे.
मखाणे एक वाटीभर,
एक पेअर,
बदाम,
सीडमिक्स
कृती : एकदम सोपी.
सीडमिक्स सोडून सगळे साहीत्य एकत्र करून थोडे पाणी मिसळून मिक्सर केले.
नंतर आवडीप्रमाणे पाणी घालून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची.
वरून सीडमिक्स घालून निवांत प्यायचे.
यंदाच्या १५ ऑगस्टला खरंतर एक संकल्प केला होता तो म्हणजे, आता किमान एक महिनाभर तरी कुठलाही नवा लेख लिहायचा नाही. कारण ? कारण फक्त एक - मनावर संयम. लिहायचेच नाही असे एकदा ठरवले की आपोआप आपले वाचन, मनन आणि चिंतन वाढते. एरवी नवे लेखनविषय शोधण्यासाठी मनात सतत जो एक कोलाहल चालू असतो तोही थांबतो. खरं म्हणजे त्या संयमाचा शांतपणे अनुभव घ्यायचा होता.
✪ “मै कोई बेचारा नही हूँ, हमें बेचारगी नही, बराबरी चाहिए"
✪ २% लोकांकडे दृष्टी नाही, पण ९८% लोकांकडे व्हिजन नाही
✪ जन्मल्यावर अंध बाळ म्हणून वडिलांनी जमिनीत पुरायचं ठरवलं
✪ वैज्ञानिक डॉ. एपीजे अब्दूल कलामांसोबत भेट आणि त्यांची मदत
✪ क्षमतेला साकार करण्याची वाट दाखवणारी शिक्षिका
✪ सिस्टीमसोबत संघर्ष करून बारावीनंतर विज्ञान घेतलेला पहिला भारतीय दृष्टीहिन विद्यार्थी
✪ अमेरिकेमध्ये उच्च शिक्षण आणि भारतामध्ये ८०% दिव्यांगांना रोजगार देणारा उद्योगपती
✪ प्रतिष्ठेचा पुरस्कार "स्पेशल कॅटेगरीतून नको" म्हणून नाकारण्याची हिंमत
गेल्या महिनाभरातील भारतातील संसर्गजन्य आजारांच्या प्रादुर्भावावर नजर टाकता झिका विषाणूचा उद्रेक ही उल्लेखनीय घटना. त्या अनुषंगाने या काहीशा अपरिचित विषाणूची ही धावती ओळख आणि सद्यस्थितीवर टाकलेली एक नजर.
*हा RNA प्रकारचा विषाणू आहे; म्हणजेच डेंग्यू आणि करोनाच्या जातीचाच.
जागतिक इतिहास :
1. सन 1947 मध्ये युगांडामधील झिका जंगलामध्ये rhesus नावाच्या माकडांमध्ये या विषाणूचा शोध लागला.
2. 1948 मध्ये एडिस जातीच्या डासांमध्ये तो सापडला