वर्ष २०२५: vision board (संकल्प/योजना)

Submitted by किल्ली on 27 December, 2024 - 12:01

नमस्कार मंडळी,

मागील वर्षी संकल्पधाग्याचा https://www.maayboli.com/node/84486
मला बराच उपयोग झाला. Tracker सारखा त्याचा वापर झाला म्हणून ह्याहीवर्षी हा धागा काढतेय.

तुम्हालाही नोंद करायची असेल तर हाच तो आपला हक्काचा vision board आहे असेल समजून संकल्प/योजना किंवा vision लिहू शकता.

इथे अगदी फॅन्सी संकल्पच हवेत असं नाही. बारीकसारीक गोष्टीसुद्धा असू शकतात ज्या ह्या वर्षी करायच्याच आहेत. एक लक्षात आलंय की baby स्टेप्स लिहून त्या पूर्ण केल्या तरी चालू शकतं.
.
२०२४ ची list आणि त्याचे अपडेट्स / टिक्स देते.
१. कार driving शिकणे - जमलं.
ऑफिस, पुणे pcmc, traffic, night driving, पाऊस driving, पुण्यातले घाट driving, parking वगैरे सगळं जमतंय आता. फार narrow space मध्ये गाडी लावायची वेळ येईल अशा ठिकाणी जातच नाही. अजून पन्नास ते साठ च्या वर speed नेली नाही, अजून प्रॅक्टिस लागेल highway ची. Low priority आहे ते.

२. Documents ची कामं- २ मुख्य कामे राहिलीत. बाकी सर्व पूर्ण.

३.माझ्या कामाला पूरक अशी नवीन technology शिकणे आणि त्यात project करणे- एक technology शिकले पण सगळंच जमत आता त्यात

४.मानसिक आरोग्य जपणे आणि stress management - मागच्यावर्षी पेक्षा सुधारणा आहे.

५.लिखाण almost बंद झाले आहे. ते परत सुरु करायचे आहे. माझ्या दोन्ही web sites बंद पडल्यात त्या परत सुरु करायच्या आहेत.
- लिखाण बंदच आहे लिहिलेच नाही काही Sad
पण website सुरु केल्यात live तिकडे content टाकायचा आहे

६.Health आणि व्यायाम : ह्यावर्षी वजन consistently ३ kg ने कमी आहे. डाएट सुधारलं आहे.
Activity वाढवल्या आहेत.
पण व्यायाम व्यायाम म्हणावा इतका नाही झाला.

,...........................
२०२५साठी list
......... ..................
१. व्यायाम - पहिली प्रायोरिटी देणार
Quantified संकल्प करायला हवा पण अजून explore करतेय मला काय suitable आहे ते मग लिहिते.
सध्या minimum १२ सूर्यनमस्कार झालेच पाहिजेत असं लिहिते.
२. फिटनेस साठी पूरक आहारातील बदल

३. नविन टेकनॉलॉजि शिकणे
४. Documents ची कामं
५. लिखाण सुरु करणे

६. ह्यावर्षी चा नविन संकल्प हा की अनावश्यक बडबड करणार नाही. उत्तम श्रोता व्हायचा प्रयत्न करेन रोजच्या आयुष्यात.
..
फार काही लिहीत नाही हेच खूप आहे.
पहिले ३ points दरवर्षी असणारेत. त्यात प्रगती व्हायला हवी एवढीच स्वतःकडून अपेक्षा आहे.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

खूप छान आणि मनापासून लिहिलंय. सगळे संकल्प पूर्ण व्हावेत अशी शुभेच्छा.

माझ्या लाडक्या आवडत्या ग्रहाचे गुणधर्म आत्मसात करण्यावरती भर देणार आहे - शनि
- काटकसर
- कष्टाळू वृत्ती
- अनअ‍ॅझ्युमिंग नेचर
- जबाबदार्‍या पेलणे
- वक्तशीरपणा
- कमी वाचाळता
- सिरिअस आऊटलुक
- लेस स्मॉल टॉक
- आपल्या कर्माची जबाबदारी आपण घेणे
- कोणालाही ब्लेम न करणे
-------------------------------
नेल बायटिंगही एकदम कोल्ड टर्की जायचे आहे
--------------------------------
शेपमध्ये येणे. निदानपक्षी जे कमावलय ते तरी टिकवणे Sad

किल्ली, तुझे अपडेट आणि त्यातील सातत्य वाखाणण्यासारखे आहे. Happy
अनेक शुभेच्छा! ५ नंबरला वर आण.

तुझे नंबर पाच मी मायबोलीवर जगतो. लिखाण स्ट्रेसबस्टर आहे . फार विचार न करता लिहीत सुटतो. मग धागे असो की प्रतिसाद. तू ही विचार करू नकोस फार.. लिखाणाला मुहूर्त नाही मूड बघायचा असतो.

आणि तुझे नंबर सहा मी प्रत्यक्ष आयुष्यात आहे. अनावश्यक बडबड करत नाही. सगळ्यांचे शांतपणे ऐकून घेतो. आयुष्य सोपे होते.

तुला आणि सर्वानाच आपापले संकल्प पूर्ण होण्यासाठी शुभेच्छा..
मी मात्र संकल्प करायच्या भानगडीत पडत नाही. उगाच त्याचे लोड नको Happy

अभिनंदन.
संकल्प जाहीररित्या केले आणि पूर्णही केले.
येत्या दोन ते तीन वर्षात हिमालयातलं एक कमी उंचीचं शिखर जमेल तिथपर्यंत चढायचा हा विचार आहे. त्या दृष्टीने या वर्षात फिटनेस राखणे आणि सिंहगड चढण्याचा गोल पूर्ण करणे एव्हढंच इथे लिहू शकेन.

किल्ली तुझ्याकडून इन्स्पिरेशन घेऊन इथे लिहीतेय.
1. चारचाकी टेक्निकली चालवता येते. पण मुंबईत गाडी काढायची भिती वाटते. २०२५ मध्ये मला कुठेही एकटीने चारचाकी चालवायची आहे.
2. २०२५ मध्ये अभ्यास करून नोकरी बदलायची आहे.
3. २०२५ मध्ये दररोज १ तास व्यायामाला द्यायचा आहे.
4. वजन ५ किलो कमी करायचे आहे.
5. कपडे व मेक-अप इंपल्स बायिंग बंद करायचे आहे.
6. आत्तापर्यंत मुलीचा रेग्युलर अभ्यास घेत नव्हते. आता तिला अभ्यासाची गोडी लावायची आहे.

पॉईंट १, ३, ४, ५ साठी तुमच्या सुचना व सल्ले यांचे स्वागत आहे.

येत्या दोन ते तीन वर्षात हिमालयातलं एक कमी उंचीचं शिखर जमेल तिथपर्यंत चढायचा हा विचार आहे. >>

हिमालयातले शिखर जमले नाही तरी अन्नपूर्णा बेस कॅम्प ट्रेक नक्की जमेल आणि आवडेलपण. (मी लेख लिहायला सुरुवात केली आहे, लवकरच टाकतो इथे.) तोच माझा संकल्प Wink

धन्यवाद उबो. वाचणार आहे तुमची लेखमाला. पूर्ण करा.

या आधी केलेत मी हिमालयीन ट्रेक. एक देवीचं देऊळ आहे ढगातलं. तिकडे जायचे आहे.

किल्ली छान यंदाचे 2025 चे संकल्प असेच पूर्ण होवोत शुभेच्छा.
माझेमन तुम्हालाही शुभेच्छा .
तुमच्याकडून प्रेरणा घेऊन माझेही goals डायरी मध्ये लिहून काढेन ठांकु.

Happy किल्ली, खूप कौतुक आणि शुभेच्छा. ड्रायव्हिंग बद्दल खूपच कौतुक. लेखनासाठी शुभेच्छा. छान मनापासून लिहिले आहेस, दोनदा वाचले.

किल्ली, रिस्पेक्ट! मागचे संकल्प बऱ्यापैकी अवघड होते, विशेषतः एखाद्या गोष्टीची भीती ओलांडून पुढे जाऊन ती गोष्ट शिकणे. प्रेरणादायी आहे हे.

किल्ली
हा धागा काढल्याबद्दल अभिनंदन आणि संकल्प पूर्ण केल्याबद्दलही .

आणि नवीन वर्षाच्या संकल्पासाठीही शुभेच्छा !

ठरवायला तर पाहिजे पण होत काहीच नाही .

वाचन आणि लेखन दोन्ही होत नाही .
ते जमलं आणि इतरही मनात असलेल्या थोड्या गोष्टी जमल्या तरी पुरे , अशी अवस्था .

पाहू या , नवीन वर्षात प्रयत्न करिन .

आणि सर्व माबोकरांना - तुमचे संकल्प पूर्ण होवोत !

अभिनंदन आणि शुभेच्छा किल्ली..
मी काही जास्त संकल्प करत नाही मात्र शारिरीक आणि मानसिक आरोग्याकडे नीट लक्ष द्यायचे हे मात्र ठरवलेयं..
वाचन, लेखन जमेल तसं पुढच्या वर्षी पण राहिलचं...!

धन्यवाद मंडळी
ह्या वर्षी व्यायाम, शारीरिक मानसिक आरोग्य उत्तम ठेवणे प्रायोरिटी असणारे Happy
कठीण आहे.
घासून गुगुळीत झालेला संकल्प, सगळीकडे हेच दिसेल. पण मला खरच गरज आहे

तुझा मागचा धागा वाचून मीही ठरवले होते की वजन कमी करायचे.पण झाले/केले नाही.आता पुढील वर्षी त्या दिशेने प्रयत्न करणार.
पण मला खरच गरज आहे...... मलाही.

सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुम्हाला सगळ्यांना भरभराटीचे जावो, सगळ्या ईच्छा आकांक्षा पूर्ण होवो आणि सुख समृद्धी लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना.

वर पेरायला फक्त थोडी कोथिंबीर आणा; गेल्या नववर्षाचे संकल्प तसेच पडून आहेत, त्यांनाच जरा खमंग फोडणी देतेय !!!rio-ds.JPG

किल्ली great आहेस..बरेच संकल्प पूर्ण केलेस..माझा चार चाकीचा संकल्प अजून pending आहे..:(
बघू कधी मुहूर्त लागतो .

मी खूप लेख अर्धवट लिहून ठेवले आहेत. कंटाळा, आळस ह्या जीवलग मित्रांमुळे पूर्ण केले जात नाहीत. ते पूर्ण करायचे आहेत. एकेकाळी अधाशासारखं वाचत असे. आता मोबाईलमधे सगळा वेळ घालवते. ह्या वर्षात निदान १२ पुस्तकं वाचायची आहेत. पूर्वीच्या माझा हा महिन्याचा कोटा होता. पण निदान तेवढं तरी.
१ वर्षात किमान बारा पुस्तके वाचणे
२ स्क्रीन टाईम दोन तासापेक्षा कमी करणे.
३ ऑडिओ ब्लॉग सुरू करणे
४ जमल्यास शेतीचा व्हिडीओ ब्लॉग सुरू करणे
५ अभ्यास, व्यायाम , मेडीटेशन, योग्य खाणे ह्यात सातत्य आणणे
६ बाह्य परिस्थिती, दुसर्‍याची मते, सांसारीक ताणतणावांचा आपल्या आतल्या शांततेवर फार परिणाम न होऊ देणे.

सध्या इतकं पुरे!!

2023 मध्ये गिरनार यात्रा केली होती. 2025 मध्ये मुलासोबत गिरनार यात्रा करायची ईच्छा आहे.
जमल्यास पायी पंढरपूर वारी पण करायची ईच्छा आहे. माझ्या काही नातलगांना मी कित्येक वर्षांत प्रत्यक्ष भेटले नाही त्यांना भेटायची ईच्छा आहे.
भगवंत सगळे घडवून आणेल आणि बळ पण देईल.

Pages