वर्ष २०२५: vision board (संकल्प/योजना)

Submitted by किल्ली on 27 December, 2024 - 12:01

नमस्कार मंडळी,

मागील वर्षी संकल्पधाग्याचा https://www.maayboli.com/node/84486
मला बराच उपयोग झाला. Tracker सारखा त्याचा वापर झाला म्हणून ह्याहीवर्षी हा धागा काढतेय.

तुम्हालाही नोंद करायची असेल तर हाच तो आपला हक्काचा vision board आहे असेल समजून संकल्प/योजना किंवा vision लिहू शकता.

इथे अगदी फॅन्सी संकल्पच हवेत असं नाही. बारीकसारीक गोष्टीसुद्धा असू शकतात ज्या ह्या वर्षी करायच्याच आहेत. एक लक्षात आलंय की baby स्टेप्स लिहून त्या पूर्ण केल्या तरी चालू शकतं.
.
२०२४ ची list आणि त्याचे अपडेट्स / टिक्स देते.
१. कार driving शिकणे - जमलं.
ऑफिस, पुणे pcmc, traffic, night driving, पाऊस driving, पुण्यातले घाट driving, parking वगैरे सगळं जमतंय आता. फार narrow space मध्ये गाडी लावायची वेळ येईल अशा ठिकाणी जातच नाही. अजून पन्नास ते साठ च्या वर speed नेली नाही, अजून प्रॅक्टिस लागेल highway ची. Low priority आहे ते.

२. Documents ची कामं- २ मुख्य कामे राहिलीत. बाकी सर्व पूर्ण.

३.माझ्या कामाला पूरक अशी नवीन technology शिकणे आणि त्यात project करणे- एक technology शिकले पण सगळंच जमत आता त्यात

४.मानसिक आरोग्य जपणे आणि stress management - मागच्यावर्षी पेक्षा सुधारणा आहे.

५.लिखाण almost बंद झाले आहे. ते परत सुरु करायचे आहे. माझ्या दोन्ही web sites बंद पडल्यात त्या परत सुरु करायच्या आहेत.
- लिखाण बंदच आहे लिहिलेच नाही काही Sad
पण website सुरु केल्यात live तिकडे content टाकायचा आहे

६.Health आणि व्यायाम : ह्यावर्षी वजन consistently ३ kg ने कमी आहे. डाएट सुधारलं आहे.
Activity वाढवल्या आहेत.
पण व्यायाम व्यायाम म्हणावा इतका नाही झाला.

,...........................
२०२५साठी list
......... ..................
१. व्यायाम - पहिली प्रायोरिटी देणार
Quantified संकल्प करायला हवा पण अजून explore करतेय मला काय suitable आहे ते मग लिहिते.
सध्या minimum १२ सूर्यनमस्कार झालेच पाहिजेत असं लिहिते.
२. फिटनेस साठी पूरक आहारातील बदल

३. नविन टेकनॉलॉजि शिकणे
४. Documents ची कामं
५. लिखाण सुरु करणे

६. ह्यावर्षी चा नविन संकल्प हा की अनावश्यक बडबड करणार नाही. उत्तम श्रोता व्हायचा प्रयत्न करेन रोजच्या आयुष्यात.
..
फार काही लिहीत नाही हेच खूप आहे.
पहिले ३ points दरवर्षी असणारेत. त्यात प्रगती व्हायला हवी एवढीच स्वतःकडून अपेक्षा आहे.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

भाऊ Lol
. #मोनिषा mode
दाल एक साल पुरानी है वो तुरंत दिख गया, धनिया fresh काट के डाला है वो नही दिखा तुम्हे साहिल
.
धन्यवाद Happy मंडळी

किल्ली, गेल्या वर्षीचा संकल्पावरचा धागा वाचला होता. त्यावरचे अपडेट सुद्धा वाचत होते. तेव्हाच कौतुक वाटायचं! नवीन संकल्प पूर्ती साठी खूप शुभेच्छा!
१) नेहमीप्रमाणे यावर्षी सुद्धा आरोग्याला वरच्या नंबर वर ठेवलंय. वजनापेक्षा फिटनेस ला महत्त्व देणं. ( काहीही झालं तरी) व्यायामात सातत्य राखण्यावर भर द्यायचं ठरवलं आहे.
२) दुर्ग भ्रमण करायची बऱ्याच वर्षांपासून इच्छा आहे पण तेवढा कॉन्फिडन्स नाही. त्यामुळे महिन्यातून एकदा छोटी टेकडी चढायचं ठरवलं आहे.

सर्व माबोकरांना नववर्षाच्या शुभेच्छा!
ह्या वर्षीचा संकल्प. रआ ह्यांचा आदर्श पुढे ठेवून मायबोली सदस्यत्व अकौंट बंद करून टाकणे/घेणे.

किल्ली, छान.
सगळ्यांचे संकल्प मस्त आहेत. संकल्प पूर्तीसाठी सर्वांना शुभेच्छा.
माझे संकल्प लवकरच लिहितो इथे.

१. व्यायाम - नेहमीप्रमाणे सुरू ठेवणार. रनिंगमध्ये स्वतःचे पर्सनल रेकॉर्ड तोडण्याची सुप्त इच्छा मनात आहे. Happy
२. साखर खाणे कमी करणार.
३. जे मला नियमित फोन करतात, शुभेच्छा देतात केवळ त्यांनाच उलट फोन करणार/शुभेच्छा देणार.
४. सल्ले देणे कमी करणार/बंद करणार. "Never explain―your friends do not need it and your enemies will not believe you anyway."
५. गेल्या वर्षीच्या संख्येपेक्षा जास्त पुस्तके वाचणार.
६. किमान २ नवीन देश बघणार. (२०२४ मध्ये ४ बघितले.)

माझे नवीन वर्षाचे संकल्प वगैरे नसतात काही.. जेव्हा जे मनात येईल तेव्हा सुरू करून मोकळी होते..
यावर्षी जे आहे ते कंटिन्यू करणार...अवघड योगसने प्रकार - बैलंसिंगवाले वगैरे जमत नाहीत अजून ते करायचे आहे..
वाचन जमेल तसं चालू आहेच..

अजून काही गोष्टी ठरवल्या :
१.दुसरं कोणी चिडचिड करत असेल, negative mood मध्ये असेल तर आपणही ती energy absorb करून बसायचं नाही. फरक पडू न देणे साध्य करायचे आहे. अति sensitive nature काही कामाचे नाही
२. Productivity वाढवणे, कामाच्या जागी आणि वैयक्तिक कामे करताना, जे काम करतोय त्या क्षणाशी प्रामाणिक राहायचे आहे.

अरे वा छानच प्रगती आहे की तुझी!
>> ह्यावर्षी वजन consistently ३ kg ने कमी आहे. डाएट सुधारलं आहे.
ब्राव्हो

मी कुठलेच संकल्प लिहीणार नाही. लिहीलेकी मानसिक दबाव येतो Biggrin

आज जानेवारी चा शेवटचा दिवस
status देना बनता है
१. व्यायाम : बारा सूर्य नमस्कार (केले )
सूक्ष्म व्यायाम आणि प्राणायाम सुद्धा add केला
Walking नियमित झालं नाही.
( better than nothing बाकी काय )
२. आहारात बदल : बोंब आहे इकडे.
फेब्रुवारी महिना: no sugar सुरु करतेय उद्यापासून
३ आणि ५, ६: काही नाही झालं Sad
४ काही काम झाली. ती बरीच आहेत.

मराठी नवीन वर्ष सुरू होणार उद्या!
संकल्प अर्धे राहिले असतील तर परत प्रेरणा घेउन सुरवात करू शकतो.
उद्या
रविवार
आपलं नविन वर्ष
हॆ सर्व आहे,
स्वयम विचार किजीये Happy Happy
झकासराव आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद

Q1 status update:
सहा नंबर जमेल असं वाटत नाहीये.
उलट ह्या वर्षांत जास्त बिनधास्त बोलायला लागलीये मी असं वाटतंय.. Proud
व्यायामच्या दृष्टीने जानेवारी फेब्रुवारी चांगला गेला
मार्च on/off होता
आहार मात्र फेब्रुवारी मार्च मध्ये बराच बरा होता.
.
Documents ची कामं पाणी घातल्यासारखी वाढत आहेत. करतेय.
.
लिखाण शून्य.
.
गाणं शिकायचंय
.
Class शोधणे सुरु आहे माझ्या सोयीनुसार आणि आळंदीत असा.

किल्ली तुझा हा धागा म्हणजे या लेखातल्या पार्टी सारखंच काहीसं वाटतं.
IMG_20250330_090131.jpg
गोल्स तर माझेही थोडेफार सेम आहेत .
संकल्प म्हणायचं नविन गोष्टी शिकायाच्या आहेत . इथे पब्लिक ट्रान्सपोर्ट चांगली असल्यामुळे कधी टू व्हीलर चालवायची गरज पडली नाही पण आता शिकायचीय कमीत कमी गोव्याला जाऊन तिथे चालवायची आहे .

ऑनलाइन माहितीचा ओघ नुसता मेंदूत साचत असतो जो कधीकधी काहीच कामाचा नसतो त्याऐवजी सिलेक्टेड गोष्टी वाचायच्या.टुकार कायच्या काय रिल्स कमी पाहायच्या Proud हा महत्वाचा संकल्प .

क्राईम आणि व्हॉइलेन्स वाल्या वेबसिरीज कमी करून चांगली पॉझिटिव्ह पुस्तक ऑफलाईन वाचायची आहेत.

परत चित्रं काढायची आहेत लॉकडाऊन च्या आधीपासून आणलेले कलर्स ,त्यांना अजून मुहूर्त भेटत नाहीये .
बाकी व्यायाम आणि हेल्दी खाणं कंसिस्टंट ठेवायचंय.जे की अधून मधून ढेपाळतं. पण पोर्शन कंट्रोल मुळे बर्यापैकी टिकून आहे.

Pages