मुलं जास्त स्वच्छ असतात कि मुली हा संशोधनाचा विषय आहे.
शाळेत असताना एक मुलगी आम्हाला म्हणाली होती " बॉईज आर डर्टी" . मुलांचे मैदानी खेळ मातीत असतात. आत्ताच्या शाळात सिमेंट असेल असले तर. पण आम्ही तर मातीतच खेळायचो. त्यात युनिफॉर्म पांढरा स्वच्छ शर्ट आणि करडा टाय होता. करड्या निळ्या रंगाची हाफ / फुल पँट असायची. मातीने कपडे भरून जायचे. मुलींचा युनिफॉर्म काळपट निळा होता. त्याच्यावर धूळ समजून यायची नाही. हे कारण असेल.
पण नंतर पण मुलींचं हे मत नेहमी ऐकू यायचं. मी तर रोज स्नान करायचो. अजून करतो. रोज केस पण धुतो.
उलट मुली आठवड्यातून एकदाच केस धुतात.
जागतिक पातळीवर पाहता स्तनांचा कर्करोग हा स्त्रियांच्या कर्करोगांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग आहे. हा आजार शहरी भागात आणि सामाजिक व आर्थिकदृष्ट्या उच्च गटातील स्त्रियांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येतो. याचे प्रमाण कॉकेशिय गौरवर्णीयांमध्ये सर्वाधिक आहे. गेल्या काही वर्षांत भारतातील जेमतेम चाळीशीत असणाऱ्या स्त्रियांमध्ये या आजाराचे प्रमाण वाढते आहे. या कर्करोगाच्या उपप्रकारांपैकी सुमारे 80 % रोग पसरणारे व आक्रमक स्वरूपाचे असतात. सामाजिक व आर्थिकदृष्ट्या कनिष्ठ वर्गात या रोगाचे प्रमाण तुलनेने कमी असले तरी त्यांच्यातील कर्करोग्यांच्या मृत्यूचे प्रमाण मात्र जास्त आहे.
आज (१९ जून ) जागतिक सिकल सेल आजार-जागृतीदिन आहे.
त्या निमित्त या आजाराची संक्षिप्त माहिती, त्याची भारतातील व्याप्ती आणि दीर्घकालीन उपाययोजना यांचा हा धावता आढावा.
आजाराचे स्वरूप
* रक्तातील हिमोग्लोबिनमध्ये झालेल्या जनुकीय बिघाडाने होणारा हा आजार आहे. त्याचा शोध सन 1910मध्ये लागला.
* तो आनुवंशिक असून लिंगभेदविरहित आहे.
पूर्वार्ध इथे: https://www.maayboli.com/node/83490
…………………………………………..
उत्तरार्ध
पहिल्या रंजनप्रधान भागात आपण निरोधची इतिहासकालीन संकल्पना, त्याचा शोध आणि शास्त्रशुद्ध विकास या गोष्टींचा विचार केला. या भागात आपण त्याच्या खालील शास्त्रीय पैलूंचा विचार करणार आहोत:
१. गर्भनिरोधनातील यशापयश
२. गुप्तरोगांपासून संरक्षण
३. वापराचे दुष्परिणाम/ समस्या
४. विल्हेवाट आणि पर्यावरण
वेल, मायबोली वरचा माझा मागचा धागा... आणि आज अल्मोस्ट झालेला महिना.
खूप लोकांनी कॉन्टॅक्ट केलं, मानसिक आधार दिला, त्याची भरपाई नाही करू शकत...
माझी एक मैत्रीण मला कायम म्हणते...
तू खूप अवघड आहेस.
वेल, हे काही अंशी खरं आहे.
मी अवघड आहे, आणि अती महत्वाकांक्षी सुद्धा...
मी प्रयत्न करतो, करतच राहतो... आणि अजिबात प्रयत्न सोडत नाही...
आणि त्या प्रयत्नांनीच बऱ्याचदा घात होतो...
पण एक आहे, घात झाला तरी चालेल, पण प्रयत्न करणं सोडायचं नसतं...
सो...
आज अजून काहीतरी सांगतो...
एक महिना झाला, मी धागा काढून... आणि आज काही बदललं आहे?