पूर्वार्ध इथे: https://www.maayboli.com/node/83490
…………………………………………..
उत्तरार्ध
पहिल्या रंजनप्रधान भागात आपण निरोधची इतिहासकालीन संकल्पना, त्याचा शोध आणि शास्त्रशुद्ध विकास या गोष्टींचा विचार केला. या भागात आपण त्याच्या खालील शास्त्रीय पैलूंचा विचार करणार आहोत:
१. गर्भनिरोधनातील यशापयश
२. गुप्तरोगांपासून संरक्षण
३. वापराचे दुष्परिणाम/ समस्या
४. विल्हेवाट आणि पर्यावरण
स्त्री-पुरुषांच्या कामक्रीडेतील सुखाची सर्वोच्च पातळी म्हणजे संभोग. ही क्रिया संबंधित जोडप्याला सुख देण्याबरोबरच मानवी पुनरुत्पादनाशीही जोडलेली आहे. सुयोग्य काळात केलेल्या संभोगातून स्त्री-बीजांडाचे फलन होण्याची शक्यता बऱ्यापैकी असते. जेव्हा एखाद्या जोडप्याला नैसर्गिकरित्या अपत्यप्राप्ती नको असते त्या काळात विविध गर्भनिरोधक साधनांचा वापर केला जातो. या प्रकारची साधने पुरुष आणि स्त्री या दोघांसाठी वेगवेगळ्या स्वरूपात उपलब्ध आहेत.
फार फार लहान असताना टीव्हीवर एक निरोधची जाहीरात लागायची. नेमकी काय कशी ते आता आठवत नाही. पण असे सातत्याने काँडम काँडम निरोध निरोध त्यात बोलले जायचे. बहुतेक हेतू हा होता की काँडम हा शब्द उचारायला जो संकोच आपण करतो तो निघून जावा. बहुधा ती जाहीरात कुठल्या काँडम बनवणार्या कंपनीची नसून सरकारची होती. लोकसंख्येवर नियंत्रण ठेवणारी कॉंडमसारखी साधने वापरताना लोकांनी मेंगळटासारखे वागू नये असा त्यामागे हेतू असावा. आणि तो आमच्यापुरता तरी सफल झाला. म्हणजे ते आमचे काँडम वापरायचे वय नव्हते, पण तो शब्द उच्चारतानाचा संकोच निघून गेला.