Submitted by sneha1 on 28 May, 2023 - 11:50
तसा विमानप्रवास मला फारसा आवडत नाही, कारण मला उलट्या होतात. पण त्याची भीती अशी कधी वाटली नाही. भारताबाहेर राहत असल्याने कधीच विमानप्रवास केला नाही असे पण नाही. पण तीन वर्षांपूर्वी बीचला जायचे म्हणून विमानाने गेलो, आणि दोन तासाच्या प्रवासामधे कोण जाणे खूप भीती वाटली. नंतर कोव्हीड मुळे कुठे जाणे झालेच नाही विमानाने. आणि आता विमानाने पुन्हा जाण्याची खूप भीती वाटते आहे, मी टाळायलाच बघते आहे. डॉक्टरांना विचारल्यावर त्यांनी सांगितले की असे होते कधी कधी, आणि anxiety ची गोळी तेव्हा घ्यायला सांगितली.
असा अनुभव, किंवा ह्याबद्दल काही माहिती आहे का कोणाला? टिप्स वगैरे? कारण आयुष्यभर तर विमानप्रवास टाळू शकत नाही!
धन्यवाद!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अँग्झायटीची गोळी घ्या व
अँग्झायटीची गोळी घ्या व प्रवासात झोपून जा. कारच्या अपघातांचे प्रमाण , विमानाच्या अप्घातांपेक्षा कित्येक पटींनी जास्त असते. मुलगी वारंवार जग फिरत असते. मलाही भीती वाटते पण गणपतीच्या कॄपेने ....
असो. विमानाचे अपघात फार नगण्य होतात.
मलाही कधीकधी वाटते टेक ऑफ ला.
मलाही कधीकधी वाटते टेक ऑफ ला.आधी वाटायची नाही.mh 370 नंतर खूप प्रमाणात विमान अपघाताच्या बातम्या फॉलो केल्याने वाटू लागली.पण टेक ऑफ नंतर काही काळाने रिलॅक्स करता येते.
अगदी बसताच येणार नाही इतकी वाटत असंल्यास फ्लॉवर रेमेडी/पुष्पऔषधी चा चांगला उपयोग होईल.
टिप्स नाही पण अनुभव शेअर करतो
टिप्स नाही पण अनुभव शेअर करतो.
एका विमान अपघाताची बातमी ताजी असताना मी प्रवास करत असलेल्या विमानाला इमर्जन्सी लॅंडिंग करावे लागले त्यांनतर काही काळ झाले होते असे. कॅप्टनने अनाउंसमेंट सुरू केली की आता इमर्जन्सी अनाउंस करतो की काय असे वाटायचे.
मी मग विमानातच आनापान (श्वासावर लक्ष केंद्रित करून विचार थांबवण्याची क्रिया) करायचो त्याने बरे वाटायचे.
विमानतळावर निघताना या वेळेस भीती अजिबात वाटू द्यायची नाही असा निश्चय करून जायचो पण विमानात बसल्यावर वाटायची. पण प्रत्येक वेळी अजुन निश्चय करून जायचो. आधी पूर्ण प्रवासात पुस्तक वाचणेही होत नव्हते भीती मुळे. मग हळुहळु टेक ऑफ पूर्ण होऊन सीटबेल्ट साइन बंद झाली की पुस्तक थोडे थोडे वाचणे जमू लागले. हळुहळु सुधारणा होत गेली. वर्ष दिड वर्षात गेली भीती पूर्णपणे.
धन्यवाद. थोड्या वेळात उत्तरे
धन्यवाद. थोड्या वेळात उत्तरे देते.
विमानाची भीती आता वेगळया
विमानाची भीती आता वेगळया कारणामुळे वाटू लागली आहे. याआधी बराच वेळा domestic viman प्रवास केला आहे. पण गेल्या वर्षी डिसंबरमध्ये आधी reservation केलेली ट्रेन delay झाली त्यामुळे अचानक विमान प्रवास करावा लागला. घाईगडबडीत निघाल्याने कानासाठी कॉटन प्लग वेगैरे घ्यायचे राहिले. पुण्यात पोचल्यानंतर 2 दिवसांनी अचानक चक्कर यायला लागली. Continue चक्कर, पूर्ण भिंती गोल फिरत होत्या. मग admit करावं लागलं आणि व्हर्टीगो चं निदान झालं. विमान प्रवासात दडे बसले तेव्हा कानातले fluid किंवा काही dr. च्या मते खडे हलले त्यामुळे हे झालं. आता कायमची भीती बसली आहे.
सामो, गोळी घ्यावी लागेल असं
सामो, गोळी घ्यावी लागेल असं वाटतं आहे खरं. पण चिडचिड होते आहे, असं आधी कधी झालं नव्हतं ना. कधी अशी गोळी पण घ्यावी लागली नाही.
मी अनु, फ्लॉवर रेमेडी/पुष्पऔषधी बद्दल थोडी माहिती देता येईल का? लिन्क दिल्या तरी चालेल.
मानव, मला पण आता प्रयत्न करायची इच्छा होते आहे. पाहू कसे जमते!
सान्वी, बापरे!
पुढील वेळी विमान प्रवासात
पुढील वेळी विमान प्रवासात लॉलीपॉप किंवा chewing gum चघळून बघा. लहान बाळांना pacifier द्यायचा उपाय आहे, पण मोठ्यांना तो योग्य नाही, म्हणून वरील उपाय सांगितला आहे.
उपाशी बोका, पण ते तर कानात
उपाशी बोका, पण ते तर कानात दडे बसू नये म्हणून करतात ना? टेक ऑफ आणि लॅन्डिगच्या वेळी मी पण करते.
मी कधी वापरली नाहीय पुष्पऔषधी
मी कधी वापरली नाहीय पुष्पऔषधी.पण बऱ्याच जणांना फायदा झाल्याचे ऐकून आहे.माझ्या माहितीत रश्मी(मायबोलीवर सहेली आयडी) याचा कोर्स करून उपचार करते. एकदा संपर्क करून बघ.
धन्यवाद!
धन्यवाद!
आज्काल सत्त येणार्या कस्काय
आज्काल सत्त येणार्या कस्काय वरच्या बातम्या वाचून लोकांमध्ये अन्झाय्टी वाढलीय.
दुसरे कारण, तुम्ही एखाद्या काळजीयुक्त परीस्थित्तीतून जात आहात का?
किंवा चिंता भाडावते आहे का? मग त्याने सुद्ध होते असे. मला झाले होते इतके की विमानातून बाहेर पडावे असे वाटले. डॉक्टरची अनॉउन्समेंट सुद्धा केली आणि डॉक्टर मिळाला नशिबाने व झोपून रहायला सांगितले व त्यावेळी तीन सीट रिकाम्या होत्या सुद्धा त्या मिळाल्या.
आज्काल सत्त येणार्या कस्काय
आज्काल सत्त येणार्या कस्काय वरच्या बातम्या वाचून लोकांमध्ये अन्झाय्टी वाढलीय.
दुसरे कारण, तुम्ही एखाद्या काळजीयुक्त परीस्थित्तीतून जात आहात का?
किंवा चिंता भाडावते आहे का? मग त्याने सुद्ध होते असे. मला झाले होते इतके की विमानातून बाहेर पडावे असे वाटले. डॉक्टरची अनॉउन्समेंट सुद्धा केली आणि डॉक्टर मिळाला नशिबाने व झोपून रहायला सांगितले व त्यावेळी तीन सीट रिकाम्या होत्या सुद्धा त्या मिळाल्या.
व्हॉटसप वरच्या 'बातम्या' नी
व्हॉटसप वरच्या 'बातम्या' नी अर्थातच वाढत नाही अस्वस्थता.पण गेल्या काही वर्षात प्लेन क्रॅश च्या जितक्या बातम्या नेहमीच्या मीडियात आल्या त्यामुळे वाढते.क्रॅश आधी पण होत असतील.किंवा जगात विमान प्रवासाचे प्रमाण वाढले म्हणून संख्या वाढली, पण मूळ अगदी लहान शक्यतेचा टक्का 40 वर्षांपूर्वी होता तितकाच आहे इतकं साधं संख्याशास्त्र गणित असेल ते.आपल्याला मात्र बातम्यांत वाचून 'बघा सारखी पडतायत नेपाळ ची/इंडोनेशिया ची विमानं' असं चित्र उगीच बनत जातं.
पण हे शांत ब्रिदिंग आणि काही अफरमेटिव्ह स्टेटमेंट्स मनात घोळवून कमी करता येतं.स्वानुभव.
एकदा पॅरिसला उतरताना
एकदा पॅरिसला उतरताना अक्षरशःहा समोर यमराज दिसला होता. बर्फाचे वादळ येवुन गेले होते. प्रचंड वारा होता. त्यातच उतरवल होत. तरीही मला नंतर भिती वाटली नाही कधी. पण एकदा मुंबई पुणे जाताना बस speed breaker वरुन जाताना जोरात उडुन वरचा AC vent डोक्यात लागला होता. भरपुर रक्त आले होते. बरेच दिवस ड्रेसिंग करावे लागले होते. तेव्हा पासुन आजफागायत मी बसमधे पहिल्या दोन रो मधेच बसतो. मागच्या सिटवर बसायची अजुन भिती वाटते.
विमान वर जातांना आणि खाली
विमान वर जातांना आणि खाली येतांना सतत पाण्याचे घोट पित रहातो... जेव्हढे लवकर कानातले प्रेशर बॅलन्स होईल तेव्हढे चांगले, त्रास कमी होतो.
प्रवास कंटाळा यावा एव्हढा लांबचा असतो. कुठलीच हालचाल न केल्यास deep vein thrombosis च्या त्रासाची शक्यता वाढते, म्हणून दर २-३ तासाने विमानांत एक चक्कर मारायची, पाय मोकळे करायचे. कोपर्यात उभे रहाण्यासाठी जागा मिळाली तर हात/ मानेचा छोटा व्यायाम करायचा. पाणी/ चहा/ ज्युस जसे मिळेल तसे घेत रहातो.
मन चिंती ते वैरी न चिंती... अपघाताबद्दल भिती मनातून काढायची. ज्या गोष्टी आपल्या हातात नाही त्याचा फारसा विचार करण्यात अर्थ नाही. अपघात घरातून बाहेर पडल्यावर, रस्त्याच्या बाजूने सावध पणे पायी चालतांना (तुमची काहीच चूक नसतांना) पण होण्याची शक्यता असते.
MH370 हे न उलगडलेले कोडे आहे.
धन्यवाद सगळ्यांना!
धन्यवाद सगळ्यांना!
झंपी, काळजीयुक्त परिस्थिती नाही.
आणि काही बातम्या वाचून झालेले नाही हे. का झाले ते पण मला कळले नाही!
मला काही वर्षांपूर्वी अचानक
मला काही वर्षांपूर्वी अचानक एक दोन वेळा लँडिंगच्या वेळी कपाळ/ कान /नाकाचा शेंडा अशा स्प्रेड भागात काही तरी भयंकर कळ यायची. भिती बसेल की काय वाटत होतं पण मग तसं नाही झालं आणि मग डोक्यातुन गेलं. आत्ता या धाग्याच्या निमित्ताने आठवलं.
हल्लीची विमाने पूर्वीच्या
हल्लीची विमाने पूर्वीच्या विमानांपेक्षा अधिक आवाज करतात का?
आपल्या विमानात चालक धरून आणखी चार जण रोजच आठ दहा तास नोकरी म्हणून प्रवास करतात हा विचार मनात ठेवायचा.
मलाही इंडिया ट्रिपचा भयंकर
मलाही इंडिया ट्रिपचा भयंकर स्ट्रेस येतो. नुसता प्रवास नाही तर महिनाभर आधी तयारी बॅगा, सिक्युरिटी, चेक इन, टॅक्सी सगळं करून परत येईपर्यंत दुखणं आल्यासारखं होतं. विमान प्रवासात 'दो द्वार आगे-दो द्वार पिछे' वगैरे सूचना बघायचा प्रयत्न असतो, पण कोसळलं तर ह्याचा काय उपयोग वाटतं. समुद्रात/नदीत पडलं तर सली सिनेमा किंवा बद्रिनाथ की दुल्हनियाँ मधलं आलियाचं ट्रेनिंग, हायजॅक झाले तर 9-11, गायब झालं तर मॅनिफेस्ट असं सगळं आठवतं. Wild imagination keeps me occupied.
यावेळी 9-11 museum बघितलं नेमकं, अजिबात बघू नका फार दुःखद , अभद्र आणि ग्राफिक आहे. परत येताना ते आठवत होतं म्हणून थोडा सायलेन्स ऑफ द लॅम्ब्स व थोडा ब्लॅक ॲडम बघितला. छोट्या फ्लाईट्सवर प्रचंड टर्ब्यूलन्स असतो आजकाल. जेएफके वर अतिशय गर्दी व गेट दूर होते. मळमळायला लागले. गम, हेडफोन्स, पुस्तके, आयबुप्रोफेन, बडिशेप जवळ ठेवते, चित्त विचलित करायला. तुमचा त्रास व्हॅलिड आहे, समजू शकते. उतरल्यावर काय काय करायचे याची दिवास्वप्नं बघितली की भीती तात्पुरती कमी होते.
विमानं म्हणजे टमटम झाली आहेत, एअररूट बसपेक्षाही जास्त रूळलेला असतो म्हणे. यावेळी पाणी भरायचे विसरून गेले होते म्हणून पुन्हा थांबले होते. मग निघाले. एकदा कुणीतरी आईस्क्रीम सांडले मग साफसफाईत वेळ गेला. एकदा पार्क करायला जागा नव्हती तर हवेतच काही वेळ ठेवले, एकदा टर्मिनल नव्हतं तर एअरपोर्टवर गोलगोल फिरवत बसले. होमलेस सारखं शाली पांघरूण कोपरं धरुन बसायचं मग कुणीतरी प्रेट्झल किंवा शेंगदाण्याचे पाकीट रात्री बेरात्री अंगावर फेकते ते खायचे. पोट भरलेले कळत नाही, भूक लागलेली कळत नाही.
क्लास वगैरे काही राहिला नाही.
“ क्लास वगैरे काही राहिला
“ क्लास वगैरे काही राहिला नाही.” - विमानप्रवासाचं ग्लॅमर आपल्या आधीच्या पिढीनं पाहिलं असं मला नेहमी वाटतं. आताचा विमानप्रवास तुम्ही म्हणता तसा टमटमचा किंवा एस.टी. चा झालाय. विमानकंपनीच्या लोकांना विमानातून इकडून तिकडे जायला मिळावं म्हणून विमानात प्रवासी भरतात.
<< पोट भरलेले कळत नाही, भूक
<< पोट भरलेले कळत नाही, भूक लागलेली कळत नाही. Lol क्लास वगैरे काही राहिला नाही. >>
------ विमान आकाशांत ३०००० फुट वर असतांना आपले taste buds, नाकाची sensitivity यांची कार्यक्षमता कमी होते म्हणून चवदार खाण्याच्या पदार्थात ३० % कमी चव लागते
.
https://www.bbc.com/future/article/20150112-why-in-flight-food-tastes-we...
होय उदय, म्हणून जेवण अधिक
होय उदय, म्हणून जेवण अधिक मसालेदार करतात हे कुठेतरी वाचलं होतं.
पण डेस्टिनेशनच्या वेळा पाळतात त्यामुळे नकोसे होते. तुमची लिंक वाचतेय, रोचक आहे.
फेफ , खरं आहे. जुन्या काळी सूट बूट घालून प्रवास करायचे हे सुद्धा ऐकलंय, सिनेमांत बघितलंय.
सेंसेटिव्हिटी कमी झाली तर कमी
सेंसेटिव्हिटी कमी झाली तर कमी मसालेदार केलं पाहिजे ना? नेहेमीचंच १३०% हायटन लागणारे. आणखी मसालेदार केलं तर मग बघायलाच नको.

मला वाटतं म्हणून कमी मसालेदार करत असणार. आणि माझ्या टेस्ट बड्सवर बिलो अॅवरेज परिणाम होत असणार आणि म्हणून ते जेवण घशाखाली उतरत नसणार! बिंगो!
Airlines are in the business
Airlines are in the business of transportation, they are not in the business of providing food. So their priority is on-time departure/landing and safety, not providing tasty food or great entertainment options.
“ जुन्या काळी सूट बूट घालून
“ जुन्या काळी सूट बूट घालून प्रवास करायचे हे सुद्धा ऐकलंय” - पूर्ण करियर भारताबाहेर घालवून मग रिटायरमेंटनंतर भारतात स्थायिक झालेल्या एका ज्ये.नांना एकदा अमेरिकेतल्या विमानतळावर रिसीव्ह करायला शॉर्ट्स-टी शर्ट मध्ये पोहोचलो होतो आणि ते चक्क सूटात अवतरले होते. त्यांनी हेच सांगितलं होतं कि त्यांच्या नोकरीच्या काळात विमानप्रवासात सूट घालणं हा नॉर्म होता.
उत्तर मिळाले का तुमच्या
उत्तर मिळाले का तुमच्या समस्या चे.
उत्तर मिळाले का तुमच्या
उत्तर मिळाले का तुमच्या समस्या चे.
मला पण भयंकर भिती वाटते
मला पण भयंकर भिती वाटते विमानप्रवासाची. आणि हे अचानक सुरु झालंय.
पूर्वी कधी वाटली नव्हती भिती. पण आता अचानक मिडीया मधे विमान अपघात किंवा बिघाडाच्या सतत येणार्या बातम्या वाचुन आता जास्तच वाटते.
नेपाळ मधला लँडींगच्या वेळी झालेला अपघात( त्याचा एक व्हिडिओ पण व्हायरल झाला होता), MH370, आणि विमान अपघातावर बहुतेक मिपा वर एक लेखनमालिका वाचली होती. तेव्हापासुन तर फारच भिती वाढली आहे.
विमानात बसताना पुर्णवेळ रामरक्षा म्हणत बसते मी. विमानात काहीही खायची ईच्छाच होत नाही. जमिनीवर उतरलं की जीव भांड्यात पडलेला स्पष्ट जाणवतो.
मागे एकदा दिल्लीवरुन येताना भयंकर टर्ब्युलन्स लागला होता तेव्हा वाईट झालेली अवस्था. आणि अशावेळी विमानात लहान पोरं असतील तर ती जत्रेतल्या हालत्या पाळण्यात बसल्यावर कसं आरडाओरडा करतात तसं ओरडायला लागतात. असला राग येतो अशावेळी. पण काय करणार.असो.
कोणाकडे काही उपाय्/इलाज असेल तर मी पण करेन म्हणतेहा:-)
मी सांगते तो उपाय नक्की नाही.
मी सांगते तो उपाय नक्की नाही. जराशी गंमत म्हणून घ्या. फारच अस्थानी वाटलं तर नंतर उडवेन.
आम्ही परदेशात असताना आई-बाबा आले होते. त्यांचा आयुष्यातला पहिलाच विमान प्रवास. त्यामुळे आईला जरा धास्ती वाटत होती. बाबा तिला म्हणाले, 'आपली मुलं इतकी नशीबवान नाहीयेत,की आई-वडील जाताना भरपूर पैसा देऊन जातील. त्यामुळे काळजी करू नको. आपण सुखरूप पोचणार.'
तसंच झालं.
बोटीने कसा अनुभव असतो?
बोटीने कसा अनुभव असतो?
मला टॅबलेटस गिळताना गॅग
मला टॅबलेटस गिळताना गॅग रिफ्लेक्स येतो व याईक्स होउन जाते. या वेळेस मला एक युक्ती सापडली. गोळी घेताना मनात काहीतरी डिस्ट्रॅक्ट्फुल म्हणायचे - उदा - अरे फ्रीजमधुन अंडी जरा बाहेर काढुन ठेव मी ऑमलेट करणारे आज.
हे मनामध्ये बोलताना खरच गॅग रिफ्लेक्स होत नाही.
तुम्ही आयुष्यातील महत्वाची काळजी आठवा , त्यावर मात कशी करायची, प्लॅन बी वगैरे. आपोआप मन त्यात रमेल व इकडचं लक्ष तिकडे डायव्हर्ट होइल.
धन्यवाद सगळ्यांना.
धन्यवाद सगळ्यांना.
अस्मिता, इंडिया ट्रिप चा स्ट्रेस खरंच येतो. कोणत्याही ट्रिपचा येतो मला वाटतं. आधी आणि नंतरच्या कामाचा. आणि असं वय पण नाही राहिलं की वाटलं तेव्हा बॅकपॅक घ्या आणि निघा.
हेमंत, उत्तर अजून मिळाले नाही. निर्णय मलाच घ्यायचा आहे.
स्मिता, तुम्हालाही काही सापडले तर मला सांगा!
Srd, बोटीने एकदाच केला आहे प्रवास पण तो आवडला होता.
सामो,प्रयत्न करून बघायला पाहिजे.
क्लास वगैरे काही राहिला नाही.
क्लास वगैरे काही राहिला नाही. >>
हे मात्र खरे आहे.
बातम्या असतात विमानात काय घडते त्या विषयी.
एसटी मध्ये घडतं नाही असे प्रसंग विमानात घडतात.
1), एक मेकावर मुतात काय.
२), gf, नातेवाईक मंडळी ना चालकाच्या केबिन मध्ये काय प्रवेश देतात.
नशीब gf ल विमान चालवायला देत नाहीत अजून .
३) हाणामारी काय करतात विमानात
,,४), बायकांना ची छेड काढतात.
लई च क्लास घसरला आहे..
अर्धे प्रवासी तर दारू पिवून च असावेत अशी शंका आहे
विमानं म्हणजे टमटम झाली आहेत
विमानं म्हणजे टमटम झाली आहेत >>>
हा सगळा पॅरा भारी आहे.
विमानप्रवासाचं ग्लॅमर आपल्या आधीच्या पिढीनं पाहिलं असं मला नेहमी वाटतं >>> फेफ +१ अमेरिकेत निदान सप्टें २००१ पर्यंत जरा बरे होते. नंतर एकेक टाइट होत गेले. सिक्युरिटी चेक्स मधले बदल, नंतर गॅस प्राइस वाढल्याने किमतीत वाढ व चेक-इन बॅगांवर चार्ज लावणे - त्याचा साइड इफेक्ट म्हणून पब्लिकने जमेल तितके सामान कॅरी ऑन म्हणून आणणे. मग एक बॅग वरती, एक पायात असले प्रकार. त्याच सुमारास झालेले एअरलाइन मर्जर्स व त्यामुळे पर्याय कमी होणे व कोणत्याही रूट वर जवळजवळ सर्व फ्लाइट्स फुल असणे.
त्यामानाने भारतात मागच्या दशकात विमानात सोयी बर्यापैकी असत. निदान किंगफिशर मधे तरी चांगला प्रवास झाल्याचे आठवते. पण एअरपोर्ट वर एस्टी स्टॅण्डसारखे असे. आता पब्लिकही रूळल्याने एअरपोर्ट वर जरा बरे असते. लोक लाइन वगैरे लावतात. इण्डिगोला ग्रूप वाइज बोर्डिंग वगैरे "ऑल्मोस्ट" अमेरिकेतल्यासारखे होऊ लागले आहे.
त्यामानाने आंतरराष्ट्रीय प्रवासात निदान अजून तरी ऑफ सीझनला गेलो तर बाजूची सीट मोकळीबिकळी सापडते.
आणि थोडं फार उलट पण.
आणि थोडं फार उलट पण.
की २००१ च्या आधी गेट पर्यंत कोणीही जाऊ शकायचे (अर्थात ऐकीव माहिती.. त्यामुळे अपूर्वाई सारखं 'पाऊंड ना! ... कितीही दाबून न्या!... ते १५ पाऊंडापेक्षा एक नवा पैसा नेऊ देत नाहीत... या लंबकाच्या मधलं ही विधान असेल ते) मग हे सिक्युरिटी चेक जास्त सिरिअसली आले अमेरिकेत.
मी पहिल्यांदा अमेरिकेला आलेलो तेव्हा सॅन डिएओला कॉन्फरंसला गेलेलो २००६-७ ची गोष्ट असेल. तेव्हा सॅन होजे - सॅन डिएगो दोन्ही विमानतळ रिनोव्हेशन झालेले न्हवते आणि लोक गेट जवळ जमिनीवर बसलेले आणि ग्रूप अनाऊंस झाला की फार हौशीने पुढे पुढे जात होते. तेव्हा सीट नंबरही देत नसे (मला वाटत साउथ वेस्ट असावी) त्यामुळे विंडो सीट साठी चाललेली धावपळ बघुन या पेक्षा आमच्या लाल डब्यात खिडकीतून रुमाल टाकून सीट अडवणे टेक्नॉलॉजी एकदम स्टेट ऑफ द आर्ट आहे ... असे जोक मारलेले आठवतात.
अर्थात ऐकीव माहिती >>> हो
अर्थात ऐकीव माहिती >>> हो तसेच होते. मी इथे आल्यावर पहिल्यांदा सॅन होजेवरून शिकागोला गेलो होतो तेव्हा मला सोडायला ३-४ मित्र आले होते थेट गेटपर्यंत
स्नेहा, तुमचा किंवा इतरानी लिहीलेला जेन्युइन अनुभव ट्रिवियलाइज करत नाही. पण फक्त गंमत म्हणून ही एक फेमस क्लिप. या पिक्चर मधे असे भाषिक विनोद खूप आहेत.
https://www.youtube.com/watch?v=QM0ILL7wuxA
मी बघते फारएण्ड. थोडे रिलॅक्स
मी बघते फारएण्ड. थोडे रिलॅक्स वाटेल त्याने.
"२००१ च्या आधी गेट पर्यंत
"२००१ च्या आधी गेट पर्यंत कोणीही जाऊ शकायचे (अर्थात ऐकीव माहिती." - बर्यापैकी रिलॅक्स्ड होतं ९/११ च्या आधी. ९/११ नंतर पहिल्यांदा प्रवास करताना कॅबिन बॅगेतला डिओ स्प्रे काढला होता तेव्हा फारच आश्चर्य वाटलं होतं. तेव्हाच पहिल्यांदा सिक्युरिटी चेक (इतकं कडक) वगैरे पाहिलं होतं.
आपल्याकडे काठमांडू फ्लाईट
आपल्याकडे काठमांडू फ्लाईट हायजॅक पर्यंत मजा असायची.
मी केबिन बॅग्ज मध्ये केबल कापण्याच्या चाकू आणि इतर काही अवजड टूल्स सुद्धा घेऊन गेलो आहे त्या आधी.
त्यानंतर मग नेल कटरला सुद्धा परवानगी नसे (हे ठीकच केले) आणि चेक्ड इन बॅगेज मध्ये टूल्स असतील, ती x-ray मध्ये सगळी नीट दिसतही असतील- screw drivers, spanners, Allen key, knife अगदी स्पष्ट दिसायचे- तरी मग आधी तिकीट मागून रजिस्टर मध्ये नोंद करून आणि मग बॅग उघडून बघायचे आणि वर काहीही irrelevant प्रश्न विचारायचे.
कंसात मनातले उत्तर आणि पुढे खरे दिलेले उत्तर:
१. कुठली फ्लाईट घेताय? (तिकिटात लिहिली आहे तीच घेणार आहे. याच तिकिटावर दुसरी फ्लाईट घेणे शक्य आहे याची नोंद करून ठेवतोय, पुढे कधी उपयोग होऊ शकेल या माहितीचा.) त्रिवेंद्रम.
२. तुम्ही सर्व्हिस इंजिनिअर आहात का? ( नाही, प्लंबर आहे { डोळ्यातुन वाहणारे पाणी थांबवू शकत नाही,पण मनातले विचार बोलुन दाखवले तर कदाचित डोळ्यातुन पाणी काढू शकतो} या विमानात नळाला पाणी येत नाहीये म्हणे ते ठीक करायला आलोय). बरेचदा "हो" आणि काही वेळा "नाही" असे उत्तर दिले आहे, त्याने काहीही फरक पडला नाही.
३. हे टूल्स कशासाठी घेऊन जात आहात? (त्रिवेंद्रमला जाऊन विकणार आहे तिकडे चांगला भाव मिळतो. तुम्हाला हवीत का? असल्यास तुम्हालाच विकतो, उगाच त्रिवेंद्रमची चक्कर वाचेल माझी.) सर्व्हिसींग साठी.
मग त्या रजिस्टरमध्ये आपण सही करायची.
मला वाटायचे आपले विमान हायजॅक झाले किंवा कोसळले तर टीव्ही वर माझे नाव झळकेल - हा माणुस टूल्स घेऊन गेला आहे या विमानात- यानेच घातपात केला असेल.
मी या अशा विनाकारण चौकशी बाबत काही वेळा नाराजी व्यक्त केली आणि IA आणि Jet airways ला इमेल्स सुद्धा पाठवली. आधी "हे तुमच्याच सुरक्षेसाठी आहे" असे गुळगुळीत उत्तर यायचे. मग त्यातील फोलपणा दाखवून दिल्यावर "we will look in to it" असे उत्तर आले.
मग काही वर्षांनी चार महा मेट्रो तसेच बंगलोर, हैद्राबाद विमानतळावर x-ray मध्ये काही न कळण्या सारखे किंवा बॅटरी असेल असे वाटले तरच टोकायचे, इतर विमानतळांवर मात्र आधी सारखीच परेड.
मग सगळ्या विनातळांचे आधुनिकीकरण झाले मध्यवर्ती स्क्रिनिंग सुरू झाले तेव्हापासून हा प्रकार थांबला. त्यात सुरवातीला डेमो इक्विपमेंट वगैरे असताना बॅग वेगळी जाऊन बोलावणे आले कधी तरी. पुढे त्यांनी त्याचे इमेजेस सिस्टीम मध्ये सेव्ह केली असावीत. कारण नंतर सगळे स्मूथ झाले.
स्नेहा, तुम्हाला शुभेच्छा.
स्नेहा, तुम्हाला शुभेच्छा.
)
फारएण्डच्या प्रतिसादातल्या किंगफिशर एअरलाईनच्या उल्लेखामुळे किंगफिशरमधून केलेल्या सुरुवातीच्या रम्य विमानप्रवासांच्या आठवणी ताज्या झाल्या
तिकीट इतर एअरलाईन्सपेक्षा थोडं जास्त असायचं, पण त्यात खाणं अंतर्भूत असायचं. चांगलं असायचं फूड. अगदी सिरॅमिकच्या प्लेट्समधून नीट द्यायचे. (एकदा माझ्या सासूबाईंनी त्यांना ते स्नॅक्स तिथे खायचे नव्हते म्हणून पर्समध्ये ठेवले. त्याबरोबर चुकून ती प्लेटही घरी आली!
प्रत्येक वेळी एकेक हेडफोन, पेन वगैरे प्रत्येकाला फ्री मिळायचे. या सगळ्यावर किंगफिशरचा लोगो. समोर स्क्रीन असायचा. त्यावर विमानाच्या खालचं दृश्य मस्त दिसायचं, विशेषतः लँड व्हायच्या वेळी.
आम्ही नंतर विनोद करायचो की आमच्याकडची एक प्लेट परत घ्यायची राहिली या नुकसानामुळे ते बुडाले!
किंगफिशर आणि रम्य हे दोन शब्द
किंगफिशर आणि रम्य हे दोन शब्द एकत्र वाचून मला वाटलं कॅलेंडरबद्दल असेल.
पण मग ते त्यांचं खडखडाट करणारं विमान आठवलं.