विमानप्रवासाची भीती

अचानक वाटू लागलेली विमानप्रवासाची भीती

Submitted by sneha1 on 28 May, 2023 - 11:50

तसा विमानप्रवास मला फारसा आवडत नाही, कारण मला उलट्या होतात. पण त्याची भीती अशी कधी वाटली नाही. भारताबाहेर राहत असल्याने कधीच विमानप्रवास केला नाही असे पण नाही. पण तीन वर्षांपूर्वी बीचला जायचे म्हणून विमानाने गेलो, आणि दोन तासाच्या प्रवासामधे कोण जाणे खूप भीती वाटली. नंतर कोव्हीड मुळे कुठे जाणे झालेच नाही विमानाने. आणि आता विमानाने पुन्हा जाण्याची खूप भीती वाटते आहे, मी टाळायलाच बघते आहे. डॉक्टरांना विचारल्यावर त्यांनी सांगितले की असे होते कधी कधी, आणि anxiety ची गोळी तेव्हा घ्यायला सांगितली.

Subscribe to RSS - विमानप्रवासाची भीती