मुलं जास्त स्वच्छ असतात कि मुली हा संशोधनाचा विषय आहे.
शाळेत असताना एक मुलगी आम्हाला म्हणाली होती " बॉईज आर डर्टी" . मुलांचे मैदानी खेळ मातीत असतात. आत्ताच्या शाळात सिमेंट असेल असले तर. पण आम्ही तर मातीतच खेळायचो. त्यात युनिफॉर्म पांढरा स्वच्छ शर्ट आणि करडा टाय होता. करड्या निळ्या रंगाची हाफ / फुल पँट असायची. मातीने कपडे भरून जायचे. मुलींचा युनिफॉर्म काळपट निळा होता. त्याच्यावर धूळ समजून यायची नाही. हे कारण असेल.
पण नंतर पण मुलींचं हे मत नेहमी ऐकू यायचं. मी तर रोज स्नान करायचो. अजून करतो. रोज केस पण धुतो.
उलट मुली आठवड्यातून एकदाच केस धुतात.
पण काही काही मुलं अशी पाहिलीत कि ते म्हणतात शेर कभी मुंह नही धोता, शेर कभी दांत नही मांझता . शेर कभी नहाता नही. शेर कभी शेव नही करता. अशा मुलांमुळे मुलींना मुलांना बदनाम करायची संधी मिळते.
पण त्यांचंही खरं आहे कि मुलांनी अंगघोळ नाही केली, दाढी नाही केली , तोंड नाही धुतले तरी ते बाहेर पडू शकतात. त्यांना मेक अप सारख्या कृत्रिम गोष्टींची गरज पडत नाही. ते कसेही बाहेर पडले तरी गोंडसच दिसतात. याउलट मुली शांपू, पावडर, स्नो, मेक अप च्या १७६० क्रीम फसाफसा फासल्याशिवाय बाहेर पडू शकत नाहीत. याचाच अर्थ त्यांना लपवाछपवी करावी लागते. जर त्या स्वच्छ राहत असत्या तर ही वेळ का आली असती ?
याउलट एक मैत्रीण म्हणाली कि मुलांना बॉडी स्प्रे मारून बाहेर पडायचा साधा सेन्स सुद्धा नसतो.
हे सगळं उलटसुलट ऐकल्यावर गोंधळ उडतो. तुम्हाला काय वाटतं ?
अय्यो, हे आधी असेल.आता मुलं
अय्यो, हे आधी असेल.आता मुलं मुलींइतकिच स्वच्छता, त्वचेची, केसांची काळजी घेतात.हेअर कलर नंतर केस चांगले राहायला लावायचं वेगळं तेल असतं(शाम्पू माहीत होता मला वेगळा असतो तो) हे मला एका मुलाकडून कळलं.आणि अगदीच लहान होता, इंजिनिअरिंग होऊन 1 वर्षं झालेला.हेअर कलर 'नाईलाज' म्हणून नाही फॅशन म्हणून करत होता.
मुलं वेगळी हेअर सिरम, फेस क्रीम, दाढी वाढायला वेगळं तेल, वेगळा फेसवॉश असं सगळं व्यवस्थित वापरतात. फक्त घरी किंवा सलून ला.ऑफिसात बायकांसारखी पर्स मध्ये जबाबदारी बाळगत नाहीत.
कोणत्याही होस्टेलला जा.
कोणत्याही होस्टेलला जा.
मुलांच्या रूम्स व मुलींच्या रूम्स पहा.
फरक आपोआप दिसतो.
उकिरड्यात रहाण्याची उदाहरणे दोन्हीकडे असतात, पण टक्केवारीत मुलांच्या रूम्स जास्त घाणेरड्या असतात.
लहानपणापासून घराची स्वच्छता, केरवारे, कपडे धुणे, स्वयंपाक इ. गोष्टी 'बायकी' कामे आहेत अशी समजूत आपल्या पोरांच्या डोक्यात भरवणार्या आया यासाठी जबाबदार आहेत असे माझे मत आहे.
माझ्या घरात धाकटी मुलगी जास्त
माझ्या घरात धाकटी मुलगी जास्त स्वच्छ आणि टापटीप राहते मुलापेक्षा..
मुलांना बॉडी स्प्रे मारून
मुलांना बॉडी स्प्रे मारून बाहेर पडायचा साधा सेन्स सुद्धा नसतो.>>> जिथे आधीच सुगंध येत असेल तिथे बॉडी स्प्रे कशाला?
हायजिन आणि मेकअप यात आपण
हायजिन आणि मेकअप यात आपण गल्लत करतोय का?
पर्सनल हायजिनच्या बाबतीत मुली अधिक जागरूक असतात. मुली दुर्गंधीचा बाबतीत जास्त सेन्सिटिव्ह असतात. त्यामुळे घामट कपडे, भांडी खरकटी वगैरे ठेवणे टाळतात.
मोठे केस वगैरे असले की ते मेंटेन करावेच लागतात. त्यात फारसा चॉईस नसतो.
सोशल कंडिशनिंग व प्रेशरही असते मुलींवर नीट राहण्याचे.
बाकी बाहेर टिपटॉप वावरणाऱ्यांची घरे/हॉस्टेल रूम्स गचाळ, अस्वच्छ असू शकतात. आणि यात मुले मुली दोघेही असतात.
लहानपणापासून घराची स्वच्छता, केरवारे, कपडे धुणे, स्वयंपाक इ. गोष्टी 'बायकी' कामे आहेत अशी समजूत आपल्या पोरांच्या डोक्यात भरवणार्या आया यासाठी जबाबदार आहेत असे माझे मत आहे.
>>> सहमत. ज्या घरात सर्वांना व्यवस्थित राहायची सवय असते तिथली मुलेही रिगार्डलेस जेंडर बाहेर व्यवस्थित राहतात.
इथे मुला-मुलींच्या
इथे मुला-मुलींच्या स्वच्छतेच्या सवयींबाबत चर्चा सुरूच आहे तर...
एखाद्या मुलाच्या कारमधील स्वच्छता आणि एखाद्या मुलीच्या कारमधील स्वच्छता यांवर वाचायलाही आवडेल!!!
दररोज आंघोळ करणे किंवा जास्त
दररोज आंघोळ करणे किंवा जास्त वेळ आंघोळ करणे ( विशेषत: गरम पाण्याने ) अपायकारक आहे. शरिरावर अनेक उपयोगी सुक्ष्मजीव / जिवाणू वास्तव करुन असतात आणि जोडीला नैसर्गिक तेलाचा (sebaceous / oil gland चे कार्य ) थर असतो - त्याला आपण काढून टाकतो.
<< लहानपणापासून घराची स्वच्छता, केरवारे, कपडे धुणे, स्वयंपाक इ. गोष्टी 'बायकी' कामे आहेत अशी समजूत आपल्या पोरांच्या डोक्यात भरवणार्या आया यासाठी जबाबदार आहेत असे माझे मत आहे. >>
-------- सहमत. अशी कामांची वाटणी पुढे त्रासदायक ठरु शकते. दोघांनाही सर्व प्रकारच्या कामांची सवय असायला हवी.
दररोज साबण वापरू नये अंघोळीला
दररोज साबण वापरू नये अंघोळीला.
Drawer, कपाटे मुलांची
Drawer, कपाटे मुलांची अस्ताव्यस्त असतात.
फॅशन sens पण मुलांमध्ये खूप कमी असतो.
कशावर काय घालावे हे पण त्यांना समजत नाही.
ज्यांचे लग्न झाले आहे त्यांना हे माहीत आहे.
बायको च कपडे खरेदी करणे,आणि कोणते कपडे घालणं ह्याचे मार्गदर्शन नवऱ्यानं करत असते.
आमच्याकडे नवरोबा एकदम कडक
आमच्याकडे नवरोबा एकदम कडक इस्त्री केलेलेच कपडे घालून बाहेर पडतो. फक्त ऑफिसला नाही तर इतर वेळीही.
हनिमूनला सुद्धा कडक इस्त्रीचे कपडे घेऊन गेला होता. ते ही फॉर्मल. मी जीन्स आणि टी शर्ट घालून फिरत होते.
मला कपाटातून एक ड्रेस काढून अडकवून पटकन निघालं तरी चालतं. आता मुलीला तयार करेपर्यंत इस्त्री तशीही चुरगाळतेच.
जसा नवरा तसेच माझे बाबा. डिट्टो.
हेअर कलर नंतर केस चांगले
हेअर कलर नंतर केस चांगले राहायला लावायचं वेगळं तेल असतं(शाम्पू माहीत होता मला वेगळा असतो तो)
>>>> कुठली ते सांगता का, आमच्याही माहितीत भर
गांभीर्याने प्रतिसाद
गांभीर्याने प्रतिसाद दिलेल्यांचे कौतुक!
बोकलताचार्यांच्या प्रतिक्षेत.
नाही निर्मळ मन, काय करील साबण
नाही निर्मळ मन, काय करील साबण?
मनाची स्वच्छता हीच खरी स्वच्छता!
गांभीर्याने प्रतिसाद
गांभीर्याने प्रतिसाद दिलेल्यांचे कौतुक!
बोकलताचार्यांच्या प्रतिक्षेत. >> आणि सर क्र. २ यांना विसरलात का तुम्ही?
हडळ विहीरीत राहते. मुंज्या
हडळ विहीरीत राहते. मुंज्या पिंपळावर आणि खवीस वडाच्या जुन्या झाडावर.
यातले फिमेल भूत पाण्यात राहते तर दोन्ही मेल भूतं पाण्यापासून लांब राहतात. यावरून निष्कर्ष काढण्यासाठी बोकलताचार्यांची आठवण झाली.
हनिमूनला सुद्धा कडक इस्त्रीचे
हनिमूनला सुद्धा कडक इस्त्रीचे कपडे घेऊन गेला होता. <<

पुरातन कथा ह्याच पटण्यासारखा
अपवाद समजा .
पण पुरुष असे नसतात
केसांवर दिवसभर कंगवा पण फिरवत नाहीत.
कपडे ह्या विषयी काही चॉईस नसतो.
सौंदर्य प्रसाधन ना गंभीर पने घेत नाहीत
म्हणूनच शाहरूख खान स्वतःच्या
जातीच्या स्वच्छ्याला कंगवा काय, सौंदर्य प्रसाधने काय?
मुली मुलांपेक्षा जास्त सुंदर
मुली मुलांपेक्षा जास्त सुंदर आणि स्वच्छ असतात ही काळया दगडावरची रेघ आहे. कश्याला उगाच पुसायच्या भानगडीत पडत आहात.
केस धुवायचे म्हणाल तर माझे केस जेव्हा लांब वाढवलेले तेव्हा मी सुद्धा आठवड्यातून एकदाच धुवायचो.
आंघोळ मात्र आठवड्यातून तीनदा करायचो
उन्हाळ्यात घाम जास्त येत असल्याने त्याबाबत आळस करायचो नाही.
माझ्या पलिकडेही जग आहे. ते
माझ्या पलिकडेही जग आहे. ते पहायला शिका. त्याचा आनंद घ्या आणि इतरांनाही आनंदी राहू द्या.
सकाळचे सात वाजलेत.
सकाळचे सात वाजलेत.
मुले समोर मैदानात चिखलात फुटबॉल खेळत आहेत.
मुली छान ब्युटी स्लीप घेत असतील.
स्वच्छ का टापटीप?
स्वच्छ का टापटीप?
दररोज आंघोळ करणे किंवा जास्त
दररोज आंघोळ करणे किंवा जास्त वेळ आंघोळ करणे ( विशेषत: गरम पाण्याने ) अपायकारक आहे. शरिरावर अनेक उपयोगी सुक्ष्मजीव / जिवाणू वास्तव करुन असतात आणि जोडीला नैसर्गिक तेलाचा (sebaceous / oil gland चे कार्य ) थर असतो - त्याला आपण काढून टाकतो.
<<
भारतीय हवामान, जिथे खूप घाम येतो, पावसाळ्यात दमट व गरम हवा असते, तिथे हे बरोबर नाही.
रोजची आंघोळ नसेल तर त्वचेचे बुरशीचे आजार वाढतात.
मला टापटीप, स्वच्छतेची व
मला टापटीप, स्वच्छतेची व नीटनेटकेपणाची खूप आवड आहे. माझ्या नागपूरच्या घरातील माझ्या खोलीत (किंबहुना संपूर्ण घरातच) आणि शिक्षण व नोकरीनिमित्ताने जिथे जिथे राहणे होत आहे, त्या त्या घरीही माझ्या सगळ्या वस्तू स्वच्छ व नीट आणि ठरलेल्या जागेवरच असतात. माझ्या कित्येक मैत्रिणी, "तू मुलगा असून इतका नीटनेटका राहतोस की तुझी खोली (घर) बघून आम्हाला कॉम्प्लेक्स येतो" असे म्हणतात. कदाचित हे बाळकडू मला माझ्या आईकडून आलेले आहे. तिच्या स्वच्छते व नीटनेटकेपणाबद्दल साऱ्या नातेवाईकांत व स्नेहींमध्ये प्रसिद्ध आहे.
सकाळी उठल्यावर प्रातःर्विधी आटोपून मला लगेच आंघोळ करून दिवसाची सुरुवात करायची सवय आहे, मला सकाळी ११-१२ वाजता पर्यंत पारोसा रहायला अजिबात आवडत नाही. BAMS ला ऍडमिशन घेतल्यापासून दररोज संध्याकाळीही आंघोळ करायची जी सवय लागली ती आयतागाजत आहे (कारण पेशंट्सशी संपर्क येत असे). तसेच मी दर चार दिवसांनी क्लीन शेविंग व प्रत्येक महिन्यात कटींग करतो. तथापि मी क्वचितच शॅम्पू, पावडर, फेसवॉश, परफ्यूम (डियो) किंवा अन्य कॉस्मेटिकस वापरली आहेत, म्हणजे मी ह्यापैकी कधीही स्वतः विकत घेतले नाही. कुणी मित्र/मैत्रीण वा नातेवाईकांनी जबरदस्तीने परफ्यूम (डियो) वैगेरे माझ्यावर मारला असेल.
ह्याशिवाय मला मॅचिंग कपडे घालायला आवडत, ज्या रंगाचा शर्ट असेल त्याच्याशी मॅच होणाराच पॅन्ट हवा असतो आणि टीशर्ट व जीन्सचेही असेच आहे. जेव्हा मास्क घालणे बंधनकारक होते तेव्हा ज्या ज्या रंगाची शर्ट/टीशर्ट होती त्या त्या रंगाचे मी मास्क विकत घेतले होते. ह्यामुळे माझे अनेक विद्यार्थी, मित्र/मैत्रिणी व सहकारी, व सहयोगी एवढं सगळं जरुरी आहे का म्हणून विचारतात. पण मला आवड आहे, आणि मी करतो. शिवाय ह्यामुळे विशेषतः माझ्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक जगात आपल्या निटनिटकेपणा, क्लीन शेविंग व कपड्यांमुळे कशी छाप पडू शकते (आपण कसे ओळखल्या जाऊ शकतो) ह्याचे अप्रत्यक्षरीत्या धडे मिळतात. पण हं! मला स्वच्छतेचा वा निटनिटकेपणाचा OCD नाही.
अरे वा, छान राहुल.
अरे वा, छान राहुल.
तथापि मी क्वचितच शॅम्पू,
तथापि मी क्वचितच शॅम्पू, पावडर, फेसवॉश, परफ्यूम (डियो) किंवा अन्य कॉस्मेटिकस वापरली आहेत>>>
हे का वापरत नाही? हानीकारक असते का? तुम्ही डॉक्टर आहात म्हणून विचारतोय.
हे का वापरत नाही? हानीकारक
हे का वापरत नाही? हानीकारक असते का? तुम्ही डॉक्टर आहात म्हणून विचारतोय >>> हानिकारक म्हणून नव्हे, तर फारशी आवड नाही.
सगळ्यात स्वच्छ बीजेपी.
सगळ्यात स्वच्छ बीजेपी.
नेहमी वापरा. व्यक्तिमत्व धुण्यासाठी. उजळण्यासाठी.
ज्या रंगाचा शर्ट असेल
ज्या रंगाचा शर्ट असेल त्याच्याशी मॅच होणाराच पॅन्ट हवा असतो >>
रविवारी मुलुंड स्टेशनवर लाल शर्ट आणि त्याच्याशी मॅच होणारी पँट घातलेला मनुष्य पाहिला. By chance, आपण होतात का?
छ्या. मी पण एक बघितला. फक्त
छ्या. मी पण एक बघितला. फक्त मोजे घातलेला ... कही वो तो ...
Pages