मुलं जास्त स्वच्छ राहतात कि मुली ?

Submitted by ढंपस टंपू on 12 July, 2023 - 23:04

मुलं जास्त स्वच्छ असतात कि मुली हा संशोधनाचा विषय आहे.
शाळेत असताना एक मुलगी आम्हाला म्हणाली होती " बॉईज आर डर्टी" . मुलांचे मैदानी खेळ मातीत असतात. आत्ताच्या शाळात सिमेंट असेल असले तर. पण आम्ही तर मातीतच खेळायचो. त्यात युनिफॉर्म पांढरा स्वच्छ शर्ट आणि करडा टाय होता. करड्या निळ्या रंगाची हाफ / फुल पँट असायची. मातीने कपडे भरून जायचे. मुलींचा युनिफॉर्म काळपट निळा होता. त्याच्यावर धूळ समजून यायची नाही. हे कारण असेल.

पण नंतर पण मुलींचं हे मत नेहमी ऐकू यायचं. मी तर रोज स्नान करायचो. अजून करतो. रोज केस पण धुतो.
उलट मुली आठवड्यातून एकदाच केस धुतात.

पण काही काही मुलं अशी पाहिलीत कि ते म्हणतात शेर कभी मुंह नही धोता, शेर कभी दांत नही मांझता . शेर कभी नहाता नही. शेर कभी शेव नही करता. अशा मुलांमुळे मुलींना मुलांना बदनाम करायची संधी मिळते.

पण त्यांचंही खरं आहे कि मुलांनी अंगघोळ नाही केली, दाढी नाही केली , तोंड नाही धुतले तरी ते बाहेर पडू शकतात. त्यांना मेक अप सारख्या कृत्रिम गोष्टींची गरज पडत नाही. ते कसेही बाहेर पडले तरी गोंडसच दिसतात. याउलट मुली शांपू, पावडर, स्नो, मेक अप च्या १७६० क्रीम फसाफसा फासल्याशिवाय बाहेर पडू शकत नाहीत. याचाच अर्थ त्यांना लपवाछपवी करावी लागते. जर त्या स्वच्छ राहत असत्या तर ही वेळ का आली असती ?

याउलट एक मैत्रीण म्हणाली कि मुलांना बॉडी स्प्रे मारून बाहेर पडायचा साधा सेन्स सुद्धा नसतो.

हे सगळं उलटसुलट ऐकल्यावर गोंधळ उडतो. तुम्हाला काय वाटतं ?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या कडे हिरवी पॅंट आणि भगवा टी शर्ट आहे.
पिवळ्या पॅंटवर निळा शर्ट आहे.
पिवळे पितांबर आणि राघूकलर झब्बा असं म्हणायला पाहिजे होतं.
Screenshot_20230718_135348_Google.jpg

राहुल, तुम्ही ' तो ' पँट आणि ' ती ' शर्ट असा उल्लेख केला आहे.
मी म्हणते किंवा मी कायम ऐकलं त्याच्या exactly उलट आहे.

राहुल, तुम्ही ' तो ' पँट आणि ' ती ' शर्ट असा उल्लेख केला आहे >>> सही पकडे हो, मीरा! लिहिण्याच्या ओघात दुर्लक्ष झालं दिसतय.

गुड विषयांतर...
चहा पिली का पिला?
लाईट गेली का गेला?

चहा : प्याला/प्यालो/प्याले.

लाईट : गेले. (कारण वीज जाते तेव्हा त्या भागातले सगळेच लाईट जातात. एक बल्ब्/लाईट असेल तर मात्र गेला.)

<< दररोज आंघोळ करणे किंवा जास्त वेळ आंघोळ करणे ( विशेषत: गरम पाण्याने ) अपायकारक आहे. शरिरावर अनेक उपयोगी सुक्ष्मजीव / जिवाणू वास्तव करुन असतात आणि जोडीला नैसर्गिक तेलाचा (sebaceous / oil gland चे कार्य ) थर असतो - त्याला आपण काढून टाकतो.
<<
भारतीय हवामान, जिथे खूप घाम येतो, पावसाळ्यात दमट व गरम हवा असते, तिथे हे बरोबर नाही.
रोजची आंघोळ नसेल तर त्वचेचे बुरशीचे आजार वाढतात. >>

------ होय सहमत, जनरलायझेशन करायला नको होते.

राहुल तुमचा प्रतिसाद आवडला.

च्या मारी!

{इथे चहा सोबत मारी बिस्किटांचा फोटो}

लाईट गेली की पंखा सुद्धा का बंद पडतो या प्रश्नाने माझे अर्धे बालपण जाळून टाकले आहे.>>>
सर, आता तरी समजले आहे का?

नाही,
पण तारुण्य अश्या फालतू प्रश्नांची उत्तरे शोधण्यात जाळायचे नसते हे समजले आहे Happy

Pages