२०२२ च्या नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला स्वत:चे वजन केले आणि ते ६८ किलो भरले. माझ्या साडे पाच फूट उंचीसाठी योग्य BMI range १८.५ ते २४.९ अशी आहे. थोडक्यात म्हणजे, मी स्थूलपणाकडे वाटचाल करीत असल्याची ती पहिली चाहुल होती. पुढील वर्षाच्या (२०२३) फेब्रुवारीत होणार्या लांब पल्ल्याच्या शर्यतीत भाग घ्यायचा असल्याने मला वजन कमी करणे भागच होते. तेव्हा ६० किलो हे माझे ध्येय ठरवले आणि लवकरात लवकर ते कसे साध्य करता येईल याचा शोध घेण्यास प्रारंभ केला.
गेले काही महिने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या Chatbot या नव्या अवतारामुळे तंत्रजगतात धुमशान चालू आहे. एका संगणक उद्योगाने त्यांची संबंधित प्रणाली बाजारात आणली. त्यानंतर थोड्याच काळात अन्य बलाढ्य उद्योगाने पण या क्षेत्रात उडी घेतली आणि त्याच तोलामोलाचा किंबहुना अधिक सरस नवा अवतार आपण तयार करणार असल्याचे जाहीर केले. सध्या बऱ्याच जणांनी कुतूहलापोटी ही यंत्रणा वापरून पाहिली आहे. त्या अनुभवातून बऱ्याच जणांचे असे मत झाले आहे, की ही यंत्रणा सध्या बाल्यावस्थेत आहे. कालौघात जसा जसा अधिकाधिक अनुभवसंपन्न विदा या यंत्रणेमध्ये भरला जाईल त्यानुसार ती अधिक उपयुक्त आणि विश्वासार्ह ठरेल.
प्रजनन आरोग्य
प्रजनन व्यवस्थेशी किंवा प्रजननाशी निगडित शारीरिक , मानसिक आणि सामाजिक स्वास्थ्य म्हणजे चांगले प्रजनन आरोग्य . पण प्रत्यक्षात या क्षेत्रामध्ये अनेक गोष्टींचा समावेश होतो . उदा . , स्त्रीरोगशास्त्र , किशोरवयीन आरोग्य , माता आरोग्य , कौटुंबिक हिंसाचार आणि एच. आय. व्ही यातल्या प्रत्येक घटकाशी मानसिक आरोग्याचे महत्त्वपूर्ण प्रश्न निगडित आहेत .
त्यांच्या बद्दल आपण माहिती घेणार आहोत.
प्रजनन आरोग्यासाठी स्त्रीचे आरोग्य मग ते शारीरिक असो किंवा मानसिक ह्यावर लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे .
आत आपण स्त्री रोग आणि मानसिक आरोग्याबद्दल जाणून घेऊ :
मित्रांनो, Personality Development साठी खास लेख लिहीत आहे. जरूर वाचा. जर काही शंका असेल तर जरूर विचारा. कौतुक करण्यास अजिबात संकोच बाळगू नका. काही चुकभूल झाल्यास मात्र प्रेमाने कान पिळण्यासही विसरू नका.
आज वाड्यातल्या गप्पांमध्ये फिटनेस साठी किती पावलं कोण चालते ह्यावर चर्चा सुरु असताना सुचलेले.
दत्ता पाटील यांनी लिहलेल्या, मधुकर पाठक यांनी स्वरबद्ध केलेल्या आणि प्रल्हाद शिंदे यांनी गायलेल्या 'पाऊले चालती पंढरीची वाट' ह्या अजरामर गीताचा आधार घेऊन रचलेले विडंबन.
शब्द तितकेसे जमले नसतील पण लिहले. 
पाऊले चालती फिटनेसची वाट |
साखर झोपेची तोडूनिया गाठ ||
मधूमेहाच्या नियंत्रणासाठी एक अॅप वापरतो. स्वस्तात ग्लुकोमीटर मिळाला त्यांचं डिफॉल्ट अॅप आहे. या अॅपचा वापर घरी घेतलेले रेकॉर्ड डिजीटल स्वरूपात साठवायला आणि डॉक्टरला दाखवायला होऊ शकतो. आधीचे ग्लुकोमीटर वापरल्याने रीडिंग अचूक मिळतात पण हा फायदा मिळत नाही. आताच्या मीटर मधे आणि लॅब रिपोर्ट्स मधे थोडासा फरक असतो. म्हणजे १२० च्या जागी १२४ इतका.
खरं तर गेली वर्षभर, मी दुखण्यामुळे घरातच नैराश्याच्या गर्तेत अडकून पडले होते. ज्या डॉक्टरांनी (डॉ. विनायक देंडगे, पुणे) मला या सगळ्यातून बाहेर काढले, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच त्यांनी आणि डॉ. राजश्री लाड यांनी लिहिलेल्या अतिशय महत्त्वाच्या पुस्तकाची ओळख करून देण्यासाठी हा लेखनप्रपंच.
या धाग्याच्या सुरुवातीच्या अर्ध्या भागात मी माझा स्वानुभव आणि उरलेल्या अर्ध्या भागात पुस्तक परिचय मांडलेला आहे. कारण त्याशिवाय माझी हा धागा लिहिण्यामागे असलेली कळकळ तुम्हांपर्यंत पोचू शकणार नाही असे मला खात्रीने वाटते. असो.
नमस्कार !
2022 ची अखेर आता लवकरच होत आहे. या संपूर्ण वर्षात आधुनिक वैद्यकशास्त्रात झालेल्या विविध संशोधनांचा धावता आढावा या लेखात घेत आहे. गेली ३ वर्षे संपूर्ण मानवजातीला ग्रासलेल्या covid-19 या रोगासंबंधीचे संशोधन चालूच आहे. परंतु याची विस्तृत माहिती संबंधित धाग्यावर आतापर्यंत आलेली असल्याने या विवेचनातून या आजाराला पूर्णपणे वगळलेले आहे.
भाग ४ इथे : https://www.maayboli.com/node/82725
...........................................................................................................................................................................................................