Submitted by माबो वाचक on 8 February, 2025 - 11:32
भारतात घरगुती वापरासाठी ट्रेडमिल घ्यायची आहे. दोन व्यक्ती वापरणार आहेत. पुरुष व स्त्री. वजने साधारण ७५-५० kg च्या दरम्यान. फक्त चालण्यासाठी (शक्यतो पळण्यासाठी नाही) वापरायचा विचार आहे. Inclined हवी आहे. त्यात दोन प्रकार आहेत. मॅन्युअल आणि ऑटो. मॅन्युअल मध्ये तीन लेवल आहेत तर ऑटो मध्ये पंधरा. मी ऑटो च्या बाजूला झुकलेलो आहे. पण त्याने १० हजार वाढत आहेत.
तर ट्रेडमिल घेताना अजून काय पाहायचे? कोणती कंपनी चांगली? कोणते configuration निवडावे? अमेझॉन वर बरेच पर्याय दिसत आहेत, त्यामुळे गोंधळ झाला आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
घेऊ नये हे मा वै म हे वे सां
घेऊ नये हे मा वै म हे वे सां न ल
तिरकी होणारी घ्या म्हणजे
तिरकी होणारी घ्या म्हणजे चढावर, गुरुत्वाकर्षणाच्या विरोधात चालायचा फायदा होतो, जास्त कॅलरीज् जळतात.
बॅकपॅक मध्ये पाठीवर झेपेल तेव्हढे वजन घेतले तर आणखी वेगाने मेद ज्वलन होते.
त्यापेक्षा हे स्वस्तात पडेल.
त्यापेक्षा हे स्वस्तात पडेल.
https://www.amazon.in/Amazon-Brand-Premium-Support-Foldable/dp/B0CVQNS4S...
घ्यायची तर इंडस्ट्री कॅलिबरची
घ्यायची तर इंडस्ट्री कॅलिबरची घ्या. आयुष्यभर टिकेल. बाकींच्यात अजिबात दम नसतो. हां महाग असेल पण वर्थ इट.
घरात जागा असेल तर ठीक आहे.
घरात जागा असेल तर ठीक आहे. नाहीतर काही दिवसांनी अडचण व्हायला लागते. ट्रेडमिल जागा व्यापते. साफसफाई करताना अडथळा होतो.
सहजासहजी खोलून ठेवून बेडखाली किंवा फोल्ड करून ठेवता येण्यासारखी असेल तर बघा. नाहीतर जिममधे मिळत असेल तर चांगलं.
असून अडचण नसून खोळंबा असला प्रकार आहे.
सर्वांचे धन्यवाद. जिमला जाणे
सर्वांचे धन्यवाद. जिमला जाणे होत नाही, म्हणूनच ट्रेडमिल घेण्याचा घाट घातला आहे. Auto Inclined बद्दल अधिक माहिती हवी होती.