ट्रेडमिल कोणती घ्यावी?
भारतात घरगुती वापरासाठी ट्रेडमिल घ्यायची आहे. दोन व्यक्ती वापरणार आहेत. पुरुष व स्त्री. वजने साधारण ७५-५० kg च्या दरम्यान. फक्त चालण्यासाठी (शक्यतो पळण्यासाठी नाही) वापरायचा विचार आहे. Inclined हवी आहे. त्यात दोन प्रकार आहेत. मॅन्युअल आणि ऑटो. मॅन्युअल मध्ये तीन लेवल आहेत तर ऑटो मध्ये पंधरा. मी ऑटो च्या बाजूला झुकलेलो आहे. पण त्याने १० हजार वाढत आहेत.
तर ट्रेडमिल घेताना अजून काय पाहायचे? कोणती कंपनी चांगली? कोणते configuration निवडावे? अमेझॉन वर बरेच पर्याय दिसत आहेत, त्यामुळे गोंधळ झाला आहे.