सध्या वाढता स्क्रीन टाइम आणि सततचं scrolling ही समस्या सर्वांना जाणवते आहे.
विरंगुळा म्हणून आपल्यापैकी बरेच जण reels scrolling मध्ये वेळ व्यतित करतात.
तर तुमचा हा अनावश्यक (? )वेळ किती आहे?
आकडेवारी चिंताजनक असेल तर कमी कसा करायचा?
काही सोपे उपाय असतील तर त्याबद्दल बोलूया.
(ऑफिससाठी करावे लागणारे काम आणि त्याचा स्क्रीन टाइम ह्यात धरला नाही, तो कमी केला तर खाण्यापिण्याचे वांदे होतील. पण त्यातही डोळ्यांवर कमी ताण पडावा वगैरे साठी किंवा काही smart पद्धती असतील तर तेही बोलू शकतो इथे ).
.
एक सोपी गोष्ट सध्या करायला सुरुवात केली आहे दिवसभरात काम करताना वगैरे फोन हातात घ्यायचा नाही. एकावेळी एकच काम करायचं.
जिथे focused काम करायचं आहे तेव्हा खासकरून फोन उलटा करून ठेवून द्यायचा. एकदा तो हातात आला की अर्धा तास किमान वाया जातो ते परवडत नाही.
.
इन्स्टा, youtube, fb uninstall करणे हा अजून एक तात्पुरता उपाय. पण त्याने काही फरक नाही पडला.
तुमचा बिनकामी स्क्रीन टाईम किती आहे?कमी करावा का?कसा करावा?
Submitted by किल्ली on 11 February, 2025 - 01:37
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
reels scrolling मध्ये वेळ
reels scrolling मध्ये वेळ व्यतित करतात. >>
म्हणजे कुठल्या app मध्ये? ते app उडवून टाका.
इन्स्टा, youtube, fb uninstall करणे हा अजून एक तात्पुरता उपाय. पण त्याने काही फरक नाही पडला. >> का फरक पडला नाही? ( मी सोशल मीडियावर नाही, त्यामुळे माझा वेळ वाया जात नाही. ठरवले तर फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर X, LinkedIn वगैरे. शिवाय सहज जगता येते.)
अजून एक उपाय म्हणजे झोपताना फोन उशाशी ठेवू नये, दूर कुठेतरी ठेवावा म्हणजे उठण्याआधीच, बिछान्यात लोळत फोन बघणे बंद होईल.
पोमोडोरो app वापरले की त्यात २५, ५, १५ मिनिटांनी अलार्म होतो. त्याचा उपयोग होऊ शकेल. सतत खुर्चीत बसून काम होते, म्हणून मी पोमोडोरो app वापरतो, ज्यात २५ मिनिटे झाली की ५ मिनिटे चालणे आणि तासाला १५ मिनिट long ब्रेक घेण्यासाठी आठवण होते.
८ तास काम, ८ तास झोप
८ तास काम, ८ तास झोप
उरलेल्या ८ तासांपैकी २ तासापेक्षा जास्त स्क्रीन पाहायची नाही असा निग्रह करायचा.
झोपेच्या आधी १ तास स्क्रीन पाहायची नाही.
हे नवीन संशोधन सांगते की व्यायामाने स्क्रीनचे व्यसन कमी होऊ शकते-
https://www.sciencedirect.com/science/article/abs/pii/S0306460324002089?...
यावर उपायांची सूची द्यायला
यावर उपायांची सूची द्यायला गेल्यास पाल्हाळ न लावताही या धाग्याच्या तिप्पट चौपट मोठा प्रतिसाद होईल, इतक टायपायचा आलाय वैताग.
इन्स्टा, youtube, fb uninstall करणे हा अजून एक तात्पुरता उपाय. पण त्याने काही फरक नाही पडला.>>> ब्राउझर मधून ऍक्सेस करत असाल...
एक अँप्लिकेशन आहे https://my.nextdns.io/ तुमच्या स्वतःच्या नाही तर तुमच्या पार्टनर किंवा इतर कुणी तरी जो तुमच्या पासून दूर आहे अशा व्यक्तीच्या कॉम्पुटरवर याचा अकाउंट सेटअप करावा(पासवर्ड आपण जाणून घेऊ नये). साईटवर व्यवस्थित सेटअप कसा करावा याची माहिती दिली आहे (आयफोन, अँड्रॉइड , लिनक्स, रौटर्स सर्वांसाठी) हा एक डीएनएस जनरेट करतो तो आपल्या मोबाइलमध्ये -> प्रायव्हेट डीएनएस सेटिंग मध्ये सेट करून प्रायव्हेट डीएनएस ऍक्टिव्हेट करावा नंतर कॉम्पुटरवर यात आप्लिकेशन्स ब्लॉक करण्यासाठी, टाइम लिमिट ठेवण्या साठी खूप सारे ऑपशन्स आहेत, दुसऱ्या व्यक्तीच्या कॉम्पुटर वर हा सेटअप करण्याचा फायदा हा होतो कि तुम्ही काहीही करून या सेटीन्ग्स चेंज करून अँप्लिकेशन्स, वेबसाईट्स ऍक्सेस करू शकत नाही जोवर तुम्ही त्या दुसऱ्या व्यक्तीला कॉल करून त्या त्याच्या मार्फत अपडेट करवून घेत नाही.
काही प्रायव्हसी कन्सर्न्स आहेत पण पर्सनली मी ट्रेडऑफ करू शकतो विथ लेसर स्क्रीन टाइम.
मध्यंतरी मी देखील या
मध्यंतरी मी देखील या समस्येतुन जात होतो, WA, युट्युब वर बराच वेळ जात होता, माहितीपुर्ण व्हिडिओ पाहायचो पण एकंदरीत फोनचा वापर खूप वाढला होता. काही वेळ विचार केला आणि ठरवले की जास्तीत जास्त १ तास वापर करू दिवसातून या अँप्सचा. त्याप्रमाणे अँड्रॉइड फोन मधील डिजिटल वेलबीइंग चा वापर करून या अँप्सना वेळ मर्यादा ठरवली. समजा १ तास मर्यादा ठरवली असेल तर अँप बंद करताना तो बाकी वेळ सांगतो. आणि ५ मिनिट बाकी असताना नोटीफिकेशन येते. जर १ तास पूर्ण वापर झाला तर अँप त्या दिवस पुरते ग्रे आऊट होते, रात्री १२:०० नंतरच वापरता येते जर वेळेची मर्यादा तीच ठेवली तर. अगदीच गरज असेल तर मर्यादा वाढवण्याचा पर्याय आहे. त्या करता अशी सवय लावली की जर WA वापरायचे असेल त्या मर्यादेनंतर तर लॅपटॉप वरून वेब लॉगिन करून वापरू लागलो. आणि युट्युब हवे असेल तर लॅपटॉप किंवा TV वर बघू लागलो. अशा प्रकारे काही दिवसात मोबाइल आणि लॅपटॉप, अशा दोन्ही ठिकाणी अगदी गरजे पुरता वापर सुरु झाला. फोन चा एकंदरीत उपयोग कामापुरता करून बराच वेळ, मानसिक आणि शारीरिक थकवा आटोक्यात आणला.
या धाग्यावर यायलाच ज्यांच्या
या धाग्यावर यायलाच ज्यांच्या कडे वेळ नाही, त्यांचे मोलाचे आणि अनुभवाचे बोल आपण मिस करतोय.
खरं आहे, मायबोलीवर नसणाऱयांचे
खरं आहे, मायबोलीवर नसणाऱयांचे तर अजूनच.
(No subject)
मी केलेले काही उपाय सांगते.
मी केलेले काही उपाय सांगते. व्हॉट्स ॲप च्या बऱ्याच गृप मधून बाहेर पडले. रात्री नऊ ते सकाळच्या गजरा पर्यंत वॉ अँप ला डी एन डी मोड वर ठेवलं आहे. शाळेचे जे गृप आहेत ते म्युट केले आहेत, अगदी जवळच्या मित्र - मंडळींना जेव्हा वाटेल तेव्हा फोन करून त्यांच्याशी बोलते. इन्स्टाग्रामवर नसल्याने काही फरक पडत नाही. फेसबुकवर पहिल्या पासूनच फारशी ऍक्टिव नाही.
मी सोशल मीडियावर नाही,
मी सोशल मीडियावर नाही, त्यामुळे माझा वेळ वाया जात नाही. >>>
मायबोली पण सोशल मिडिया आहे.
एक व्यसन सोडवण्यासाठी दुसरं लावून घ्या. ऑफलाइन छंद, व्यायाम, एखाद्या सर्टिफिकेशनसाठी तयारी, नवीन स्किल शिकणे, ऑफिसमध्ये प्रमोशन/लीडरशिप गोल, मुलांच्या/मुलांसोबत अॅक्टिव्हिटी. रोजची टुडु लिस्ट बनवून त्यातली एक-एक कामं झाल्याशिवाय फोन हातात घ्यायचा नाही असं काही ठरवणे. आणि सगळ्याच सोमि वावरासाठी गिल्टी वाटून घ्यायची गरज नाही, थोडा विरंगुळा हवाच. बाकी एकदा सवय गेली की सहसा पुन्हा लागत नाही. शुभेच्छा!
मी सकाळी 10च्या आधी फक्त
मी सकाळी 10च्या आधी फक्त चार्ज करण्यापूरता मोबाईलला हात लावतो. आता संध्याकाळी 7 नंतर मोबाइल बंद, हाही निर्णय झालाय. हळूहळू वापर किमान पातळीवर आणण्याचा विचार आहे. ह्या सर्व शिस्त पालनासाठी नातवाला पंच म्हणून नेमला आहे. त्यामुळे, त्यालाही मोबाईल बाबतीत शिस्त लागली तर तो मोठ्ठा बोनसच !!!
सकाळी स्वतःच्या कामाना मोबाईलच्या वर अग्रक्रम दिला की स्क्रीन टाईम कमी करणं खूप सोपं होतं, हा माझा
अनुभव !!
इन्स्टा, youtube, fb
इन्स्टा, youtube, fb uninstall करणे हा अजून एक तात्पुरता उपाय. पण त्याने काही फरक नाही पडला.
>>>>>
व्हॉट्सअप बाबत हे करून बघ.
म्हणजे पूर्ण उडवू नकोस. पण तिकडे कुठल्या ग्रुप वर बागडत असशील तर ते archive करून बघ. माझे सगळे ग्रुप तसेच आहेत. फक्त एक क्रिकेटचा ग्रूप वर मी सक्रिय असतो. बाकी शाळा, कॉलेज, ऑफिस, सोसायटी, नेटफ्रेंड्स (ज्यात एक मायबोलीकरांचा) आणि या प्रत्येक कॅटेगरीत कित्येक ग्रुप आहेत जे सारे archive करून ठेवले आहेत. कारण बहुतांश व्हाट्सअप ग्रुप वर काही बिनकामाची लोक असतात जे सतत मेसेज टाकत राहतात. आणि आपण मूर्खासारखे आपले काम सोडून त्यांचे मेसेज वाचत राहतो. ते ग्रूप archive केल्याने आपला काही जगाशी संपर्क तुटत नाही. आणि बराच वेळ वाचतो. म्हणजे माझा तरी वाचला. कारण मी बरेच सक्रिय ग्रूपचा मेंबर आहे.
बराच वेळ वाचतो.
बराच वेळ वाचतो.
या वाक्याच्या सुरवातीला आपण किंवा आपला यापैकी कोणता शब्द येईल हे आपल्याच हातात आहे.
आवडता छंद हा चांगला उपाय आहे
आवडता छंद हा चांगला उपाय आहे
मी माझा आवडता छंद टेबल टेनिस खेळायला चालू केल्या पासून कमीत कमी ४ तास स्क्रीन time कमी झाला
@ मानवमामा,
@ मानवमामा,
म्हणजे जो वाचेल तो वाचेल ऐवजी जो वाचणार नाही त्याचा वेळ वाचेल म्हणायला हवे.
@ मानवमामा,
@ मानवमामा,
म्हणजे जो वाचेल तो वाचेल ऐवजी जो वाचणार नाही त्याचा वेळ वाचेल म्हणायला हवे.
प्रतिसाद दोनदा पडला
प्रतिसाद दोनदा पडला
स्क्रीन टाईम वाढला.
धन्यवाद मंडळी
धन्यवाद मंडळी
छंद. Noted
माबोचा वेळ जास्त नाहीये माझा.
Videos बघण्यात जातोय हल्लीच सुरु झालंय आणि social media उडवलं तर मी शॉपिंग अँप्स वर जातेमग पैसे खर्च होतात. तेही उडवले तर motivation संपल्यासारखं वाटतं.
.
नक्की try करेन वरचे उपाय
switch off modem / mobile
switch off modem / mobile data .
का करायचा आहे?
का करायचा आहे?
का करायचा आहे हा काय प्रश्न
का करायचा आहे हा काय प्रश्न झाला अमित
मला पण करायचाय कमी 
नाही पण मला ही पडला हा प्रश्न
नाही पण मला ही पडला हा प्रश्न ..
मी इन्स्टा,ट्विटरवर नाही..फेसबुकवर कोणे एके काळी काढलेले अकांउंट आहे पण एक्टीव नसते..
वॉट्सप कामसाठी,मुलांच्या शाळा अपडेट्स साठी लागतं..
रिकाम्या वेळेत जीमवाले रील्स बघते स्वमोटिवेशन साठी..
शॉपिंग साईट्सवर पण बोअर होतं काही काळानंतर ..
ऑन सिरियस नोट : स्क्रीन टाईम
ऑन सिरियस नोट : स्क्रीन टाईम कमी करुन काही कामं करायची असतील तर ती पूर्ण करावी आणि मग स्क्रीन बघत बसावे. स्क्रीन टाईम कमी करणे हे ध्येय न ठेवता त्या ऐवजी काय करायचं आहे ते ध्येय ठेवावे. ते झालं की बघावी की हवी तेवढी स्क्रीन.
मला माईड लेस स्क्रोलिंग करायला आवडते. आणि ते मी मनात कसलाही किंतु, अपराधीपणाची भावना न ठेवता भरपूर करतो. आय डू नॉट रिग्रेट! बाकीच्या जबाबदार्या असतातच. स्क्रीन वाईट म्हणून कमी करायची तर ते शक्य होईलसं वाटत नाही.
डोळे किंवा काही वैद्यकीय समस्या असतील तर अर्थात माझा काही सल्ला नाही.
बराच वेळ वाचतो.
बराच वेळ वाचतो.

या वाक्याच्या सुरवातीला आपण किंवा आपला यापैकी कोणता शब्द येईल हे आपल्याच हातात आहे.>>>>
मी शॉपिंग अँप्स वर जातेमग पैसे खर्च होतात. तेही उडवले तर motivation संपल्यासारखं वाटतं.>>> असंही असतं??
बराच वेळ वाचतो.
बराच वेळ वाचतो.

या वाक्याच्या सुरवातीला आपण किंवा आपला यापैकी कोणता शब्द येईल हे आपल्याच हातात आहे.>>>>
मी शॉपिंग अँप्स वर जातेमग पैसे खर्च होतात. तेही उडवले तर motivation संपल्यासारखं वाटतं.>>> असंही असतं??
माझ्या ओळखीत, कुटुंबीयात आणि मित्र परिवारात काही लोक आहेत जे सोशल मिडिया पासून पूर्ण दूर आहेत..
त्यातले काही सुपर अचिवर आहेत, काही पूर्ण स्वतः छ्या कोशात आहेत त्यांचे छंद, आवडी निवडी, मित्र ते असेच ऑफलाईन जपतात..
पण त्यांच्याकडे बघून आपण सोमी वर जाऊन वेळ फुकट घालवतोय वगैरे असे अपराधीपण आले नाही...
प्रत्येकाचे आनंद/ रमण्याच्या जागा, करमणुकीची गरज वेगवेगळे असतात..
कदाचित ही पोस्ट मूळ प्रश्नाला बगल देऊन जात असेल..
वरचे प्रतिसाद बघता
वरचे प्रतिसाद बघता
स्क्रिन टाईम कमी करावा का ? का करावा?
असा धागा आधी काढायला हवा….
याचे समाधान कारक उत्तर मिळाल्यावर मग आपण स्क्रिन टाईम कमी कसा करायचा याकडे वळू
मित्र, पैसे, बायको, आई बाबा,
मित्र, पैसे, बायको, आई बाबा, अन्न, वस्त्र, निवारा, प्रवास शॉपिंग, झाडून झाडून सगळे मोबाईलमध्ये आहेत. आता एकटे आपणच बाहेर येऊन करणार तरी काय?
digital wellbeing अॅप
digital wellbeing अॅप इन्स्टॉल करा आणि वेळ तपासा... आणि मग वेळ कुठे वाचवायचा याचा निर्णय घ्या.
बोकलत
बोकलत
माझ्या लहानपणी आमच्या घरी ख्रिस्ती धर्माचा प्रसार करण्यास काही बायका आल्या होत्या. त्या माझ्या आईला सांगत होत्या की काही काळातच जगबुडी होणार आहे आणि तुम्ही येशूला शरण आलात तर त्यातून वाचू शकाल. त्यावर माझी आई म्हणाली होती की "माझे नातेवाईक, नवरा, मुलेबाळे आणि सारे जग बुडून जाणार असेल तर मी एकटी वाचून करणार तरी काय?" त्याची आठवण झाली.
हा ना! करणार तरी काय ला आपलं
हा ना! करणार तरी काय ला आपलं 'हरी हरी' हे फेमस उत्तर द्यायची पण सोय नाही.
(No subject)
Pages