स्क्रीन

तुमचा बिनकामी स्क्रीन टाईम किती आहे?कमी करावा का?कसा करावा?

Submitted by किल्ली on 11 February, 2025 - 01:37

सध्या वाढता स्क्रीन टाइम आणि सततचं scrolling ही समस्या सर्वांना जाणवते आहे.
विरंगुळा म्हणून आपल्यापैकी बरेच जण reels scrolling मध्ये वेळ व्यतित करतात.
तर तुमचा हा अनावश्यक (? )वेळ किती आहे?
आकडेवारी चिंताजनक असेल तर कमी कसा करायचा?
काही सोपे उपाय असतील तर त्याबद्दल बोलूया.
(ऑफिससाठी करावे लागणारे काम आणि त्याचा स्क्रीन टाइम ह्यात धरला नाही, तो कमी केला तर खाण्यापिण्याचे वांदे होतील. पण त्यातही डोळ्यांवर कमी ताण पडावा वगैरे साठी किंवा काही smart पद्धती असतील तर तेही बोलू शकतो इथे ).
.

विषय: 
शब्दखुणा: 

स्क्रीनसेव्हर

Submitted by घायल on 26 January, 2016 - 18:26

आरशात पाहताना
दिसते अनोळखी छबी
सताड उचकटलेली एक
काळाची डबी

पुष्कर आठवांच्या
झाडाने वाकावं
काळ्या आईच्या कुशीत
फांद्याफांद्यांनी टेकावं

सुसाट शहरांचा वेग
अंगावर वागवताना
कार्बनमधे करपलेल्या
चेह-याला बदलावं

गिअरच्या सायकली
आणि डोंगराची चढण
मेण्टेन राहतो उगाचच
तुझ्या भेटीच्या भीतीनं

धूराच्या वलयातून वेडावते
एक नाचरी बाहुली
बंद डोळ्यांपुढे पसरते
निळसर किरमिजी सावली

मंदअंधा-या क्षितिजापर्यंत
एकशे एक रात्रीतील स्वप्नाळू शहरं
उडत्या चटया, जादूचे ढग
सोनेरी घुमटांचे महाल
त्यातली लखलखती दालनं
चमचमते दागिने
तुझ्या गळ्यात हि-यांचा हार
आणि

Subscribe to RSS - स्क्रीन