माझे आवडते औषध
Submitted by माबो वाचक on 21 January, 2025 - 23:22
बऱ्याच जणांचे आवडते चित्रपट, पुस्तक, लेखक, गायक, कलाकार असतात. पण आवडते औषध सुद्धा असू शकते हे ऐकून काहींना आश्चर्य वाटेल. पण माझे आहे आवडते औषध. जगातील कोणताही आजार परवडला पण हा आजार नको, असे वाटायला लावणारी सर्दी / पडसे मला वर्षातून कमीत कमी एकदा आणि काही वेळेस २-३ दा गाठते. पाण्याच्या नळाप्रमाणे वाहणारे नाक, सटासट येणाऱ्या शिंका, डोळ्यातून येणारे पाणी, दुखणारा घसा, अन गिळताना होणारा त्रास, जीव अगदी नकोसा करून सोडतात. बरे, डॉक्टरांकडे जाऊनही काही उपयोग नाही, कारण हा आहे व्हायरल फ्लू आणि याच्यावर कोणतेही औषध नाही. आता काही अँटी-व्हायरल औषधे बाजारात आली आहेत, पण पूर्वी नव्हती.
विषय: