बऱ्याच जणांचे आवडते चित्रपट, पुस्तक, लेखक, गायक, कलाकार असतात. पण आवडते औषध सुद्धा असू शकते हे ऐकून काहींना आश्चर्य वाटेल. पण माझे आहे आवडते औषध. जगातील कोणताही आजार परवडला पण हा आजार नको, असे वाटायला लावणारी सर्दी / पडसे मला वर्षातून कमीत कमी एकदा आणि काही वेळेस २-३ दा गाठते. पाण्याच्या नळाप्रमाणे वाहणारे नाक, सटासट येणाऱ्या शिंका, डोळ्यातून येणारे पाणी, दुखणारा घसा, अन गिळताना होणारा त्रास, जीव अगदी नकोसा करून सोडतात. बरे, डॉक्टरांकडे जाऊनही काही उपयोग नाही, कारण हा आहे व्हायरल फ्लू आणि याच्यावर कोणतेही औषध नाही. आता काही अँटी-व्हायरल औषधे बाजारात आली आहेत, पण पूर्वी नव्हती. त्यामुळे डॉक्टर काही वेळेस अँटी-बायोटिक्स देत असत, ज्यामुळे हा आजार बरा होत नाही. तर हा व्हायरल फ्लू आठवडाभर ठाण मांडून बसायचा आणि त्यानंतर आपोआप बरा व्हायचा. पण तो आठवडा मात्र खूपच वैताग आणणारा असायचा. सगळे काम-धाम सोडून केवळ नाक पुसत बसावे लागायचे. शिंकांनी जीव बेजार व्हायचा. अशातच मला बेनाड्रिल चा शोध लागला. म्हणजे घरात हे औषध पूर्वीपासून असायचे. पण मला वाटायचे कि ते फक्त घसा दुखल्यावर किंवा कफ असेल तर घेतात. पण गुगल बाबाच्या कृपेने हे समजले की हे औषध ‘अँटी-हिस्टामाईन’ या प्रकारातील आहे. आणि ते वर सांगितलेली सर्व लक्षणे आटोक्यात ठेवते. मग काय, केली सुरुवात बेनाड्रिल घ्यायला. घेतल्यापासून काही वेळातच सर्व लक्षणे आटोक्यात आली. अगदी जादूची कांडी फिरविल्याप्रमाणे. तेंव्हापासून हे औषध माझे आवडते बनले आणि या आजाराची भीती कमी झाली. या औषधाचे काही दुष्परिणाम पण आहेत. मला जाणवलेले दोन आहेत, ते म्हणजे गुंगी येणे आणि बद्धकोष्टता. पण याचे फायदे पाहता, हे तोटे नगण्य आहेत व मला सहन करता येण्याजोगे आहेत. हे औषध पचनाचा वेग मंदावते, म्हणून मग मी आजाराच्या कालावधीत थोडे कमी आणि हलके अन्न खातो. तसेच दुपारी व रात्री झोपण्यापूर्वी हे औषध घेतो. म्हणजे गुंगी पथ्यावरच पडते व झोप लागते. आता ‘अँटी-हिस्टामाईन’ प्रकारातील काही नवीन औषधे बाजारात आली आहेत, ज्यामुळे गुंगी येत नाही. पण मी ती अजून घेतली नाहीत. हि औषधे टॅब्लेट्स च्या स्वरूपात पण मिळतात, पण जे समाधान चमच्याने बेनाड्रिल पिण्यात आहे ते छोटीशी गोळी खाण्यात नाही. बेनाड्रिल पिल्यावर तोंडात थोडासा चिकटपणा राहतो, तो घालविण्यासाठी मी एखादा घोट पाणी पितो. हा लेखसुद्धा मला बेनाड्रिल घेतल्यामुळेच लिहिणे शक्य झाले. नाहीतर माझ्या हातांची काय बिशाद, नाक पुसायचे सोडून लॅपटॉप वर टंकायची. तर असे हे माझे बेनाड्रीलपुराण.
डिस्क्लेमर - मी डॉक्टर नाही. हा लेख वैद्यकीय सल्ला किंवा जाहिरात नाही.
अडुळसा आणि कैलास जीवन. कारण
अडुळसा आणि कैलास जीवन. कारण याचे साईड इफेक्ट नाहीयेत आणि लहान वयापासून ते मोठ्यापर्यंत ते घेऊ शकतो .
या धाग्यावर प्रिस्क्रीपशन वाली औषधं येऊ नयेत असं मला वाटतं.
बाळपणी लेकीला सर्दी झाली,
बाळपणी लेकीला सर्दी झाली, डोक्टरने ट्रायामिनिक दिले. तिला एक चमचा औषध देऊन मी बाटली बाजुला ठेवली. भावाने बाटली उचलली आणि वास चांगला येतोय संत्र्यासारखा म्हणत जरासे प्यायला आणि छान लागते म्हणुन सगळी बाटली एका दमात संपवली. नंतर ट्रायामिनिक आणले की ते लपवुन ठेवावे लागे, गोल्डस्पॉट सारखे लागते म्हणत घरात प्रत्येकजण चमचे भरभरुन प्यायचा
माझ्या तरुणपणी माझा एका मित्र
माझ्या तरुणपणी माझा एका मित्र होस्टेलमध्ये रहात असे व त्याचा रुममेट मेडिकल डिग्रिसाठी अभ्यास करत होता. एकदा सर्दीचा विषय निघाला, तेंव्हा त्याने एक टेक्स्ट पुस्तक उघडून ' सामान्य सर्दी ' ( कॉमन कोल्ड ) वरील धड्याची सुरवात वाचून दाखवली होती -" Common cold is curable with medicines in a week and without medicines in seven days !! "
मलाही सर्दीचा त्रास आहेच व तो भोगणं हे औषधांचे
दुष्परिणाम भोगण्यापेक्षा बरं , हा माझा अनुभव. अर्थात, मी वाफारा घेण , कोमट पाण्याच्या गुळण्या असले घरगुती उपाय करतो. "starve the fever and feed the cold !" ( तापात उपास करा, सर्दीत खात रहा ! ), हे अधिक सोईस्कर !
झंडू बाम, झंडू बाम, पीडा हारी
झंडू बाम, झंडू बाम, पीडा हारी बाम. सर्दी सरदर्द पीडा को पलमें दूर करें..
माझे ATF औषध.
मानव, तुमची आधीची लक्षणे
मानव, तुमची आधीची लक्षणे वाचून ही सर्दी नाही तर काही अॅलर्जी असावी असं वाटलेलं आणि तुम्ही बेनाड्रिल घेतलंत आणि बरं वाटलं त्यामुळे पझल पीस बरोब्बर बसला.
मला ही इथे आल्यावर काही वर्षांनी उन्हाळ्यात/ पानगळीच्या वेळी (याचं कोरिलेशन नक्की आहे का मला अजुन शंका आहे, पण आहे असं घरच्यांचं मत आहे) अशाच सटासट शिंकांचा त्रास होऊ लागलेला. त्यावर बेनाड्रिलची एक गोळी जादू केल्यासारखी काम करायची. ड्राउझी असल्याने मस्त झोप पण यायची आणि दोन तासांत एकदम ताजातवाना. कुठे बाहेर गेलो असेन आणि गोळी घ्यायची वेळ आली तर ड्राईव्ह करुन पटकन घरी पोहोचायचं हे मात्र करायला लागायचं. मग नॉन ड्राउजी औषधं ही असतात समजलं (क्लॅरिटिन) ते मला लागू पडलं नाही. स्ट्रिप आणलेली म्हणून घेतल्या पण बेनाड्रिल सारखा इफेक्ट नाही आला.
आता हल्ली प्रमाण आणि तीव्रता खूप कमी झाली आहे आणि काही औषध न घेता आटोक्यात असतं.
बाकी तुम्हा कोणाला सर्दी झाली की खा खा लागल्यासारखी भूक लागते का? मला सर्दी झाली की काय खाऊ काय नको होतं.
अपडेटः अरे भाऊंची प्रतिक्रिया आत्ता वाचली. "starve the fever and feed the cold !" >> हे लिटरल खाणं आहे का?
कधी शोध घेतला नाही खाण्याचा आणि सर्दीचा. शोधतो.
होमिओपॅथी औषधांच्या पावडरी
होमिओपॅथी औषधांच्या पावडरी ज्या पाटीवरच्या पेन्सिली सारख्या लागतात. Yumm !!
सर्दी साठी डॉक्टरांना दाखवले
सर्दी साठी डॉक्टरांना दाखवले का?
व्यायाम असेल तर सर्दीचा त्रास कमी होतो असे ऐकून आहे.
मला चवीला मध+सितोपलादी चुर्ण
मला चवीला मध+सितोपलादी चुर्ण आवडते.
खोकला झाला की मला सितोपलादी खायला मिळणार म्हणून आनंद होतो.....
छान धागा... अरेच्चा, हा मला
छान धागा... अरेच्चा, हा मला का नाही सुचला.. असे वाटले पटकन शीर्षक वाचून
तरी साधारण याच धर्तीवर माझा एक धागा होता. रिक्षा फिरवतो.
आजारपणात खायचे पदार्थ
https://www.maayboli.com/node/64538
आता औषधांकडे वळूया,
माझे सगळ्यात फेवरेट औषध म्हणजे ग्राईप वॉटर !
पोरांसोबत कित्येक बाटल्या रिचवल्या आहेत
खोकला झाला की
१) मध + सितोपलादी
२) कोमट पाण्यातून अडुळसा
हे दोन्ही फेवरेट..
मुलगी तर खोकला नसतानाही मला पण मला पण करत प्यायला येते.
खोकला जास्त झाला असेल, अगदी घसा धरला असेल, तर आमच्याकडे एक चहा कॉफी पेक्षा भारी असा काढा बनतो. ज्यात ज्येष्ठमध खडीसाखर अजून बरेच काहीबाही टाकले जाते. चहा ऐवजी मग दोन दिवस सकाळ संध्याकाळ तोच पितो.
ॲसिडिटी झाली की अर्धा कप थंड दूध अर्धा कप पाण्यात टाकून घेतो.
मळमळत असेल तर पापडखार लिंबू सरबतमध्ये टाकून.. मीठ नाही टाकायचे त्यात. ते आधीच खारट असते.
उन्हाचा त्रास झाला, पित्त चढले तर कोकम सरबतला पर्याय नाही.
आजारी असलो, तोंडाला चव नाही, सतत मळमळत असेल तर आवडते औषध म्हणून मी एक लिंकोमिसा नावाचे सरबत बनवले आहे. लिंबू कोकम मीठ साखर. रेसिपी वरील धाग्यात दिली असावी.
औषध आवडते असो नसो, पेंटासा आयुष्यभर घ्यायचे आहे. आधी गोळ्या घ्यायचो. आता सॅचे घेतो. खायला मजा येते. असे वाटते गुटखा खातोय
मी घसा दुखल्यावर मीठ घालून
मी घसा दुखल्यावर मीठ घालून कोमट पाण्याच्या गुळण्या करतो. त्याने थोडा वेळ आराम मिळतो पण काही वेळाने पुन्हा दुखायला लागतो .
झंडू बाम च्या वासानेच डोके दुखायचे पूर्वी . आता कसा आहे वास माहित नाही . बरेच दिवस वापरले नाही .
उपाय सांगणाऱ्या सर्वांचे धन्यवाद . सर्व वाचकांना उपयोगी पडतील .
कोफेन्ड नावाचे कफ सिरप आहे
कोफेन्ड नावाचे कफ सिरप आहे आयुर्वेदिक
काय चव आहे.. अहा हा
खूप आवडते.
कम्पनी : गुफिक
.
मध्यंतरी हे मिळेनासे झाले होते तेव्हा इतर बरेच आयुर्वेदिक कफ सीरप try केले पण कोफेन्ड ची चव अफलातून भारी आहे.
(ह्याने खोकला बरा होत नाही, खूप कमी असेल, फक्त खवखव असेल तर बरी होते)
.
बाळंत काढा no २ सुद्धा tasty होता.
बाळंत काढा no २ सुद्धा tasty
बाळंत काढा no २ सुद्धा tasty होता.>>> किल्ली
धिस वॉज नॉट एक्पेक्टेड गं.. ह्या धाग्यावर.
हल्दी कफ म्हणुन औषध आहे, बिना प्रीस्क्रीप्शन चे. घसा दुखी ला & चवीला ही चांगले आहे.
१ राजबिंदू म्हणुन औषध होते, आई लहानपणी गॅस झाला तर द्यायची, १ नम्बर हॉरीबल प्रकार आहे.
द्राक्षासव.
द्राक्षासव.
बाळंत काढा no २
बाळंत काढा no २
(हा दुसऱ्या वेळेच्या बाळंतपणात घेतात का?
तरीच मला मिळाला नाही).
मला कुमारी आसव पण आवडायचे.
लहानपणी आई द्यायची.
सेप्टिलिन
सेप्टिलिन
सर्दी फार झाल्यावर नाक मोकळं
सर्दी फार झाल्यावर नाक मोकळं करायला झणझणीत चिकन रस्सा..
हाजमोला, जेलूसिल
हाजमोला, जेलूसिल