One dish meal - व्हेज फ्रँकी - अश्विनी११

Submitted by अश्विनी११ on 14 September, 2024 - 01:08

साहित्य - गव्हाच्या पोळ्या ,
भाजीसाठी - कोबी , गाजर , कांदा , ढोबळी मिरची ( माझ्या घरी हे उपलब्ध होते) , मटार , कॉर्न
किचन किंग मसाला , अमुल बटर , ( हेल्दी हवे असल्यास साजूक तूप ) , मीठ

IMG_20240913_213716_1.jpg

कृती - १. घरातील उपलब्ध भाज्या स्वच्छ धुवून , बारीक चिरून / फुडप्रो मध्ये बारीक करून घेणे .
२. कढईत तेल घेणे . तेल तापले की त्यात चिरलेल्या भाज्या घालून एक वाफ काढणे . नंतर त्यात मीठ आणि किचन किंग मसाला घालून भाजी करून घेणे .

IMG_20240913_213842_2.jpg

३. पोळीवर ही भाजी घालून त्याचा रोल करून घेणे.
४. तापलेल्या तव्यावर हे रोल अमुल बटर किंवा साजूक तूप लावून क्रिस्पी होईपर्यंत शेकवून घेणे.
५. सोमी वर टाकायचा असेल तर नीट plating करून फोटो काढणे .

अधिक टिपा - स्टफ्फिंग म्हणून सोया खिमा , पनीर , उकडलेली बटाटा भाजी वापरू शकता .
पोळीवर आवडत असेल तर हिरवी चटणी , सॉस लावून भाजी ठेऊ शकता .
हा प्रकार सकाळची उरलेली कोबीची भाजी , पोळ्या संपवण्याचा आमच्या घरचा हमखास मार्ग आहे .

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्त !
<<आमच्याकडे पण बरीच version बनतात याची.. >> +७८६
आणि गंमत म्हणजे मलाही करता येतात Wink
मी अंड्याचे वर्जन जास्त करतो..

सोप्पी आहे रेसिपी..मस्त ..आमच्याकडे पण बरीच version बनतात याची..>>+१११ कोबीची भाजी घालून तव्यावर पोळी चे रोल परतले तर अशक्य असे क्रंची होतात. अल्टिमेट लागतात. ( कोचीभा नावडती असेल तरी चटचट संपेल) अश्विनी११ छान दिसतेय रेसिपी.

माझ्याकडे डब्याला बर्‍याचदा याचे पनीर घातलेलं व्हर्जन दिले जाते. कोबीची भाजी घालून कधी केलं नाहीये. करून बघेन. पण मी त्यात पनीर किंवा अजून काही प्रथिनांसाठी घालेन.

हो अल्पना , भाजीमध्ये अजून पौष्टिक करता येईल . माझ्याकडे नवीन गोष्टी आणून रेसिपी करण्याइतका वेळ नव्हता . त्यामुळे उपलब्ध गोष्टीतच केली.