आरोग्यदायी पेय... कॅरट टॉमेटो ज्यूस .. मनीमोहोर

Submitted by मनीमोहोर on 13 September, 2024 - 08:53

कॅरट टॉमॅटो ज्यूस

कोणी जेवायला यायचे असेल तर त्यांना आल्या आल्या नुसत पाणी न देता आपण सरबत, पन्हं , अमृत कोकम किंवा रिअल चा ज्यूस असं काहीतरी पेय देतो. पण ह्या सगळ्यात साखर असल्याने बरेच जण ते घेत नाहीत. तर अश्या लोकांकरता गाजर टोमॅटो ज्यूस हे अगदी चवदार आणि आरोग्य दायी पेय आहे. नक्की करुन बघा.

साहित्य
अर्ध गाजर, एक लाल टोमॅटो, अगदी किंचित आलं आणि हिरवी मिरची, मीठ, सजावटी साठी कोथिंबीर

कृती
गाजर, टोमॅटो, हि मि आणि आलं हे सगळं किसून घ्या. त्यात थोड मीठ घालून पाच मिनिटं ठेवून द्या. नंतर त्याला पाणी सुटेल. आता ते मिश्रण थोडं पाणी घालून घट्ट पिळून गाळून घ्या . नंतर गरजे नुसार गार पाणी , मीठ घाला. वरून एखादं कोथिंबिरीच किंवा पुदिन्याच पान घालून प्यायला घ्या.

अधिक टिपा :
१) गाजर मिक्सर मध्ये घालू नका. फार मेण होत आणि अपेक्षित चव मिळत नाही गाळून घेतलं तरी. Chopper मध्ये घालू शकता . मी किसून च घेते.
२). टॉमेटो आंबट नसेल तर असेल तर लिंबू पिळू शकता.
मिरी पूड ही छान लागते ह्यात.
३) आलं आणि मिरची फार च कमी घालायची आहे. वास आणि तिखट पणा ओव्हर पॉवर व्हायला नको अजिबात.
४) ह्याचा रंग फारच छान येतो आणि एकदम रिफ्रेशिंग वाटतं. सरबत प्यायल्या वर साखरेमुळे पोट भरत तसं ही होत नाही.
उन्हाळयात दुपारी वगैरे ही छान वाटतो प्यायला.
हा फोटो
20240913_163002.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे मस्त दिसतंय!
टोमॅटो किसता येतो का? का फ्रोजन करुन मग किसलात? हल्ली कलिंगड फ्रोजन करुन किसायच्या व्हिड्यूचं फॅड आलंय म्हणून ते डोक्यात आलं.
थोडा पुदिना आणि ग्लासला कडेला तिखट, मीठ, आंबट असं लावायचं असं पण करता येईल.

आशिका अमितव धन्यवाद.

टोमॅटो किसता येतो का? का फ्रोजन करुन मग किसलात? >> येतो मस्त किसता . नॉर्मलच घ्यायचा आणि किस इट.. हाहाहा

थोडा पुदिना आणि ग्लासला कडेला तिखट, मीठ, आंबट असं लावायचं असं पण करता येईल. >> हो तस केलं होतं एकदा छान दिसतं ते पण.

बिना साखरेचे सरबत हवेच होते मला. छान आहे पाककृती.
सिझन बदलायच्या आधी एकदा नक्की करून बघेन. या दिवसात मिळणाऱ्या केशरी गाजरांचा केला तर बरा लागेल ना?
.

उ बो, मृ, SharmilaR, केया , सामो , कविन, अल्पना धन्यवाद.

टोमॅटोपासून बनवलेला गुलाब जास्त आवडला. >> धन्यवाद उ बो.. माझी पेशालिटी आहे ती. अश्या गुलाबाची ताटाभोवती ची महिरप ही केली आहे मी.
केया, मी सजेस्ट करीन की घाला मिरची कणभर. छान चव येते.
रंग छान येतो हल्ली ची गाजरं शेंदरी आहेत आणि टॉमॅटो एकदम लालबुंद होता.

रंग रूप छान दिसतेय..
बिनसाखरेची आंबट तिखट चव सुद्धा छान लागत असेल.. तसे टोमॅटोचा गोडसपणा असेलच म्हणा..

अच्छा तो टोमॅटो गुलाब आहे का.. भारीच Happy

मस्त रंग आलाय.
प्रेझेन्टेशन सुरेख झालंय.
साखर अजिबात नसल्याने तर जास्तच आवडलं.

ममो मस्त रेसिपि..

ज्युस म्हटले की मिक्सरवर काढा नाहीतर ज्युसरवर, राडा पडतोच. ही कमी राडावाली रेसिपी छान वाटली. घरी गाजरे व टोमॅटो दोन्ही आहेत्,करुन बघते.

धनुडी, अश्विनी ११, bhakti salunke, ऋन्मेष, झकासराव, साधना, शशांक, अनु ... धन्यवाद...

अच्छा तो टोमॅटो गुलाब आहे का.. भारीच Happy >> धन्यवाद ऋ.

खिसायच नसेल तर पल्स मोड वर किंवा chopper वगैरे वापरू शकता. अगदी मेण करू नका. कारण त्यामुळे जरी मिश्रण गाळून घेतलं तरी चव बदलते. हे स्मुदी सारखं फार दाट करायचं नाहिये. सरबतासारखं करा.

नक्की करून बघा. छान लागतं. तोंडाला चव येते.

वाह काय सुंदर रंग आला आहे. आणि तिखट मिठाच्या चवीमुळे हे ज्यूस नक्की आवडेल.
माझ्याकडे VITEK चा slow / cold pres juicer आहे. त्यात फळं/ भाज्या क्रश होत नसल्यामुळे त्याची मुळ चव कणभरही बदलत नाही. टोमॅटो ज्यूस अनेक वेळा केला आहे. आता या रेसिपी प्रमाणे करून पाहते.

आकर्षक दिसतोय रंग पण.. प्रेझेन्टेशन पण सुरेख.. +१.

दोन्ही घरात आहेत.करून पहायला हवे.

रंग मस्त आलाय. तुमच्या सगळ्याच पाककृतींप्रमाणे हीदेखील अगदी डोळ्यांना सुखावणारी आहे.

नुसतं गाजराचं सरबत रोज प्यायचो आता हे जरुर करेन.
तुमचं रेसिपी नाविन्य वाखाणायला हवं...

Pages