
कॅरट टॉमॅटो ज्यूस
कोणी जेवायला यायचे असेल तर त्यांना आल्या आल्या नुसत पाणी न देता आपण सरबत, पन्हं , अमृत कोकम किंवा रिअल चा ज्यूस असं काहीतरी पेय देतो. पण ह्या सगळ्यात साखर असल्याने बरेच जण ते घेत नाहीत. तर अश्या लोकांकरता गाजर टोमॅटो ज्यूस हे अगदी चवदार आणि आरोग्य दायी पेय आहे. नक्की करुन बघा.
साहित्य
अर्ध गाजर, एक लाल टोमॅटो, अगदी किंचित आलं आणि हिरवी मिरची, मीठ, सजावटी साठी कोथिंबीर
कृती
गाजर, टोमॅटो, हि मि आणि आलं हे सगळं किसून घ्या. त्यात थोड मीठ घालून पाच मिनिटं ठेवून द्या. नंतर त्याला पाणी सुटेल. आता ते मिश्रण थोडं पाणी घालून घट्ट पिळून गाळून घ्या . नंतर गरजे नुसार गार पाणी , मीठ घाला. वरून एखादं कोथिंबिरीच किंवा पुदिन्याच पान घालून प्यायला घ्या.
अधिक टिपा :
१) गाजर मिक्सर मध्ये घालू नका. फार मेण होत आणि अपेक्षित चव मिळत नाही गाळून घेतलं तरी. Chopper मध्ये घालू शकता . मी किसून च घेते.
२). टॉमेटो आंबट नसेल तर असेल तर लिंबू पिळू शकता.
मिरी पूड ही छान लागते ह्यात.
३) आलं आणि मिरची फार च कमी घालायची आहे. वास आणि तिखट पणा ओव्हर पॉवर व्हायला नको अजिबात.
४) ह्याचा रंग फारच छान येतो आणि एकदम रिफ्रेशिंग वाटतं. सरबत प्यायल्या वर साखरेमुळे पोट भरत तसं ही होत नाही.
उन्हाळयात दुपारी वगैरे ही छान वाटतो प्यायला.
हा फोटो
मस्त आहे.
मस्त आहे.
रंग अफलातून आला आहे.
रंग अफलातून आला आहे.
अंजू, सुनिधी, माधव ...
अंजू, सुनिधी, माधव ... धन्यवाद
You can make good Martini out
You can make good Martini out of basic juice. Call it Konkan Martini for nostalgia.
कातिल फोटो. मस्त रेसिपी.
कातिल फोटो. मस्त रेसिपी.
You can make good Martini out
You can make good Martini out of basic juice.Call it Konkan Martini for nostalgia. अमा
धन्यवाद..
मामी, धन्यवाद ...
(No subject)
रंगच इतका मोहक आहे, रेसिपी पण
रंगच इतका मोहक आहे, रेसिपी पण सोपी.अभिनंदन.
अभिनंदन ममो ताई,
अभिनंदन ममो ताई,
पुन्हा एकदा तो रंग बघूनच जीवाला थंडावा मिळत आहे
अभिनंदन!
अभिनंदन!
अभिनंदन!
अभिनंदन!
अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन!
अभिनंदन!
अभिनंदन!
अभिनंदन!
अनु, ऋ, , Sharmila, कविन,
अनु, ऋ, , Sharmila, कविन, मृ , ऋतुराज, धनि आणि सर्व मत देणाऱ्यांचे मनापासून आभार.
प्रशस्तीपत्रक खुप छान झाले आहे.
Pages