वन डिश मिल - दलिया - मृणाली

Submitted by mrunali.samad on 7 September, 2024 - 08:06

साहित्य :
१. दलिया रवा एक वाटी
२. मुग , मसूर ,तुर डाळी मिळून एक वाटी
३. जीरे
४. अर्धा छोटा चमचा जीरे पावडर
५. २ हिरव्या मिरच्या
६. घरात उपलब्ध भाज्या मटार,गाजर,बीन्स
७. छोटा कांदा (ऑप्शनल)
८. अर्धा टोमॅटो (ऑप्शनल)
९. तुप,तेल
१०. मीठ
११.पाणी

कृती
१. तापलेल्या प्रेशर कुकरमधे जरा तेल घालावे..जीरे टाकावे..तडतडले कि बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, कांदा,टॉमेटो, चिरलेल्या भाज्या घालून परतून घ्यावे.
२. जीरे पावडर घालावी.
३. धुतलेल्या डाळी आणि धुवून ठेवलेला दलिया रवा घालून परतून घ्यावे.
४. डाळी आणि रवा मिळून २ वाट्या आहेत तर चार वाट्या पाणी घालावे..मीठ टाकावे चवीनुसार..
५. मध्यम आचेवर दोन शिट्ट्या होऊ द्या..
६. कुकर गार झाला कि झाकण उघडावे...तुम्हाला घट्ट हवे असेल तर थोडा वेळ गैसवर असू द्या.. आणखी पातळ हवे असेँ तर गरम पाणी घालून थोडा वेळ ऊकळू द्या..

एका प्लेटमध्ये वाढुन घ्या..वरून जरा साजुक तुप घाला..आवडत असेल तर लोणचं, भाजलेला पापड पण सोबत असू द्या...
आणि संपवून टाका गरम गरम चविष्ट दलिया....
मला फार आवडतो..एका नॉर्थ इंडियन मैत्रिणी ने शिकवलाय.
वर दिलेल्या प्रमाणात दोन मुलं आणि मी आम्हाला तिघांना पुरतो..

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

वाह! मस्त आणि हेल्दी
आमच्याही घरी सगळ्यांना फार आवडतो दलिया (माझेही काम वाचवतो Proud ). माझा कुकर बदलायला झालाय म्हणून मी कढईत करते. पण मग पाणी जरा जास्त घालावे लागते आणि लक्ष द्यावे लागते अधूनमधून.

मी पूर्वी करायचे बर्‍याचदा. बहूतेक इथे कधीतरी लिहिली होती रेसेपी. कधी नुसती मुगाची डाळ, कधी मिक्स डाळी घालायचे. कांदा - टॉमॅटो मात्र माझ्या रेसिपीत ऑप्शनल नव्हते. आणि लापशी रव्याच्या ऐवजी गव्हाच्या जाड दलियाची खिचडी करायचे मी. आमच्या हिमाचली ड्रायव्हर काकांच्या बायकोकडून शिकले होते.
खूप वर्षात केली नाहीये अशी खिचडी. आता तुझ्या पद्धतीने करेन एकदा.

मस्तच की मृ. अनु बरोबर म्हणतेय ही स्पर्धा आपल्या फायद्याची आहे. आता एक सांगा, माझ्या कडे दलिया आणि लापशी रवा दोन्ही आहे. ( मला हे दोन्ही एकच वाटायचं अत्ता पर्यंत) मग काय घालुन दोन्ही पेकी?

धनुडी, मला पण दोन्ही एकच वाटतंय अजून पर्यंत.. म्हणजे जे यात वापरलंय ते सांबा व्हीट सुजी असं लिहिलंय पाकिटावर..
फोटो आणते रव्याचा थांब..

हा दलिया, मी लापशी रवा आणलाय तो थोडा बारीक आहे. घरी जाऊन बघते, फोटो काढते (निघाले ऑफिस मधून.) आधीच दलिया होता घरात. मग माझी जाऊ म्हणाली गणपतीत शेवयांची खीर चालणार नाही म्हणून लापशी रवा आणलाय , तो ही तसाच आहे पडून. ( खीर शेवटी गव्हल्याची केली Lol ) आता मृ च्या रेसिपी ने संपवीन दलिया+ लापशी रवा.