पाककला

आरोग्यवर्धक पेय - कषाय - वृंदा

Submitted by वृंदा on 17 September, 2024 - 16:41

कषाय

हे पेय म्हणजे अमृतच. चहा ला एक सुंदर पर्याय. भरपूर शक्ती देणारे.तरतरी आणणारे. खूप पूर्वी हा शब्द मी गोंदावलेकर महाराजांच्या एका पुस्तकात वाचलेला. मग एकदा रूचकर मेजवानी म्ध्ये एक व्हिडीओ पाहीलेला.कोकण,गोवा, कारवार ला अनेक घरी करतात. उन्हाळ्यात उष्णता कमी कलणारा तर पावसाळ्या सर्दी खोकल्याला आराम पडण्याकरता बहुगुणी.

साहित्य- 100 ग्लॅम धणे, 50 ग्रॅम.जिरे, 25 ग्रॅम बडिशेप, साखर ,दूध ,पाणी

विषय: 

आरोग्यदायी पेय - मेक्सिकन तेपाचे - अमितव

Submitted by अमितव on 17 September, 2024 - 13:57
तेपाचे

प्रत्यक्षात लागणारा वेळ * : ३ दिवस

लागणारे जिन्नस *:
Tapache-02.jpg
छान पिकलेला न सोललेला अननस.
Tapache-03.jpg
चार लवंगा
एक दालचिनीची लहान काडी
एक कप ब्राऊन साखर/ गूळ/ साधी साखर
पाणी
एक मोठी घट्ट झाकणाची बरणी

क्रमवार पाककृती *

ही मूळ मेक्सिकन रेसिपी आहे. अननसाची सालं काढण्यापूवी तो हलकासा धुवुन घ्या. फक्त पाण्याखाली धरा फार चोळू वगैरे नका.

विषय: 

आरोग्यदायी पेय - काळ्या गाजराची कांजी {अल्पना}

Submitted by अल्पना on 17 September, 2024 - 12:37

या वर्षी मार्च - एप्रिल मध्ये एका मैत्रिणीने मला लॅक्टो फरमंटेशन / किण्वन या प्रकाराशी तोंडओळख करून दिली. तिने कंबुचा चे विरजण दिलं, कसं करतात हे शिकवलं. तो प्रयोग करून बघितला आणि हे नवं पेय मला आवडलं. त्याच दरम्यान तिने घेतलेला एक या विषयावरचा कोर्स मला कराय्ला मिळाला. कंबुचा व्यतिरिक्त जिंजर बग आणि रेझिन वॉटर वापरून केलेले फ्रूट सोडा, मॅक्सिकन तपाचे, काफिर ग्रेन्स वापरून केलेले काफिर योगर्ट अश्या काही नव्या पेयांची आणि अजून बर्‍याच पदार्थांची माहिती या दरम्यान मिळाली. किण्वन केलेले भारतिय पदार्थ शोधताना काळ्या गाजराची कांजी, आंबिल या पदार्थांची नावं आठवली.

विषय: 

चटण्या - कांद्याची चटणी - ऋतुराज.

Submitted by ऋतुराज. on 16 September, 2024 - 10:36

कांद्याची चटणी

बरेचदा एखादी बोअरिंग भाजी असेल तर किंवा भाजी करायचा कंटाळा आला तर अगदी घरातल्याच साहित्यात होणारी ही झणझणीत कांद्याची चटणी.

साहित्य:
चार मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून, दोन मोठे चमचे तेल, चिमूटभर हिंग, एक लहान चमचा जिरे, एक लहान चमचा मोहरी, अर्धा चमचा हळद, पाच सहा पाकळ्या लसूण ठेचून, लाल तिखट किंवा घाटी काळा मसाला दीड मोठे चमचे, शेंगदाण्याचा जाडसर कूट दोन मोठे चमचे आणि चवीनुसार मीठ.

विषय: 
शब्दखुणा: 

पाककृती स्पर्धा ३: पेरुची चटणी - आशिका

Submitted by आशिका on 15 September, 2024 - 08:25

चटणी हा पदार्थ पानात अगदी कमी प्रमाणात वाढला जात असला तरीही भारतीय खाद्यसंस्कृतीतील एक महत्वाचा पदार्थ आहे. पानाच्या डाव्या बाजुची रंगत वाढवणारा आणि कधी मुख्य भाजी वगैरे पुरवठ्याला कमी पडत असेल तर गृहिणींच्या मदतीला धावून येणारा शिवाय जेवणाची लज्जतही वाढवणारा असा हा पदार्थ. विशेष म्हणजे घरात उपलब्ध असलेल्या सामुग्रीतून झटपट बनणारं हे तोंडीलावणं.

आज मी जी पा. कृ. देत आहे ती पेरुची चटणीही अशीच अगदी ६/७ घटक पदार्थांपासून पाचेक मिनिटांत बनणारी अशी आहे. तर यासाठी लागणारे साहित्य बघुयात.

साहित्यः-

विषय: 

पाककृती स्पर्धा ३: पेरुची चटणी - आशिका

Submitted by आशिका on 15 September, 2024 - 08:22

चटणी हा पदार्थ पानात अगदी कमी प्रमाणात वाढला जात असला तरीही भारतीय खाद्यसंस्कृतीतील एक महत्वाचा पदार्थ आहे. पानाच्या डाव्या बाजुची रंगत वाढवणारा आणि कधी मुख्य भाजी वगैरे पुरवठ्याला कमी पडत असेल तर गृहिणींच्या मदतीला धावून येणारा शिवाय जेवणाची लज्जतही वाढवणारा असा हा पदार्थ. विशेष म्हणजे घरात उपलब्ध असलेल्या सामुग्रीतून झटपट बनणारं हे तोंडीलावणं.

आज मी जी पा. कृ. देत आहे ती पेरुची चटणीही अशीच अगदी ६/७ घटक पदार्थांपासून पाचेक मिनिटांत बनणारी अशी आहे. तर यासाठी लागणारे साहित्य बघुयात.

साहित्यः-

विषय: 

वन डिश मिल - स्पायसी ग्रीन राईस {मंजूताई}

Submitted by मंजूताई on 15 September, 2024 - 08:18
ओवा,भात

हा भात दांडेलीच्या होमस्टे मध्ये खाल्ला होता. ह्यात काहीच मसाले घातले नाहीत आहे फक्त ओव्याच्या पानांचा स्वाद! एक वाटी ओव्याची पाने वाटून थोडी बारीक चिरून. एक वाटी तांदूळाचा भात शिळा असेल तर चांगला. तुप जिऱ्याची फोडणीत घरात असेल तो सुकामेवा, तीळ, जवस,मटार, मक्याचे दाणे (मी घातले नाही) घालून थोडं परतून दोन्ही पानं घालायची. मीठ चवीनुसार! काकडी, टोमॅटोचे काप व डाळिंबाच्या गाण्यांनी सजवावा.
ह्या प्रमाणात आमच्या दोघांच जेवण झालं.
फोटो खाऊ गल्लीत टाकला होता तेव्हा लक्षात आलं की वन डीश मील मध्ये चालेल.

विषय: 
शब्दखुणा: 

वन डिश मिल - मसूर बिर्याणी {अल्पना}

Submitted by अल्पना on 15 September, 2024 - 03:52

हा पदार्थ मी पहिल्यांदा लॉकडाउन मध्ये केला होता. त्याआधी मैत्रिणीकडून १-२ वेळा मसूर बिर्याणी हे नाव ऐकलं होते. पण घरात बिर्याणी म्हणजे मांसाहारीच हवी असं मानणारे सदस्य असल्याने कधी करून बघायचा विचार केला नव्हता. तसंही बिर्याणी सारखा कुटाण्याचा पदार्थ घरी करण्याइतका उरकही नाही आहे माझ्यामध्ये. पण लॉकडाऊन मध्ये सुरवातीला सगळंच घरी करावं लागत असताना वन डिश मिल म्हणून ही बिर्याणी केली. आणि चक्क आमच्या घरी ती सगळ्यांना आवडली. त्यानंतर अगदी नेहेमी नाही, पण बर्‍याचवेळा ही बिर्याणी घरी करून झाली आहे.

विषय: 

चटण्या.. भेंडीची चटणी... मनीमोहोर

Submitted by मनीमोहोर on 15 September, 2024 - 03:33

भेंडीची चटणी

नाव बघून न वाचताच पुढे जाऊ नका भेंडी न आवडणाऱ्या आणि
आवडणाऱ्या मंडळींनी ही. खुप मस्त लागते ही चटणी. कोणी कोणी ठेचा ही म्हणत असतील पण आम्ही चटणीच म्हणतो.

साहित्य

अर्थातच धुऊन पुसून कापलेली एक मोठी वाटी भेंडी ( फार बारीक चिरायची नाही. ) लसूण पाच सहा पाकळ्या , हिरव्या मिरच्या दोन तीन मोठे तुकडे करून (किंवा आवडीप्रमाणे ) , भाजून सालं काढलेले शेंगदाणे दोन चमचे , कोथिंबीर थोडी ( काड्या होत्या घरात म्हणुन मी त्याच घातल्यात) जिरं, मीठ ,लिंबू
( ऐच्छिक )

कृती

विषय: 
शब्दखुणा: 

पाककृती स्पर्धा - आरोग्यदायी पेय- कुकुंबर मिंट ज्यूस - आशिका

Submitted by आशिका on 14 September, 2024 - 08:30

हल्ली आपल्याकडे सर्वांत जास्त वस्तीला असणारा ऋतू उन्हाळाच झालाय, त्यामुळे उन्हाळ्यात , म्हणजे जवळजवळ वर्षभर घेता येईल असे हे काकडी आणि पुदीन्याचे सरबत.

कृती अगदीच सोपी आहे आणि नेहमी घरात असणारे घटक पदार्थ वापरले आहेत.

साहित्य-
१. काकडी - १ नग
२ पुदीन्याची पाने - १५ /२०
३ सैधव मीठ - चवीनुसार
४ आलं - एक इंच तुकडा
५ लिंबू रस - १ मोठा चमचा
६ मध - १ मोठा चमचा
७ भाजलेल्या जिर्‍यांची पूड - १ लहान चमचा
८ पाणी- १ ग्लास

कृती-

विषय: 

Pages

Subscribe to RSS - पाककला