हल्ली आपल्याकडे सर्वांत जास्त वस्तीला असणारा ऋतू उन्हाळाच झालाय, त्यामुळे उन्हाळ्यात , म्हणजे जवळजवळ वर्षभर घेता येईल असे हे काकडी आणि पुदीन्याचे सरबत.
कृती अगदीच सोपी आहे आणि नेहमी घरात असणारे घटक पदार्थ वापरले आहेत.
साहित्य-
१. काकडी - १ नग
२ पुदीन्याची पाने - १५ /२०
३ सैधव मीठ - चवीनुसार
४ आलं - एक इंच तुकडा
५ लिंबू रस - १ मोठा चमचा
६ मध - १ मोठा चमचा
७ भाजलेल्या जिर्यांची पूड - १ लहान चमचा
८ पाणी- १ ग्लास
कृती-
मिक्सरच्या भांड्यात काकडी धुवून (साले न काढता) चकत्या करुन घेणे, पुदीन्याची १५/२० पाने त्यात घालणे, साहित्यात दिलेल्या प्रमाणाने, सैन्धव मीठ, मध, जिरे पूड, आले, लिम्बाचा रस आणि पाणी घालून मिक्सरवर घुसळून घेणे. गाळणीने गाळून एखादा बर्फाचा खडा घालून सर्व्ह करणे.
पोषण मूल्ये
काकडी, पुदीना, मध, लिम्बू, आलं यांचे फायदे सर्वश्रुत आहेतच. काकडी शरीरातील पाण्याची पातळी राखण्यास मदत करते, तसेच काकडी आणि पुदीना यांतील फायबर, अॅन्टी ऑक्सिडंटस, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए यांनी परिपूर्ण असे हे सरबत, करण्यास सोपे आणि पाच मिनिटांत तयार होणारे असे आहे.
पुदीना, जिरे पूड आणि लिम्बाचा रस या सर्वांची चव काकडीबरोबर खुलुन येते.
फोटो
मस्त आलाय रंग... काकडी बरोबर
मस्त आलाय रंग... काकडी बरोबर मिंट मस्तच लागेल.
वाह! टेस्टी लागत असणार हे
वाह! टेस्टी लागत असणार हे
लवकरच करुन बघेन
छान आहे पाकृ
छान आहे पाकृ
वाह! टेस्टी लागत असणार हे >>>
वाह! टेस्टी लागत असणार हे >>>>> +९९९९
मस्त
मस्त
मस्त!
मस्त!
हिरवागार ज्यूस! मस्त!
हिरवागार ज्यूस! मस्त!
रंग मस्त आलाय करून पाहीन
रंग मस्त आलाय
करून पाहीन
सह्हीच आहे हे. कॉम्बो इतकं
सह्हीच आहे हे. कॉम्बो इतकं मस्त आहे की छानच लागेल. रंगही सुरेख दिसतोय.
करुन बघितले आणि आवडले
करुन बघितले आणि आवडले
एक व्हेरिएशन पण करुन पाहिले. यात जलजिरा पावडर मिक्स केली. हे ही छान लागले
फारच मस्त, करायला सोपं वाटतं
फारच मस्त, करायला सोपं वाटतं आहे.काकडी आणि पुदिना पण मिळतो करून बघेन.
रिफ्रेशिंग आहे एकदम.
रिफ्रेशिंग आहे एकदम.
सुरेख रेसिपी आणि रंग.
सुरेख रेसिपी आणि रंग.
मस्त. पुदिना बागेत ओथंबु
मस्त. पुदिना बागेत ओथंबु लागला की सुरु करावा रतीब.