पाककृती स्पर्धा - आरोग्यदायी पेय- कुकुंबर मिंट ज्यूस - आशिका

Submitted by आशिका on 14 September, 2024 - 08:30

हल्ली आपल्याकडे सर्वांत जास्त वस्तीला असणारा ऋतू उन्हाळाच झालाय, त्यामुळे उन्हाळ्यात , म्हणजे जवळजवळ वर्षभर घेता येईल असे हे काकडी आणि पुदीन्याचे सरबत.

कृती अगदीच सोपी आहे आणि नेहमी घरात असणारे घटक पदार्थ वापरले आहेत.

साहित्य-
१. काकडी - १ नग
२ पुदीन्याची पाने - १५ /२०
३ सैधव मीठ - चवीनुसार
४ आलं - एक इंच तुकडा
५ लिंबू रस - १ मोठा चमचा
६ मध - १ मोठा चमचा
७ भाजलेल्या जिर्‍यांची पूड - १ लहान चमचा
८ पाणी- १ ग्लास

कृती-

मिक्सरच्या भांड्यात काकडी धुवून (साले न काढता) चकत्या करुन घेणे, पुदीन्याची १५/२० पाने त्यात घालणे, साहित्यात दिलेल्या प्रमाणाने, सैन्धव मीठ, मध, जिरे पूड, आले, लिम्बाचा रस आणि पाणी घालून मिक्सरवर घुसळून घेणे. गाळणीने गाळून एखादा बर्फाचा खडा घालून सर्व्ह करणे.

पोषण मूल्ये

काकडी, पुदीना, मध, लिम्बू, आलं यांचे फायदे सर्वश्रुत आहेतच. काकडी शरीरातील पाण्याची पातळी राखण्यास मदत करते, तसेच काकडी आणि पुदीना यांतील फायबर, अ‍ॅन्टी ऑक्सिडंटस, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए यांनी परिपूर्ण असे हे सरबत, करण्यास सोपे आणि पाच मिनिटांत तयार होणारे असे आहे.

पुदीना, जिरे पूड आणि लिम्बाचा रस या सर्वांची चव काकडीबरोबर खुलुन येते.

फोटो
ingredients.jpgjuice.jpg

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

करुन बघितले आणि आवडले

एक व्हेरिएशन पण करुन पाहिले. यात जलजिरा पावडर मिक्स केली. हे ही छान लागले