वन डिश मिल - स्पायसी ग्रीन राईस {मंजूताई}

Submitted by मंजूताई on 15 September, 2024 - 08:18
ओवा,भात

हा भात दांडेलीच्या होमस्टे मध्ये खाल्ला होता. ह्यात काहीच मसाले घातले नाहीत आहे फक्त ओव्याच्या पानांचा स्वाद! एक वाटी ओव्याची पाने वाटून थोडी बारीक चिरून. एक वाटी तांदूळाचा भात शिळा असेल तर चांगला. तुप जिऱ्याची फोडणीत घरात असेल तो सुकामेवा, तीळ, जवस,मटार, मक्याचे दाणे (मी घातले नाही) घालून थोडं परतून दोन्ही पानं घालायची. मीठ चवीनुसार! काकडी, टोमॅटोचे काप व डाळिंबाच्या गाण्यांनी सजवावा.
ह्या प्रमाणात आमच्या दोघांच जेवण झालं.
फोटो खाऊ गल्लीत टाकला होता तेव्हा लक्षात आलं की वन डीश मील मध्ये चालेल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओव्याच्या पानांचा स्वाद छान लागत असेल.

डाळिंबाचं गाणं - माज्या व्हटाचं डाळिंबं फुटलं - सांगा राया मी नाही कधी म्हटलं.

मंजूताई, रेसिपी छान आहे. करायला सोपी, खायला भारी!!
तुम्ही 'परतून दोन्ही पानं घालायची ' असं लिहीलं आहे. दुसरी कुठली पानं?

वेगळी रेसिपी आहे. एरवीही ज्यात जमेल त्यात ओवा ओवायला आवडतोय मला. आता हेही करून बघायला हवे.
अनया, दोन्ही म्हणजे बहुतेक चिरलेली व वाटलेली असे असावे.