आरोग्यदायी पेय - काळ्या गाजराची कांजी {अल्पना}
Submitted by अल्पना on 17 September, 2024 - 12:37
या वर्षी मार्च - एप्रिल मध्ये एका मैत्रिणीने मला लॅक्टो फरमंटेशन / किण्वन या प्रकाराशी तोंडओळख करून दिली. तिने कंबुचा चे विरजण दिलं, कसं करतात हे शिकवलं. तो प्रयोग करून बघितला आणि हे नवं पेय मला आवडलं. त्याच दरम्यान तिने घेतलेला एक या विषयावरचा कोर्स मला कराय्ला मिळाला. कंबुचा व्यतिरिक्त जिंजर बग आणि रेझिन वॉटर वापरून केलेले फ्रूट सोडा, मॅक्सिकन तपाचे, काफिर ग्रेन्स वापरून केलेले काफिर योगर्ट अश्या काही नव्या पेयांची आणि अजून बर्याच पदार्थांची माहिती या दरम्यान मिळाली. किण्वन केलेले भारतिय पदार्थ शोधताना काळ्या गाजराची कांजी, आंबिल या पदार्थांची नावं आठवली.
विषय:
शब्दखुणा: