वन डिश मिल - मसूर बिर्याणी {अल्पना}
हा पदार्थ मी पहिल्यांदा लॉकडाउन मध्ये केला होता. त्याआधी मैत्रिणीकडून १-२ वेळा मसूर बिर्याणी हे नाव ऐकलं होते. पण घरात बिर्याणी म्हणजे मांसाहारीच हवी असं मानणारे सदस्य असल्याने कधी करून बघायचा विचार केला नव्हता. तसंही बिर्याणी सारखा कुटाण्याचा पदार्थ घरी करण्याइतका उरकही नाही आहे माझ्यामध्ये. पण लॉकडाऊन मध्ये सुरवातीला सगळंच घरी करावं लागत असताना वन डिश मिल म्हणून ही बिर्याणी केली. आणि चक्क आमच्या घरी ती सगळ्यांना आवडली. त्यानंतर अगदी नेहेमी नाही, पण बर्याचवेळा ही बिर्याणी घरी करून झाली आहे.