व्हेजी कोरियन पॅनकेक
Submitted by अनुश्री. on 30 August, 2023 - 19:08
प्रिय मायबोलीकरांनो,
मी भगीरथ नाही की मी मेधा पाटकर नाही त्यामुळे लढे इ. जमत नाहीत. त्यात हल्ली इथे जास्त यायला जमत नाही. पण एक म्याटर अटकलं हाय त्यापायी येक डाव परत आले. इथलं ऍडमिन टीम लै चॅप्टर. देतो म्हणतात आणि ‘कोरियन’ शब्दखुण देत नाहीत. रेडइट इ. वेबसाईट वर बॅज मिळतो तशी ही शब्दखुण माझ्या प्रोफाईल मिळणार नसून आपल्या सगळ्यासाठी आहे. ह्या पत्राद्वारे तुम्हाला तीन सोप्या, अगदी ग्रॅड स्टूडन्टला जमतील अशा, पाककृती पाठवते आहे आणि चांदबीबीने जशी कुतूबशहाला मदत मागितली तशी मदत मागते आहे.
सध्या कोरियन वेबसिरीज इन थिंग आहेत. वाहत्या बाफवर धनुडीने खालील यादी दिलेली ती इथे कॉपी पेस्ट करतेय.