प्रिय मायबोलीकरांनो,
मी भगीरथ नाही की मी मेधा पाटकर नाही त्यामुळे लढे इ. जमत नाहीत. त्यात हल्ली इथे जास्त यायला जमत नाही. पण एक म्याटर अटकलं हाय त्यापायी येक डाव परत आले. इथलं ऍडमिन टीम लै चॅप्टर. देतो म्हणतात आणि ‘कोरियन’ शब्दखुण देत नाहीत. रेडइट इ. वेबसाईट वर बॅज मिळतो तशी ही शब्दखुण माझ्या प्रोफाईल मिळणार नसून आपल्या सगळ्यासाठी आहे. ह्या पत्राद्वारे तुम्हाला तीन सोप्या, अगदी ग्रॅड स्टूडन्टला जमतील अशा, पाककृती पाठवते आहे आणि चांदबीबीने जशी कुतूबशहाला मदत मागितली तशी मदत मागते आहे.
प्रतिसादात ऍडमिन टीमसाठी “#लईबिलझालं” टाईप करून कोरियन शब्दखुणेसाठी पाठिंबा द्या
(काढा ते सगळे ड्यू आयडी एकदाचे बाहेर आणि पाककृती नाय आवडल्या तरी वेळीच पाठींबा द्या _/\_. परत ह्ये ऍडमिन टीम वर तोंड करून मायबोलीच्या पन्नासाव्या वाढदिवसाला विचारतील “तुम्ही मायबोलीला काय दिल?” … तब मिलके गिनवायेंगे!! )
१) याकसिक - कोरियन साखरभात
५३० ग्रॅम नवे/चिकट (ग्लूटीनस) तांदूळ [२ तास भिजवलेले]
४०० मिली पाणी
१/४ कप बेदाणे [सुकी क्रॅनबेरी, अंजीर इ आवडीचा/उपलब्ध सुकामेवा चालेल]
१० मोठे खजूर चिरून [सुमारे १/२ कप]
१/२ कप कॅन अथवा ताजे शिंगाडे कापून [वॉटरचेस्टनट नसल्यास बदाम-पिस्ते इ.]
ऐच्छिक - आकार देण्यासाठी कुठलाही साचा अथवा आईस-क्यूब ट्रे.
*सॉस साहित्य:
१ कप गडद तपकिरी साखर
१/४ कप सोया सॉस
१/४ कप तिळाचे तेल (अन्य तेल नको!)
~१ इंच दालचिनी/पूड
कृती:
सॉसचे साहित्य एकत्र करणे.
राईस कुकर मध्ये क्रमाने तांदूळ, सॉस, पाणी, मनुका, खजूर, आणि शिंगाडे/बदाम ओतणे. “स्टीकी राईस” सेटींगवर शिजवणे. भात गरम असतानाच साच्यात आकार द्या.
प्रेशर कुकरमध्ये एक शिट्टीवर शिजतो. पाणी थोडे कमीजास्त लागेल. पारंपरिक कृती अधिक उस्तवारीची आहे.
२) जापगोकबाप - कोरियन खिचडा
१ कप तांदूळ
½ कप तपकिरी गोड तांदूळ
2 चमचे काळा गोड तांदूळ Black wild rice (रंगासाठी अत्यावश्यक)
½ कप बार्ली (जव किंवा बाजरी इ अन्य कुठलेही धान्य चालेल)
¼ कप गोठलेले किंवा ताजे हिरवे वाटाणे
१/४ कप राजमा वा अन्य कडधान्ये
मीठ चवीनुसार (२ टीस्पून)
३.५-४ कप पाणी कुकर मध्ये शिजवण्यासाठी.
कृती
कडधान्ये ७-८ तास भिजवा. इतर धान्ये ४ तास भिजवा.
सर्व जिन्नस उपसून कुकरच्या भांड्यात ओता. ह्यात मीठ, पाणी घालून शिजवणे. राईस कुकर मध्ये ब्राऊन राईस सेटींगवर शिजू देणे किंवा प्रेशर कुकर मध्ये ३-४ शिट्ट्यावर शिजवणे.
https://www.maangchi.com/recipe/multigrain-rice
https://kimchimari.com/korean-multigrain-rice-japgokbap-ogokbap/
३) गाजी-नामूल - वांग्याचे भरीत (कोरियन पद्धतीने)
१/२ किलो कोरियन/चिनी वांगी
३-४ लसूण पाकळ्या, चिरून
२ कांदेपात, चिरून
१ टेबलस्पून सोया सॉस
१ टीस्पून फिश सॉस (ऐच्छिक)
१ चमचे लाल मिरची फ्लेक्स (गोचुगारू)
२ चमचे तिळाचे तेल (टोस्टेड असल्यास अधिक चांगलं)
१ टेबलस्पून भाजलेले तीळ
कृती
वांग्याचे अडीच-तीन इंच लांबीचे तुकडे मोदक उकडतो तसे पाच मिनीटे वाफवून घेणे.
एका मोठ्या वाडग्यात इतर सर्व साहित्य एकत्र करणे. वांग्याचे तुकडे गरम असतानाच हाताने उभ्यात तोडून वाडग्यात टाकणे. सोया सॉस खारट असल्याने मिठाची आवश्यकता नाही पण चवीनुसार मीठ, तिखट अधिक घालून ढवळावे.
टीप: ही पाककृती तशी बंडल आहे. तिखट झालं म्हणून टोफू घातलं पण मूळ पाककृतीत नाही. स्वयंविवेकसे बनैये! उकडलेल्या वांग्याऐवजी खरपूस भाजलेले वांगे अधिक चांगले लागते.
https://youtu.be/Ofc_tiRRir8 (यावरून आधारित)
आता काही मायबोलीकर त्यांची जगण्याची भिंग, त्यांचे लेखनाचे साचे, त्यांचा खादाडीच्या फूटपट्ट्या घेऊन येतील. असं का लिहीलं नि तसं का लिहीलं, असं का केलं नि तसं का केलं, असं कर नि तसं कर..… त्या कोलाहलात रेसिपीचा गोडवा विसरू नका आणि प्रतिसादात ऍडमिन टीमला “#लईबिलझालं” कळवायला विसरू नका .
तुमची
बार्सिलोना
#लईबिलझालं
#लईबिलझालं
रेस्प्या लै गोड आहेत (लिटरली!
रेस्प्या लै गोड आहेत (लिटरली!)
तुला पाठिंबा म्हणून हे घे -
#लईबिलझालं
छान सी!
छान सी!
महाराष्ट्र दिना निमित्त
महाराष्ट्र दिना निमित्त कोरियन शब्दखुण आलीच पाहिजे....
#कुसुमाग्रज
#लईबिलझालं
भारी रेसिपीज आणि खुसखुशीत
भारी रेसिपीज आणि खुसखुशीत लिखाण.
#लईबिलझालं
सी साठी कायपण
सी नूना, बर्याच दिवसांनी!
सी नूना, बर्याच दिवसांनी! #लईबिलझालं रोमात राहून आता पुन्हा लिहित्या व्हा
भारी रेसिपीज (करणार नाही पण
भारी रेसिपीज (करणार नाही पण वाचायला /बघायला भारी वाटल्या) आणि लिहिलंय पण भारी .
पहिला पॅरा
#लईबिलझालं
करणार नाही पण,
करणार नाही पण, #लईबिलझालं
करणार नाही पण, #लईबिलझालं +1
करणार नाही पण, #लईबिलझालं
+1
रच्याकने.. पहिला फोटो लईच डेंजर... कसल्या आळ्या आहेत असे वाटले मला..
#लईबिलझालं
#लईबिलझालं
#लईबिलझालं
#लईबिलझालं
सी चिंगू (dear friend) ओरेंनमाने मान्ना ( long time no see) कुठं हायेस गो .कोरियाला गेलीस की काय?
तिसरी फोटो जरा बरा दिसतोय तर
तिसरी फोटो जरा बरा दिसतोय तर तू बंडल म्हणत्येस. पहिले दोन फोटो बघुन कोरिअन शब्दखूण नाही ते बरंच वाटलं
अरे किती तो क्लोजप!
ते काही असो... #लईबिलझालं
सगळ्यांना थँक्यू.
सगळ्यांना थँक्यू.
फोटोवर जाऊ नका. हे ग्लुटीनस तांदूळ जिरेसाळसारखे जरा लहानसर आहेत. लांबून फोटो काढला तर दलिया वाटेल, जवळून काढला तर किटक वर्ग! दोन्ही भात चवीला छान आहेत. प्रेक्षणीयच हवे असेल तर मूळ यूट्यूब लिंक मध्ये बघा.
याचसाठी केला होता अट्टाहास,
मी तर आपापलाच साखरभात, खिचडी व भरीत करेन, सीआयडीच्या साळुंखेचा नको रे बाबा. कुछ तो गडबड है
याचसाठी केला होता अट्टाहास, कोरियन भात गोड व्हावा.
#लईबिलझालं
ओह तो फोटो भाताचा आहे का..
ओह तो फोटो भाताचा आहे का.. मला वाटले खरेच अळ्या वगैरे.. ते काहीही खातात... ऑफिस मध्ये एक कोरियन रेस्टारंट होता.. घाण वास मारायचे...
कोरियन चित्रपट आवडतात मात्र...
#लईबिलझालं
#लईबिलझालं
खूप खुसखुशीत लिहिलं आहेस.
सी,तुला पाहून आनंद वाटला.