वारी महाराष्ट्राला माहीतच आहे. तो आषाढातला सोहळा कोणाला माहीत नाही? अनेक गावातून दिंड्या निघतात. लोक चालत पोचतात. काही संतांच्या, देवांच्या, गावांच्या पालख्यांचा संगम पंढरपुरात होतो. पण एक अशी वारी ‘मंगळवेढ्याचे’ लोक करतात, जिथे ना पालखी असते, ना पंढरपूरात जाण्याचे बंधन ! आहे ना interesting प्रथा !! पौतकाल म्हणतात त्याला!
मित्राच्या कामासाठी मी अब्दुललाट गावामध्ये आलो होतो. त्यावेळी त्याचे घर शोधत आलो. त्यांनी नवीन भाड्याने घेतले होते हे घर ! अब्दुललाट गावाच्या बाहेर एका धरणग्रस्त वसाहतीमध्ये घेतलेले हे घर शोधत आल्यानंतर मला जाणवले की, इथल्या लोकांनी त्यांचं धरणग्रस्त गाव आहे तसं आणि त्याच्या संस्कृती आणि राहण्याच्या बारकाव्यांसकट वसवलं आहे. त्याचं कारण म्हणजे जेव्हा त्या भाड्याने घर घेतलेल्या जागेची मालकीण, एक आजीबाई; ती माझ्याशी बोलली की, आम्ही काळम्मावाडी धरणाच्या भागातले. या गावाचं नाव कोनोली ! गावाबाहेरच अब्दुल लाट आणि लाटवाडी गावच्या रोडवर एक गांगोबाचे ग्रामीण देवस्थान आणि त्याच्या मागे गणपतीचे मंदिर.
पुणे सर्जिकल सोसायटीतर्फे 'अर्ली डिटेक्शन सेव्हज लाईव्हज' या ब्रेस्ट कॅन्सर जनजागृती कार्यक्रमाचा एक भाग म्हणून गेल्या रविवारी सकाळी पुणे हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आले होते.
ओंकारेश्वर मंदिरापासून शनिवार पेठेतून कसबा पेठेकडे या हेरिटेज वॉकमध्ये गेल्या १००+ वर्षांपासून असलेल्या पुण्यातल्या ऐतिहासिक वास्तु बघताना केवळ ऐतिहासिक पैलूच नाही तर स्थापत्यशास्त्र, पुरातत्त्वीय बाजू, सांस्कृतिक संक्रमण वगैरे माहिती देखील तज्ञांकडून जाणून घेता आली.
अनबालगन आणि विजयालक्ष्मी - माझ्यासाठी अनबा आणि विजी. माझे चेन्नै बडीज. सदा आनंदी राहणारे जोडपे. दोघेही माझे जिवलग मित्र. विजीच्या हातचे तमिळ पद्धतीचे चविष्ट जेवण जेवणे हा माझा चेन्नैतला नियमित कार्यक्रम. घरी चार-चार मदतनीस असूनही स्वतः पदर खोचून माझ्यासाठी स्वयंपाक करणारी विजी आणि प्रचंड आग्रह करकरून वाढणारा अनबा हे दृश्य नेहमीचेच. दोघांच्या आग्रह करून वाढण्याच्या सवयीला मी हसतो, नावे ठेवतो. दोघे काही बोलत नाहीत, सवय बदलत नाहीत. एकदा खोदून विचारले, इतका आग्रह का?
प्रत्येक आस्तिक मनाला मोहिनी पडावी असेच कृष्णाचे 'मनमोहन' रूप आहे. कृष्णभक्तीची मोहक रूपे भारतभर दिसून येतात, पण त्यात कमालीचे वैविध्य आहे. तमिळ वेत्रवेणुधारी थिरुमल वेंकटेश्वर, ओडिशातील जगन्नाथपुरीचा कालिया कृष्ण, केरळचा गुरुवायुरप्पन, कर्नाटकाचा उडुपी श्रीकृष्ण, ब्रिजवासीयांचा युगलरूपातला राधारमण, गुर्जर-ओखामंडलाचा राजस द्वारकाधीश आणि राजस्थानातील नाथद्वाराचा गोवर्धनधारी श्रीनाथ! भारतातल्या जवळपास सर्व प्रमुख भाषांमध्ये बालरूपी, युगलरूपी, सखारूपी, प्रेमरूपी, गुरुरूपी किंवा परमात्मारूपी कृष्णाचे वर्णन करणारे साहित्य आहे.
संदीप खरे आणि वैभव जोशी यांचा ‘इर्शाद’ नावाचा काव्यसादरीकरणाचा कार्यक्रम दिवाळी पहाटेला आयोजित करण्यावरून वादंग झालेला वाचला. परभाषांमधून आलेले अनेक शब्द तत्सम आणि तद्भव रूपात अनेको वर्षे मराठीत रुळले आहेत, त्यातलाच हाही. त्यावर आक्षेप असायचं कारण मला नीटसं कळलेलं नाही.
हजारो वर्षांचा इतिहास असलेल्या देशात संस्कृतीचे इतके प्रवाह मिसळलेले आणि लुप्त झालेले असतात, त्यातून एखादा कसा वेगळा काढायचा आणि का?
चक्रपुजा- नवरात्रातील एक विधी
होणार होणार म्हणत म्हणत १९वर्षांपासून पेंडिंग असणारी नवरात्रातील चक्रपुजा आमच्या माहेरी २०१४ मध्ये संपन्न झाली आणी सगळे भरुन पावलो. आमच्या माहेरी चक्रपुजेची परम्परा आहे.
कुलदेवता: बिजासनी देवी(सेन्धवा) मुळ स्थानः विन्ध्यवासिनी देवी (मिर्झापुर, उ.प्र.)
भगवद्गीता - अध्याय आठवा - अक्षरब्रह्मयोग
अपि क्रियार्थं सुलभं समित्कुशं जलान्यपि स्नानविधिक्षमाणि ते।
अपि स्वशक्त्या तपसि प्रवर्तसे शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम् ।।
महादेवाच्या प्राप्तीसाठी घोर तपश्चर्या करणाऱ्या पार्वतीची परीक्षा घेण्यासाठी ब्रह्मचाऱ्याच्या वेषात भगवान शंकर प्रकटतात. पार्वतीच्या घोर तपस्येकडे पाहून म्हणतात की ‘तपःसाधनेसाठी आवश्यक अशी सामग्री, स्नानासाठी पाणी इ. सोयी उपलब्ध आहेत ना? कारण तू हे जाणतेस की शरीर हे धर्म (येथे ध्येय) साध्य करण्याचे प्रथम साधन आहे.’
समग्र वेदवाङ्मयाचा परिचय करुन घेण्याच्या उपक्रमात आपण सर्वप्रथम चारही वेदांची ओळख करून घेतली. वेदांनंतर अर्थातच क्रमाने ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके आणि उपनिषदांचा समावेश होतो. यातील ब्राह्मण ग्रंथांचा परिचय करून घेऊयात. (जातीने ब्राह्मण असण्याचा आणि या ग्रंथांच्या नावाचा आपापसात काही संबंध नाही हे येथे लक्षात घेतले पाहिजे.)